Homeवैशिष्ट्येजय देव जय देव जय श्री काशीबा महाराजा ||आरती ओवाळीतो ,चरणी ठेवूनिया...

जय देव जय देव जय श्री काशीबा महाराजा ||आरती ओवाळीतो ,चरणी ठेवूनिया माथा ||जय देव जय देव ||

जय देव जय देव जय श्री काशीबा महाराजा ||
आरती ओवाळीतो ,चरणी ठेवूनिया माथा ||
जय देव जय देव ||

संत महंताची भजने तुम्ही रेखाटली ,
ग्रंथ रचना करुनी, ज्ञानगंगा पसरविली ||

दूर करुनी अज्ञाना , आम्हा उपदेशिले
तरीही पामर अज्ञानी , आम्हां न कळले ||
जय देव जय देव ,
जय देव जय देव जय श्री काशीबा महाराजा ||
आरती ओवाळीतो , चरणी ठेवूनिया माथा ||
जय देव जय देव ||

सृष्टी रचनेचा, तुम्ही सांभाळला भार
शैव, लिंगायत स्वप्न झाले साकार ||

शिव शंकर देवाचे तुम्ही अवतार ,,
देवा तुम्ही अवतार ||
सकल मानवाला तुमचा आधार ||
जय देव जय देव||
जय देव जय देव जय श्री काशीबा महाराजा ||
आरती ओवाळीतो , चरणी ठेवूनिया माथा ||
जय देव जय देव ||

ज्ञान दान , द्या वरदान आम्हा
हीच प्रार्थना केली मी तुम्हा ||

सुखी करावे सकल भक्तजना
आणिक काय विनवू हे दयाधना ||
जय देव जय देव ||

जय देव जय देव जय श्री काशीबा महाराजा ||
आरती ओवाळीतो , चरणी ठेवूनिया माथा ||
जय देव जय देव ||

आरती रचना व लेखन विलास नारायण ढवळे ( गुरव )
वैद्यकीय अधिक्षक, समाजसेवा विभाग MSW ठाणे महापालिका ठाणे.
पत्ता:
पेण रायगड.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular