Homeमुक्त- व्यासपीठ" त्याच्या " प्रेमाची परिभाषा

” त्याच्या ” प्रेमाची परिभाषा

काही वर्षांपूर्वी ची गोष्ट..

त्यामधला शेवटचा भाग..

कारण पहिला भागात त्यांचं मैत्रीचं आयुष्य, अभ्यास, वेगवेगळी आयुष्यातल्या जबाबदाऱ्या , लहानपण हसन खेळण बागडण, आणि नोकरी साठी चाललेली धडपड…..

तो खूप वर्षांपासून एका मुलीवर प्रेम करायचा पणं ती त्याची मैत्रीण होती अगदी शालेय जीवनापासून तेंव्हा त्याला इतकी जाणीव नव्हती की प्रेम काय असत, कस अस्त का कुणासाठी आपल्या हृदयात एका व्यक्तीसाठी एक विशेष जागा बनून जाते,

हृदयाला आपण कोणी सांगत नाही की समोरची एखादी व्यक्ती तुझ्यात सामावली गेली पाहिजे, त्याच्या शिवाय तुला करमल नाही पाहिजे, पोटाची भूक आणि रात्रीची झोप उडाली नाही पाहिजे, होऊन जात प्रेम एकाद्या व्यक्ती बद्दल …
प्रेम,…ह्रुदयात कस जडत याची उकल अजूनही नाही कळली कुणाला,

एक दिवस थोड धाडस करून त्याने तीला सांगितलच मला तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, “त्यावर तिला आश्चर्य झालच साहजिकच आहे,…कारण तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं अस कधी होईल..प्रेम कुणाला ही होऊ शकत आणि जेंव्हा ते होत तेंव्हा जात पात, भाषा, जबाबदारी, नाती, कर्तव्य पैसा, वेळ , परिस्थिती हे पाहून नाही होत ,…तिने त्याच्या प्रेमाबद्दल आदर केला, आभार मानले, प्रशंसा केली, साहजिकच त्या मुलीचं चांगले गुण दिसून येतात..

पण तिच्याकडून तस प्रेम होण अपेक्षित नव्हतं च मुळी कारण प्रेम काही सांगितल्यावर होणार आणि बोलल्यावर जाणवणार अस काही नसत हे त्यालाही माहीत होतच…

खूप वेगळीच व्याख्या आहे प्रेमाची… एक अशी कधीच होऊ शकत नाही,
ती त्याला नेहमी चांगला मित्र मानायची, आणि त्याच्यासाठी ती अंतर मनातल गुपित असलेलं प्रेम होती….
त्याला होता होता इतकं प्रेम झाल की तिच्याशिवाय जगणं , त्याला जमतच नव्हतं….., तिला पहायची गरजच नाही भासायची इतकी ती एखादा फोटो काढून मोबाईल मध्ये जपून ठेवावा तसा त्याच्या डोळ्यात सामावलेली असायची

तिच्याशिवाय त्याच जगणं म्हणजे ,,मधा तला गोडवा, आणि संगीता तला सुर वेगळं केल्यासारख होत…

ना तो तीला स्वतः पासून वेगळं करू शकत होता, ना तिच्या भावनेतून, पणं तिला तिचा तोच जुना मित्र हवा होता कारण तिला त्याच्यावर प्रेम नव्हतं , आणि आयुष्यातली योग्य वेळ ही नव्हती..

तिने खूप वेळा त्याला सांगितलं की .. कृपया थांबव🙏 तुझ प्रेम ..,मला या भावना मनातून नाही समजत नाही जमत

खूप विचार करून त्याने काही निर्णय घेतले आयुष्यातले…
त्याने तीच्यापासून दूर जाण्याचा विचार केला, कारण तो मित्र मित्र राहिलाच नव्हता, तो खूप दूर निघून गेला होता. …त्याच्या प्रेमाच्या विश्वात….

‌बस होत तर फक्त आणि फक्त प्रेम पणं हे प्रेम अश्यावेळी जडल ज्यावेळी काहीच होऊ शकत नव्हतं… कर्त्यव्य खूप होती नाती होती जबाबदारी, पणं त्याने प्रेमाचा हात न सोडण्याची जिद्द बाळगून ठेवली ,तसा तो वेगळाच होता इतरांपेक्षा …

‌आयुष्यातल्या भरपूर गोष्टी मिळत नाहीत काही मिळतात, आयुष्यात प्रतेक गोष्टीत मन मारायचं गरजेज आहे का, एखादी भावना मनापासून आहे तर ती मी आयुष्यभर जगू शकत नाही का,

त्या व्यक्तीला आपल्या सारख्या भावना असतीलच का..
हे का गृहीत धरून जगा,
या भावना आपल्या आहेत आणि मनापासून आहेत

का नाही जगू शकत आपण या सोबत म्हणत त्याने स्वतः ला खूप तयार केलं….

आणि तिच्याशिवाय पणं तिच्या आठवणीत ते प्रेम जपण्याचा ध्यास घेतला,
आणि तो एकच उत्तर तिच्या प्रियसी ला देऊ शकला..

माझ्यासारखे खूप भेटतील मित्र मैत्रिणी तुला पणं माज हृदय तुला साद घालत..अस प्रेम हजारावर नाही होत

वाईट वाटून घेऊ नकोस एक मित्र आयुष्यातून कमी झाला म्हणून पणं त्याच्यासोबत तू नेहमी आहेस…आणि तो तुझ्यातच जगणार आहे तुला जपणार आहे….

