आज काल पेन उचलत नाही हातांना
तो का ऊचलत नाही माहित नाही.
खूप काही घडतंय बिघडतय
ज्यावर लिहायलाच पाहिजे
पण लिहू वाटत नाही त्या लिहू न वाटण्याला
काय झालय माहीत नाही….
कधी मण ओथंबून जात
अन् कधी कधी बैचेन भवताल पाहून.
पण शब्दच फूटत नाहीत यावर व्यक्त
व्हायला त्या न व्यक्त होण्याला काय झालय
माहीत नाही….
आनंदाच्या डोही आनंदी गोंगाट
अन् दूखाच्या सलणारऱ्या किंकाळ्यानी
बधिर झालेत कान. लांबच सोडा कोण
जवळचंच साद घालतय ऐकूच येत नाही
हल्ली. त्या न ऐकू येण्याला काय झालय
माहीत नाही…
आपल्या असण्याने कोन्हाचा तरी उजळावा
चेहरा, रूमाल व्हावं कोनाचे अश्रू
पुसण्यासाठी. ही मरगळ का जात नाही
एकदाची. तिच्या न जाण्याला काय झालय
माहीत नाही…
माहीत नाही सगळं काही माहीत
असताना.
बोलल पाहिजे लिहील पाहिजे
ऐकलही पाहिजे जे जे चांगलं
ते ते सगळंच केल पाहिजे असंच
वाटतंय फक्त.
होतं कांहीच नाही ….
ह्या कांहीच
न होण्याला काय झालय हे मात्र माहीत
झालंच पाहिजे. तो लकवा गेला पाहिजे
हाताचा डोळ्यांचा मणाचा या साठीच
लेखनी ऊचललीय. लिहीतो
आहे कविता त्यांचा आवाज बनून.
माहीत नसणाऱ्यां साठी …..
जगन्नाथ काकडे
मेसखेडा
मुख्यसंपादक