नाशिक – ( प्रतिनिधी ) : ग्रामपंचायत निवडणूकीत ही प्रतिष्ठा पणाला लावली जाते. तालुक्यातील नेत्यापासून ते आमदार सुद्धा या निवडणुकीत रस्त्यावर उतरून प्रचार करताना दिसतात. त्यामुळे गावागावात चुरस ,ईर्षा ही ठरलेली बाब . कोरोनाच्या काळामुळे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी मते अनेक जाणकारांनी व्यक्त केली होती.
नाशिक जिल्ह्यातील उमराणे गाव आज सरपंच पदाच्या बोलीमुळे चर्चेत आले . लाख – दोन लाख नाही तर तब्बल २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावली.
ही बोली जि. प माजी उपाध्यक्ष देवरे यांचे चिरंजीव प्रशांत देवरे यांच्या पॅनल ने लावली. त्यामुळे निवडणूक ही बिनविरोध होणार आहे असे जाहीर करण्यात आले. बोलीतून रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल. विशेष म्हणजे हे गाव म्हणजे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ खूप प्रमाणत व्हायरल होत असून ग्रामपंचायती साठी इतके मग आमदारकी साठी किती ची बोली लागेल ? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.

मुख्यसंपादक