आजरा -: ( प्रतिनिधी )- महिला दिनाचे औचित्य साधून गुरव अकॅडमी मार्फत महिलांची अबँकस कार्यशाळा आयोजित केली होती .उद्योजिका मेघा विकास फरणेकर ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
गुरव प्रोऍक्टिव्ह अबँकस अकॅडमी चे अध्यक्ष आणि शिक्षक अमित अशोक गुरव यांनी सर्व महिलांना अबँकस बाबत इतिहास आणि त्यांचे मुलांना भविष्यात होणारे फायदे सांगितले. तसेच पालकांच्या समस्या आणि सूचना यांना प्राधान्य अकॅडमी मार्फत देण्यात आले.
मुलांनी अबँकस वर पटपट गणिते सोडवून प्रात्येक्षिक आणि डिव्हाईस कसा वापरावा हे टीचर अबँकस वर समजून दिले.
अध्यक्षीय भाषणात फरणेकर म्हणाल्या की , अबँकस बाबत अजूनही पालकांना आपण सजग करुया. सरांनी अजूनही मुलांची लक्षणीय प्रगती होण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी त्यांना व गुरव अकॅडमी ला समस्त आजरेकरांच्या वतीने शुभेच्छा.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैष्णवी मुळीक तर आभार प्रदर्शन शिक्षिका प्रितम गुरव यांनी व्यक्त करून समस्त सौभाग्यवती चा मान हळदीकुंकू देऊन कार्यक्रम संपन्न झाला.
मुख्यसंपादक