HomeUncategorizedकोल्हापूर जिल्हा शिवशाहू प्रतिष्ठान , मुंबई यांच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

कोल्हापूर जिल्हा शिवशाहू प्रतिष्ठान , मुंबई यांच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

!!एकच ध्यास सामाजिक विकास!! या उक्तीप्रमाणे कोल्हापूरवाशियांच्या सुख दुःखात नेहमीच सहभागी होणारी,मुंबई शहर उपनगरे येथे वास्तव्य करत असलेल्या मुंबईस्थित कोल्हापूरवाशियांचे मजबूत संघटन उभ्या केलेल्या कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई यांचे वतीने दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशन व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात येते परंतु सध्या कोरोना ओमायक्रोन या रोगांचा वाढता प्रादुर्भाव त्यातच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत स्नेहमेळावा रद्द करत दिनदर्शिका प्रकाशन सोहळा अतिशय साध्या पद्धतीने पार पडला.


या प्रसंगी ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते कृष्णकांत मानकर,लोकशांती संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, शिवशाहू प्रतिष्ठान कार्याध्यक्ष राजू येरुडकर ,युवा मराठा अध्यक्ष विजय पवार,बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले, संतोष वर्टेकर, भरत पाटील, संदीप चव्हाण, विनोद देवरकर, सतिश पाटील,तानाजी धनुकटे, सम्राट चव्हाण,किरण पाटील,सागर चव्हाण , अर्जुन देसाई ,हरी शिंदे व इतर सहकारी उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular