तुझ्या मनपटलावर
विचारांचं सततच वादळ उठतं
ब-याचदा तग धरणारे ते मग
कधीतरी उध्वस्त ही होऊन बसतं
धाय मोकलून रडतोस तु
आणि ते मात्र चिंब भिजतं
तुझ्या मनावर आलेला ताण
कदाचित ते,पुढे होऊन सहन करतं
तु बहाल ही करतोस आणि
समोरच्याचे ही स्विकारतोस
सगळा तुझा मनाचा कारभार
सांग कधी त्याला विचारतोस
जगण्यासाठी कधीतरी तु
थकला असशील धडपडताना
पण तु जगावास म्हणून
ते मात्र थकत नाही धडधडताना
अविरत त्याची स्पंदनं
आयुष्य तुझं वाढवायला
मग त्याच्यासाठी काय तुझे योगदान
कधीतरी विचार तुझ्या मनाला
अतिरिक्त भार जसा
अवजड असतो शरिराला
जे अहोरात्र धडधडतयं,तुला जगवायला
थोडसं तु ही जप ना, तुझ्या हदयाला
मनावर पडलेला भार
तुझ्या मनानेच हलका कर
इवलुसंच हदय आहे तुझं
जरा विचारांचा भार कमी कर
आज जरी त्याचा दिवस
तरी आपलं जीवन त्याच्याच हातात
तुझ्यासाठी धडधडणा-याला मग
जपणं आपसुकच तुझ्या हातात
२९/९/२०२०
लेखक-कवी – निशिकांत कांबळे

समन्वयक – पालघर जिल्हा
नमस्कार सर –
जीवनभर आपण फक्त या हृदयावर जगत असतो आणि हृदयावरच प्रेम करत असतो, परंतु याची काळजी आपण घेण्यास विसरतो.
याच हृदयाच्या जीवावर आपले जन्म – मृत्यू अवलंबून असते.
सर – आपण तर थेट या हृदयाशी संवाद साधून त्याच्याशी गप्पा मारलात, खूप छान लेखन केले आहे.
वाचताना आपण आपल्याच हृदयाशी बोलत आहोत की काय असाच भास होतो.
खूप छान कविता आहे…👌👌👌👌👌
खरंच खुपच छान लिहलं आहे.. 👌👌
मस्त लेखन