कोल्हापूर (प्रतिनिधी) : लातूर (ग्रामीण) येथे कार्यरत असणाऱ्या प्रिया पाटील यांनी कोल्हापुरातील गृह पोलीस उपअधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. सुनीता नाशिककर निवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रिया पाटील मूळच्या पन्हाळा तालुक्यातील किसरूळ गावाच्या आहेत. त्यांची २०१४ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाली होती. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती पुणे येथे झाली होती.
प्रिया पाटील यांचे माध्यमिक शिक्षण कागल येथील शाहू हायस्कूलमध्ये झाले. विवेकानंद, कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले. व्हॉलीबॉल, चित्रकलामध्ये त्यांनी राज्य व देश पातळीवर प्रतिनिधीत्व केले आहे. त्या नीट परीक्षासुद्धा उत्तीर्ण आहेत.
त्यांचे पती स्वप्निल पवार लातूर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. तर वडील डॉ. एन. डी. पाटील सेवानिवृत्त असून त्यांची आई पवित्रा पाटील गृहिणी आहेत. तर लहान भाऊ नेदरलँड येथे आयटी कंपनीत काम करत आहे. तर त्यांचे आजोबा दिवंगत धोंडीराम भाऊ पाटील हे प्रगतशील शेतकरी व समाजसेवक होते.

मुख्यसंपादक