घर…

  • काव्यप्रकार (मुक्तछंद ) –

अहो काय म्हणालात! हे घर सोडायचं
जमिनीवर थंबकन बसत नजर इकडे तिकडे फिरवली तर,
जणू घराच्या भिंती सुद्धा माझ्यासारख्याच आश्चर्यचकित झाल्या होत्या.

अलगद डोळ्यात जमलेले पाणी ओघळले आणि
घराचे माझे वासे जणू पाय गाळून बसले.

भितीतला ओलावा नष्ट झाला जणू,
मला आकांताने ती लागली म्हणू ,
नको ना गं जाऊस आम्हाला सोडून.

घर म्हणाल तितक्यात,
जाशील भले तू मोठ्या घरात वावरशील पण,
माझ्यासारखी उब देईल का तुला कोणी?

बाहेर गेल्यावेरी तुमची वाट मी सुद्धा पाहतो ,
कधी परतुनी तुम्ही मायेने कुशीत येतील याचा विचार मी सुद्धा करत राहतो .

अंगण तितक्यात म्हणाले,
तुझ्या वावरानी या फुलांचा सुगंध अधिकच दरवळत जाई
तू नसशील तर मात्र तेही हरवून जाईल.

तुळशी माझी माझ्याकडे एकटक पाहत म्हणाली,
कोण ग घालील पहाटेच माझ्या भोवती सडा रांगोळी ?

स्वयंपाक घराने तर आज अबोलाच पकडला होता,
तिखट, हळदी जणू काही सगळ्याच माझ्यावर रुसला होत्या

मीठ ही घातले भाजीत तरीही रुचकर लागेल ना हो जेवण !

माजघरात गेले तर
भले मोठे माजघर जणू आज ओळखतच नव्हते,
मला तर आज माझेच घर परके वाटत होते.

नवऱ्याला जाऊन विचारले,
आईच्या पदरासारखी उब देणारे आपले घर
कसं सोडायचं म्हणतो मी सहजच?

तेवढ्यात ते ही सुरात सूर मिळवत म्हणाले,

हो ग सखे
माझाही पाय नाही जात आहे पुढे

चिंटू आला धावुनी म्हणतो कसा रागेने,
जावेसे वाटले तर तुम्ही जा दोघे
मी नाही राहणार माझ्या घराच्या विरहाने

नकळत घराच्या भिंती जणू नाचू लागल्या,
आम्ही घर सोडायचा निर्णय मागे घेतला

आम्ही घर सोडायचा निर्णय मागे घेतला

✍️कवयित्री –
नेहा नितीन संखे
( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular