Homeमुक्त- व्यासपीठदुसरा भाग - तिच्या पेक्षा " तो " तिच्यात जास्त झाला...

दुसरा भाग – तिच्या पेक्षा ” तो ” तिच्यात जास्त झाला …

तिच्या पेक्षा तो तिच्यात जास्त झाला या कथेचा तो म्हणजे “प्रतीक” आणि ती म्हणजे “प्रीती” आहे मी आतापर्यंत नाव दिलं नव्हतं कारण माझं कथेचे शीर्षक च तिच्यापेक्षा तो जास्त झाला असं होतं आणि त्या शीर्षकाला समजून घेणं खूप गरजेचं होत माझ्या कथेला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल माझ्याकडून मनःपूर्वक आभार प्रेम एक सुंदर संकल्पना आहे आणि ती माझ्या दृष्टिकोनातून मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे आशा आहे हा दुसरा भाग सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल धन्यवाद

…….

प्रीती चे दिवस नेहमीप्रमाणेच रोजच्या रुटीने चालू होते ती स्वतःला आपल्या जबाबदारीत आपल्या घरच्या कामात , नातेवाईकात , मित्रमंडळीत, आई-वडिलांसोबत प्रेमाने राहत असे,…आणि “त्याच्या आठवणीत….”

एक दिवस प्रतीक आपल्या कामानिमित्त तिच्या शहरात आला होता त्यावेळी त्याने तिच्या साठी काहीतरी सरप्राइज भेटवस्तू आणि काही कॅडबरी चॉकलेट्स घेऊन आला होता, भेटण्यासाठी तो ही उत्सुक होता …
एकदाचा ट्रेन मधून उतरला आणि पहिला तिला भेटण्यासाठी गेला तिच्या ऑफिस मध्ये…बऱ्याच दिवसांनी तिला त्याने दुरूनच ऑफिस च्या कॅन्टीन मध्ये पाहिलं….हसत होती छान पैकी स्टाफ सोबत तितकच मोजक हसन, डोळ्यातला तो तेजपणा मला पाहणारा,…ओठावरच गुलाबी हास्य…काय करू जाऊ का पुढे की देऊ कुणाकडे हे सर्व….

मला पाहून ही पुन्हा भाऊक होईल हे हसन तिचं थांबेल…एकटक तिची मला शोधणारी नजर माझ्याकडेच येऊन थांबेल….आणि पुन्हा मी जाताना तिचा चेहरा पडेल…

म्हणून मी एका प्यून ला आवाज देत ..
. ” भाऊ ऐकाना हे प्रीती मॅडम ला द्या सांगा प्रतीक ने दिलंय अत्यावश्यक कामा निमित्त त्याला जावं लागलं म्हणून कळवा…”

प्युन ” म्हणाले हो देतो ..

प्युन : प्रीती मॅडम
प्रीती: बोला ना
प्युन: हे कोणी प्रतीक म्हणून आले होते त्यांनी दिलं त्यांना काही महत्वाच्या कामानिमित्त जावं लागलं त्यामुळे ते हे देऊन गेले..

प्रीती थोडी बावरूनच : कधी दिलं कुठे गेला तो , कुठून गेला
त्या साहित्याला हातात घेण्या आधीच ती ..
गेट कडे पळत सुटली की कुठेतरी दिसेल , एक नजर त्याला पाहता येईल,…
इकडे तिकडे शोधू लागली …एखाद्या वेड्या सारखी नजर धावत होती…

प्युन मागून आला : …त्यांना जाऊन बराच वेळ झाला मॅडम मी सरांच्या केबिन मध्ये गेलो होतो त्यामुळे तुमचं साहित्य वेळ द्यायला वेळ झाला मला

प्रीती: हताश होऊन…साहित्य घेऊन आपल्या जाग्यावर जाऊन बसली…
का प्रतीक इतकं बिझी काम होत माझ्या पेक्षा महत्वाचं….
“””डोळ्यांतून पाणी गालावरून घसरत कधी पडलं आणि ते गाल सुकले देखील…तोवर ती त्याचाच विचार करत होती…मोबाईल वर एसएमएस प्रतीक ने केला होता
” अग सरांसोबत होतो म्हणून भेटता आलं नाही sorry….”