तिच्या आवडत्या रंगाचा शर्ट घालून रुबाब दाखवण्याचा एकच उद्देश असतो त्याचा , इतरांचे जीवनसाथी त्यांच्या हातात हात घालून असतात, माझा जीवनसाथी माझ्यात आहे आणि त्यात मी खूप आनंदी आहे….असा भास होता त्याचा

खूप दिवसांनी आपल्या प्रेयसी ने आपल्या ला एखाद आलिंगन द्यावं असा भास व्हायचा त्याला…

तिची अवस्था आणि त्याची मनची स्थिती एकमेकांना नीट कळत होती म्हणून एक मेकांना नेहमी खुश पाहण्यासाठी त्यांचा विचार असायचा…तिने त्याचं प्रेम समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याने मैत्री निभवयचा मनापासून प्रयत्न केला…पणं यात फक्त गोंधळ उडत होता,

प्रतेक गोष्टीत HAPPY END व्हावा गरजेचा नसतो पणं अस प्रेम आणि आणि अशी मैत्री लाभायला पणं नशीब लागत

आयुष्य म्हणजे मिळवण्यासाठी नसत , समोरच्याला देण्यासाठी पणं अस्त…कधी एकमेकांत जगण्यासाठी अस्त कधी एक मेकाशिवाय,..
कधी एक वेळ तो ही तिला बोलला होता तुला माझ्यावर प्रेम नाही मला काही वाईट वाटत नाही आणि माझी इच्छा ही नाही की तुला माझ्यावर प्रेम व्हावं,…

कारण ….
अस होत की आपल्या आठवणीत तिच्या डोळ्यातून पडलेला एक थेंब ही त्याला कधीच पाहायचा नव्हता…

प्रेम म्हणजे प्रेम असत
हे कुणाचं अस्त कुणाचं नसत
हे कोण ठरवत आणि कस होत
माहीत तर नाही
पण जेंव्हा कुणावर होत तेंव्हा आयुष्यात
प्रतेक गोष्टीत प्रेमच प्रेम अस्त…
मग सकाळ हसरी असते,आणि रात्र चांदण असते,
तिचा हसरा चेहरा पाहून आपल गाल हसतात,
दिवसाचा दिवस ही त्यात आणि घड्याळाचे काटे ही त्यात जुळतात,
देवाचं नाव घेतल की जितक समाधान आत्म्याला मिळत,
तितकच समाधान त्याच आपल्या तल असण्यान अस्त,
मन कधी तहानेला चातक आणि आणि भुकेलेल पोट ही अस्त,
प्रेम आनंदी अस्त दुखी अस्त कधी रडवत कधी हसवत ,
पण जेंव्हा होत तेंव्हाच ते कळत,
आणि जेंव्हा ते होत तेंव्हा जग खूप वेगळं अस्त,
प्रार्थनेत विश्वास असतो, आणि विश्वासात सुद्धा प्रेम अस्त,
प्रेम देवाची पूजा असते कधी श्याम कधी राधा असते,

जमल तर कधी माफ कर तुझी मैत्री निभावू शकलो नाही ग,
प्रेम म्हणजे प्रेम आहे मीच माझा नाही राहीलो ग ,
मला जगू दे प्रेमातच नाहीतर माझा श्वास अडखळायला लागेल,

कधी कधी वाटतं माज तुझ्यावर प्रेम आहे हे सांगून मी खूप मोठी चुकी केली,
पण सांगणं ही तर नियती होती त्याशिवाय तुला ही जीव लावणार कोणी आहे कळलं नसत आणि माझा ही तुझ्यावर किती जीव जडला होता हे मला कधी कळलं नसत..

आज सांगणं खूप गरजेचं होत नाहीतर तू माझ्या प्रेमाला नकार दिलस म्हणून मी बोलायचं बंद झालो अस तुला वाटेल,

तस काही नसून माझ्यातल तुझ असन या सोबत मी जगत आहे आणि यात मी खूप खूष आहे…

मैत्री तला म मला कळत नाही य आता, आणि प्रेमाचा प मी तुला नाही समजवू शकत…..
वास्तविकते चा व तर दूरच राहिला….

प्रेम हे प्रेम असत झालं की कळत की त्याच्याशिवाय जगणं ही प्रेम अस्त आणि त्या सोबत च जगणंही प्रेम अस्त

तुला दुखवून मीही काही आनंदात जल्लोष नाही करत आहे
माझ्या पेक्षाही चांगला मित्र तुला लाभो हीच एक ईश्वर चरणी विनंती आहे

तू खुश रहा तुझ्या आयुष्यात माझ्या प्रेमामुळे ,
तुझा गोंधळ नाही उडला पाहिजे तुझ्या कर्तव्यात आणि जबाबदारी पासून मी तुला दूर नाही करणार,

कधी भेटलीस या धावत्या जगात कुणासमोर तर आदराची एखादी हाक नक्की देईन मी,
तूझ्या सोबतचा जगण्याचा ध्यासाने मला तुझ्या पासून च दूर करून टाकलं,
अस कस प्रेम अस्त की काळजाच्या तुकड्या शिवाय हृदय धड धडू शकत,
शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असत हे कुणालाच नाही कळत अस्त……..

  • रुपाली शिंदे
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular