Homeमुक्त- व्यासपीठछंद लागला…..

छंद लागला…..

काय विषय असावा हा हाच विचार मनात रुजू झाला असेल ना. सोप्पं आहे. सध्या आपले आयुष्य कोणत्या एका वस्तूच्या अवती भवती फिरत आहे. “मोबाईल” क्षणाचाही विलंब न लावता प्रत्येक जण उत्तर देईल. पण खरच विचार करा छंद लागला की व्यसन लागलं.

सकाळी उठल्या पासून झोपण्याच्या अवस्थेत पोहचण्या पर्यंत तो एकच जवळ असतो. उठल की what’s app चेक करा. Insta, Facebook, ते शौचालय प्रवास म्हणजे एकंदरीत अंघोळ करताना मोबाईल आपल्या पासून बाजूला होतो. तिथून नाष्टा करताना पुन्हा office ला जाताना, प्रवास करताना, काम करताना ते पूर्ण schedule बिझी इन मोबाईल .

मोबाईल शिवाय सध्या काम च होत नाही हे मला ही मान्य आहे. बँकिंग पासून लोन चे हफ्ते फेडण्या पर्यंत, रिचार्ज पासून बेड ची उशी खरेदी करण्या पर्यंत, तू काय जेवलास ते मी आता पोहोचली पर्यंत, असंख्य सुविधा आहेत. ऑफिस ची सुद्धा काम आजकल मोठ्या प्रमाणात मोबाईल वरच असतात ही सध्या ची परिस्थिती.

पण त्याला ही एक वेळ द्या. एक अंतर ठेवा. ८ तास झोप असायला हवी. ती सुद्धा आपण नीट घेत नाही. का तर मोबाईल ची इतर काम करून जो बाकीचा वेळ मिळतो त्यात यूट्यूब, व्हॉट्स ॲप, इंस्टा, ट्विटर, फेसबुक, स्नॅप चाट आणि बरच काही यातच गुंतून असतो. पण खरच विचार केला त का आपण त्याच्या आहारी जात आहोत.

आपल्या आयुष्यात आपल्याला काय आवडत काय नाही आवडत याचा ही काही थांगपत्ता नाही लोकांना. काही दुर्घटना झाली तर पूर्वी लोक मदत करायला जात असत आता प्रथम व्हिडीओ काढून अपलोड कधी करू हा विचार करतात वर आणि त्यावर टॅग असतो . लाईक करा कमेंट टाका. ही सरहास फालतुगिरी नाही का ?

आताच गणेश चतुर्थी झाली. बऱ्याच जणांनी पहिली सेल्फी पहिली फोटो काढून स्टेटस् ठेवणे मग दर्शन. लोकांना काय पडली आहे तू कोणत्या देवाच दर्शन करायला गेला आहेस की नाही . बाकीचे ही तेच करतात.आपल्याला जीवनातला रस च जिवंत नाही ठेवायचा अस का?

जगा आहे तो वेळ जो आपल्याला दीला आहे तो नीट जगा मग लोकांना आरामात स्टेटस् ठेऊ शकता. ज्या देवाला मनोभावे भेटण्यास आला आहात त्यांना ही वाटू देत माझा भक्त माझ्यासाठी आला आहे.

आताच च उदाहरण घ्या लालबाग चा राजा सर्वांच्याच लाडाचा बाप्पा रांगेत मर मरून कुठे दर्शन घडत त्यातही नतमस्तक होऊन दर्शन घेणं हे कुणा लाही जमत नाही पहिलं फोटो काढा. का ? तर लोकांना कळलं पाहिजे मी लालबागच्या राजाच दर्शन घेऊन आलो. पण खरच का ? दर्शन नाही फक्त पाहून आलात अस होत ते. त्यांना पाहिल्यावर आपण त्यांच्यात हरवून जाऊ इतका भाव असन म्हणजे ते दर्शन असत.

आपल्या नात्याला तील रस आपण स्वतः च घालवत आहोत. आपल्याला आवडतील असे छंद जोपासा तुम्ही ही पुढे जाल आपला देश ही पुढे जाईल. आपला देश अजूनही विकसनशील आहे हे विसरू नका. काहीतरी अस करा की विकसित मध्ये गणना केली जाईल.

सोशल नेटवर्क च्या आहारी जाऊन आयुष्य उध्वस्त करू नका. जीवन अमूल्य आहे. उंच धबधब्यात जाऊन मस्त जगा सेल्फी च्या नादात जीव नका गमावू. खरच आपल्याला कुठ पर्यंत मोबाईल पासून दूर राहता येईल याची काळजी घ्या. आणि खरच खूप गरज आहे. आयुष्यात प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. चांगला आणि वाईट , या गोष्टीचा जितका चांगला उपयोग आहे तितका वाईट ही आहे. हे कृपया ध्यानात घ्या. आपल्या शरीरावर याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. होत आहे. हे विसरू नका. मेंदू, डोळे, कान , हृदय विचार करायला गेला तर सर्वच इंद्रिय जम्यात धरुनच चला.

जेवणाच ताट हे अन्नपूर्णा माता ते समोर येताच आपण त्याचे पिक काढून स्टेटस ला ठेवतो. खरच गरज आहे का? आपल्याला तितकं अन्न तरी मिळत गरिबांना तितकं ही मिळत नाही. ठेवायचं च असेल तर त्याची रेसिपी ठेवा ना नक्कीच ज्याला आवडेल ते कृती करतील.

लोकल ट्रेन मध्ये जा की बस, किंव्हा रिक्षा सरहास मोबाईल प्रतेकाच्या हातात. खरच हातात मोबाईल असणं याला काय म्हणायचं ? रुबाब ? नाही याला व्यसन म्हणतात.

साधी लोकल ट्रेन पकडायची म्हटल तरी मोबाईल हातात च असतो. वाचलं नीट मोबाईल हातातच असतो. मग जीव गेला तरी चालेल. इतका स्वस्त झाला आहे का आपला जीव. कोणत्या गोष्टीस किती महत्व द्यावं याची जरादेखील कल्पना नसावी का आपल्याला ?

शक्यतो जिथे गरजच नाही तो वेळ मोबाईल नकाच हाताळू . घरातल्या व्यक्तीला आपल्याला वेळ देण्यास नसतो पण व्हॉट्स ॲप चॅटिंग साठी आवरजून वेळ काढतो. खरच हे चुकीचं नाहीय का? आपल्या नात्यातील प्रेम आपणच कमी करत आहोत. अस नाही जाणवत आहे का?
तुम्हाला छंद लागला आहे. तो चुकीच्या दिशेने आहे नाही वाटत का ?

विचार करा पूर्ण आहारी जाण्या पूर्वी …….मी उपाय ही सुचवले असते पण थोडा तुम्हीही विचार करा. म्हणजे मार्ग सापडेल. नक्की च सापडेल.

रुपाली शिंदे
आजरा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular