Homeक्राईमचेंबूरमध्ये दहावी, बारावीच्या fake marksheet विकणाऱ्या चौघांना अटक

चेंबूरमध्ये दहावी, बारावीच्या fake marksheet विकणाऱ्या चौघांना अटक

मुंबई : क्राईम ब्रँचने आज चेंबूर परिसरात दहावी आणि बारावीच्या बनावट गुणपत्रिका विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. बनावट बोर्ड मार्कशीट तयार करून विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली.

सलमान खान, मोहम्मद नदीम शेख, मोहम्मद मुर्तरजा आणि दानी खान अशी आरोपींची नावे आहेत.

इयत्ता 10वी आणि 12वीची मार्कशीट चार हजार रुपयांना विकली जात होती.

न्यायालयाने त्यांना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी पुष्टी मुंबई पोलिसांनी दिली.

एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या ट्विटमध्ये, “मुंबई गुन्हे शाखा युनिट 6 ने चेंबूर परिसरात 10वी आणि 12वीच्या बनावट मार्कशीट विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आणि 4 जणांना अटक केली. मार्कशीट 4,000 रुपयांना विकली जात होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. सलमान खान, मोहम्मद नदीम शेख, मोहम्मद मुर्तुजा, दानी खान. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, उत्तर मुंबईतील बोरिवली स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने आज (१२ एप्रिल) लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या समस्येमुळे वातानुकूलित (एसी) एकासह सुमारे तीन लोकल ट्रेन रोखून धरण्यात आल्या, तर इतर गाड्या धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या, असे पश्चिम रेल्वेच्या (डब्ल्यूआर) प्रवक्त्याने सांगितले.

दहिसर आणि बोरिवली स्थानकांदरम्यान चर्चगेटकडे जाणार्‍या जलद मार्गावरील तार तुटल्याने मुंबईची ‘लाइफलाइन’ मानल्या जाणाऱ्या उपनगरीय सेवांवर सकाळी 10:30 वाजता परिणाम झाला. डब्ल्यूआरचे मुख्य प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी सांगितले की, तुटलेली ओव्हरहेड वायर रात्री 11.35 च्या सुमारास पूर्ववत करण्यात आली आणि रेल्वे सेवा हळूहळू सुरळीत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular