Homeवैशिष्ट्येक्रांतीज्योती सावित्रीमाई यांचा मुलींना शिक्षित करण्याचा उदात्त हेतू कोणता?

क्रांतीज्योती सावित्रीमाई यांचा मुलींना शिक्षित करण्याचा उदात्त हेतू कोणता?

ज्यांना आपण कधी पाहिले नाही, ज्यांचे काहिच कार्य नाही अशा काल्पनिक देवी देवतांना किंवा काहि विचारसरणी, सामाजिक कार्य नसलेल्या अवलीयांना दिवस रात्र पूजतो पण ज्यांनी अनेक हाल अपेष्टा सहन करत, सर्वांचे जीवन सुखकर, सुलभ, शिक्षित होऊन जीवनमानात सुधार व्हावा यासाठीच लढा दिला अशा खऱ्या खुऱ्या निस्वार्थी थोर महात्म्यांची सोय पाहूनच आठवण काढतो. सामान्य जनांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वात प्रभावी व महत्त्वाचा लढा देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या सहचारिणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होत्या.
त्यावेळी मुलींच्या शिक्षणावर प्रतिबंध होता व त्यांना मनुस्मृती या ग्रंथानुसार ताडन च्याच अधिकारी मानल्या जायचे, चुल आणि मूल सांभाळत गुलामासारखे वागावे लागायचे. ज्योतिबांनी प्रथम सावित्रीबाईंना सुशिक्षित केले आणि त्यानंतर सावित्रीमाईंचा अविरत संघर्षमयी लढा सुरु झाला होता. सावित्रीबाईंनी सर्व मुलींना शिक्षित करण्याचा ध्यास घेतला, पण त्यावेळी असे समाजकार्य करणे सोपे नव्हते. समाजकंटक सनातनी घाणेरड्या विचारांच्या मनुवादी लोकांनी सावित्रीबाईंना त्रास देणे, अडथळे निर्माण करणे सुरू केले. दगड, माती, शेण, विष्ठा सावित्रीबाईंना फेकून मारायचे पण सावित्रीबाई त्यांच्या ध्येयापासून विचलित झाल्या नाहित. त्या शाळेत शिकवायला जाताना एक जास्तीची साडी सोबत घेऊन जायच्या. याव्यतिरिक्त त्यांनी विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारणाचे व आद्य कवयित्री म्हणून कार्य केले. सावित्रीमाई जर नसत्या तर आजही स्त्रियांचे जीवन गुलामासारखेच राहिले असते. म्हणून त्यांचे आभार प्रत्येक स्त्रिने मानलेच पाहिजे. पण आजही स्त्रियांना मानसिक गुलाम बनवून ठेवण्यासाठी काल्पनिक व अंधश्रद्धेने बरबटलेल्या कथा, कहाण्या, जसे वैभवलक्ष्मी, सत्यनारायण पोथी इत्यादी सारख्या थोतांड व्रत वैकल्यामध्ये गुंतवून ठेवण्याचे कारस्थान होत राहते. आणि याद्वारे काहि समाजकंटक लोक आपला व्यवसाय चालवितात. पण यामध्ये गुंतलेल्या स्त्रियांना डोळस व्हायला पाहिजे, प्रत्येक गोष्टिची चिकित्सा केली पाहिजे. जसे कोणतीही गोष्ट विकत घ्यायची असल्यास स्त्रिया निरखून पारखून विश्वास बसल्यावरच घेते तसेच कोणतीही कहाणी, व्रत वैकल्ये निरखून पारखून म्हणजे खरंच असं होऊ शकते का? खरंच आपल्या ओळखीच्यासोबत असे झाले आहे का? गुण आला आहे का? हि गोष्ट कितपत खरी आहे? इत्यादी चिकित्सा करूनच स्वीकारावी. नाहि तर अशा गोष्टिंना स्वतःवर हावी होऊ देऊ नये व इतरांनाही यांपासून परावृत्त करावे. अंधश्रद्धेला विरोध केला किंवा अशा विषयांवरील प्रश्नांची उत्तरे देता येत नाहित म्हणून भावना दुखावल्याचा आव करून वेगळे वळण देणे पार चुकिचे आहे. पण काही अंधश्रद्धांना पूर्णपणे चिटकून असललेले आपली विवेकबुद्धी गमावलेले व प्रश्नोत्तरांना घाबरणारेच असतात. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या उदात्त हेतूने मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संघर्ष केला तो अजूनही पूर्णपणे साकार झालेला नाही. शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणे, व्यवसाय करणे, पैसा कमविणेच नाही आहे. शिक्षणातून सर्वात आधी माणूस घडला पाहिजे, शिक्षित माणसांमध्ये माणुसकीचे दर्शन घडले पाहिजे. पण सद्याच्या वेगवान जगात प्रत्येकजण जीवघेण्या स्पर्धेत लागले आहे. शिक्षणातून कुणाचे व्यक्तिमत्त्व कसे घडले यापेक्षा गुणपत्रिकेवरील संख्यांना महत्त्व वाढले. सावित्रीमाईंनी सुरू केलेल्या संघर्षाचे फळ निश्चितच मिळाले कारण आता स्त्रि सक्षम आहे, पुरुषांपेक्षा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आणि यशस्वी आहे. नवनिर्मितीचे कौशल्य स्त्रियांमध्ये आहे. कुठलीही गोष्ट पटकन समजून घेऊन त्यात पारंगत होण्याइतपत कुशलता आहे. पण माझ्या माता भगिनींनी स्वतः डोळस होऊन इतरांमध्येही सकारात्मक बदल घडविण्यासाठी सज्ज व्हावे आणि सावित्रीमाईंचा वारसा जोपासावा
आजच्या शिक्षणाच्या खऱ्या आराध्य दैवत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन व बालिका दिन म्हणून साजरा होत असतो. त्यानिमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सदैव जीवंत कार्यास व विचारांस विनम्र अभिवादन.

✍🏻 मनोज प्रल्हाद गावनेर
मंगरूळ चवाळा, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती.

( कृपयाआवडल्यास शेअर करा )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular