ऑगस्ट महिन्यात सण उत्सव असलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस नेहमीपेक्षा जास्त आहेत. या महिन्यात तब्बल १५ दिवस बँकांना सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बंद राहणार आहेत.
: कोण कोणत्या दिवशी बँका बंद राहतील
● १ ऑगस्ट २०२१ रोजी रविवार आहे. ८ ऑगस्ट, १५ ऑगस्ट , २२ ऑगस्ट आणि २९ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील.
● दुसरा आणि चौथा शनिवार अनुक्रमे १४ ऑगस्ट आणि २८ ऑगस्ट रोजी असल्याने याही दिवशी बँका बंद राहणार आहेत.
● १३ ऑगस्ट रोजी इंफाळमध्ये १३ ऑगस्ट रोजी पॅट्रियट डे
● १६ ऑगस्ट रोजी पारशी नववर्षानिमित्त मुंबई आणि नागपूरमध्ये बँकांना सुट्टी असेल.
● १९ ऑगस्ट रोजी मोहरम
● २० ऑगस्ट रोजी ओणमनिमित्त दक्षिण भारतात बँकांना सार्वजनिक सुट्टी राहील
● २१ ऑगस्ट रोजी थिरुओणम
● २३ ऑगस्ट रोजी श्री नारायणा गुरु जयंतीच्या निमित्ताने कोची आणि तिरुअनंतपूरममध्ये बँका बंद राहतील.
● ३० ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी निमित्त बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
● हैद्राबादमध्ये ३१ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमीची सुट्टी राहील.
मुख्यसंपादक