Homeसंपादकीयखूप मोठ्या आवाजत आरोप प्रत्यारोप करताय पण ..

खूप मोठ्या आवाजत आरोप प्रत्यारोप करताय पण ..

अमित गुरव ( कोल्हापूर ) -: आजकाल काही राजकीय व्यक्ती आपापसात मोठ्या मोठ्या आवाजात भांडत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना आपली जीभ घसरत आहेत . आणि आपण सर्वजण ते दाखवण्यात आणि पाहण्यात इतके व्यस्त झालोय की त्यांची संपत्ती कोटीत आहे पण त्यामानाने आपल्याकडे लाखो सोडून द्या पण हजारोची जमवाजमव करताना आपल्याला घाम फुटतो आहे हे ही लक्षात येत नाहीये. कदाचित या सर्वामुळे माझ्या सारख्या अनेकांना हा प्रश्न मनात उपस्थित होतोय की हे खरंच एकमेकांच्या विरुद्ध बोलत आहेत की जाणीवपूर्वक आपले मन दुसरीकडे वळवण्यात यशस्वी होत आहेत ? यात कोणत्यातरी सिनेमाचा सिन आठवतो एक मोठा मंत्री जमलेल्याना सांगत असतो की मी माझ्या बायकोची सुपारी देऊन खून केला आता मीडिया चे माझ्यावरच लक्ष काढून टाकण्यासाठी एक दोन बॉम्ब स्पोफ्ट करा मीडिया तिकडे फिरेल आणि आपण तोपर्यंत आपले काम संपवूया सर्व पुरावे नष्ट करूया. ( अर्थातच हा सिनेमा तेलगू आहे कारण आपले दिग्दर्शक असे सिनेमा मध्ये करूच शकत नाही का ते तुम्ही अभ्यास करा )
आज भारतात लोकांना रोजगाराच्या समस्या इतक्या मोठ्या प्रमाणावर सतावत आहेत की उच्चशिक्षित मुले एकाद्या खाजगी संस्थेत शिपाई या पदासाठी सुद्धा मुलाखती देऊन ती मिळेल या आशेवर आयुष्य ढकलत आहेत. कित्येक व्यवसाय ठप्प होऊन व्यावसायिकांचे कंबरडे मोडले पण नाक दाबून बुक्यांचा मार सहन करावा अशी वेळ कित्येक छोट्या व्यावसायिक लोकांवर आली आहे. या ज्वलंत प्रश्नावर सत्ताधारी किंवा विरोधक हे आवाज न उठवता फक्त मनोरंजन करण्याचे काम सद्या करीत आहेत आणि त्याबद्दल आम्हा- तुम्हा मतदारांना याची काळजी किंवा चिंताच नाही. त्यांनी एकमेकांवर आरोप न करता भांडी फोडावीत जे दोषी असतील ते सगळे तुरुंगात जातील पण असे होईल असे वाटत नाही कारण त्याच साठेलोट खूप घट्ट आहे , भरडले गेलोच तर फक्त आम्ही तुम्ही तेव्हा विचार करा मत दान देताना.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. खरं म्हणजे ह्या लेखात मांडलेले विचार त्यापेक्षाही भयानक परिस्थिती आज सर्वत्र आहे पण सामान्य माणसांकडे बघायला कोणी तयार नाही
    मागील काही वर्षांपासून राजकारण इतक्या खालच्या थराला आणि घाणेरड्या पातळीवर पोहोचलय की विचारता सोय नाही
    यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे याची जाणीव राजकारण्यांना नाही ….
    लिहू तेव्हढ कमीच आहे

- Advertisment -spot_img

Most Popular