आजरा -: सोहळे फाटा ता – आजरा येथे गांजा विक्रीच्या उद्देशाने आलेला हर्षवर्धन उर्फ हर्षद धनाजी लोंढे ( वय ३० ) रा . परनोली ( ता – आजरा ) याला आजरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे फॅकल्टी पिशवीत ६१२ ग्रॅम वजनाचा म्हणजेच १०००० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. सदर कारवाई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून केली आहे. त्यामध्ये मोबाईल , चिलीम , गुन्हा करण्यासाठी वापरलेली गाडी असा ७५०६० रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला.
आजरा पोलीस स्टेशनचे हवालदार महेश यांनी गोपनीय बातमीदार मार्फत पेरनोली सोहळे फाटा येथून सोहळे कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक जण गांजाचे सेवन तसेच परिसरात विक्री करत असल्याचे समजले . त्या अनषंगाने उप विभागीय अधिकारी रामदास इंगवले , आजरा पोलीस ठाणे सहा. पोलीस निरीक्षक नागेश यमगर , पोलीस अंमलदर महेश गवळी , पोलीस उप निरीक्षक संजय पाटील, संदीप मसवेकर , अनंत देसाई , दयानंद बेनके, विशाल कांबळे , महेश चिटणीस यांनी कारवाईत सहभाग घेतला. याप्रकरणी आणखी ६ जणांचा शोध पोलीस घेत आहेत . ही कारवाई जिल्हा पो.प्रमुख पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गर्शनाखाली झाली.
मुख्यसंपादक