पुढच्या वेळीस नक्की भेटेन…थोड का असेना ती पुन्हा आपल्या कामात गुंतली आणि पुन्हा तेच ऑफिस सुटून घरी, घरातून ऑफिस आणि कधीतरी तलावा काठी…त्याच्या आठवणीत…

वर्षाचे दिवस ढकलत होते सण येत होते ऋतू बदलत होते, पावसाळा चालू झाला होता…आणि पावसाळा म्हटल की अजून छळणारी पावसाचे थेंब, गार वारा आणि त्या टपोऱ्या थेंबाचा आवाज……मस्तच

जुन महिन्याचा पहिला सन ” वटपौर्णिमा “
आईसोबत प्रीती पणं नेहमी वडाच्या पूजेला जायची…
.. वडाच्या झाडाकडे खूप निरखून पहायची….त्याची होणारी पूजा….आणि प्रदक्षिणा , साडीत नटलेल्या स्त्रिया आणि त्यांचा पोशाख ….

एक कल्पनाच रंगत होती प्रितीची ..
वड जणू हिच्या डोळ्यात च पाहत होता…
वडाच आणि हीच संभाषण चालू होत ..
तूझ्या नजरेत कोण आहे कळतय मला…
खूप प्रेम करतेस वाटत
प्रीती:” हो ” म्हणत
वड: ७ जन्मासाठी सोपवू का त्याला तुझ्याकडे
प्रीती: ७ जन्म असतात की नाही मला माहीत पणं एका जन्मासाठी दिला तरी खूप आहे ” हा एक जन्म सुध्दा ७ जन्मासारखा जगेन मी त्याच्या सोबत”
वड: काय बोललीस तू “तथास्तु” बाळा तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत…म्हणत वडाने आशीर्वाद दिला….

ती जरा वेगळीच होती….म्हणून अशी होती…

हलक्याशा हस्य गालावर आणत प्रीती निघाली तिथून…

घरीच जाताच
प्रितीचे बाबा: बाळ मला काही बोलायचं होत तुझ्याशी
प्रीती: बोलाना बाबा
प्रितीचे बाबा: माझे मित्र सूर्यकांत खूप दिवसापासून आपल्या मुलाचं स्थळ तुझ्यासाठी विचारत आहेत आणि आता तुझा बर्यापिकी करिअर देखील चालू आहे त्यासोबत लग्नाची वेळ देखील आलीच आहे तर आपण त्यांना उद्या पाहण्याचा कार्यक्रम ठेऊ यात का, तू सांग काय वाटत तुला म्हणजे तुला सुट्टी घेता येईल…
प्रीती: ( प्रतीक च्या विषईआतून होणाऱ्या वेदना लपवत, हळू आवाजात) हो बाबा

त्या रात्री काय तिला झोप लागत नव्हती त्याच्या उत्तराची वाट पाहत ती इतके दिवस होती , आणि बाबांना सांगून तरी ती काय सांगणार…

मध्ये च कधीतरी त्याच एक कुरिअर आलं होत तेंव्हा त्याचा पत्ता तिने नमूद करून ठेवला होता…
तिने विचार केला एक शेवटचा प्रयत्न करून पाहते…

म्हणून एक कोरा कागद घेऊन…

प्रिय प्रतिक,

बराच असशील, धावपळ थोडी चालू असेल कामाची पणं तू नेहमी स्वतची काळजी घेतोस , म्हणून म्हटल बराच असशील …
थोडी रागात आहे मी अस जाणवलं असेल असेन ही , तुझ्या सोबत एक स्वप्न पाहिलं होत मी आजही पाहते…

तूझ्या सोबत जगण्याचं, मला माहित नाही प्रेम कसं होत, कोण कधी कसा आवडायला लागतो काय अस्त माहीत नाही, पणं तू मला आवडतोस तुझ्या गुणामुळे, तुझ्या स्वभावामुळे, प्रतेक मुलीला वाटत आपल्या नवऱ्यात ते गुण असावेत जे आपल्याला आयुष्भर चांगली साथ देतील, भाऊ जशी काळजी घेतो तसा तो घेईल, आई बाबांची मांडी जशी शरीर आणि मन थकल्यावर कुरवाळत तस तुझ्या कुशीत येऊन वाटेल, तुझ्या सोबत विश्र्वासाचे , समजूतदार पणाचे , प्रेमाचे बंध अगदी इंद्रधनू सारखे सप्तरंगी असतील…..

तू असा प्रोजेक्ट साठी दूर कामाला असतोस ते एक मान्य आहे पणं तू सीमेवर जरी असतास आणि ६ महिण्याने सुट्टी वर जरी आला अस्तास तरी देखील सुट्टीचे आलेले तुझे पूर्ण ६ महिने खूप प्रेमाने घालवले असते…की त्या गेलेल्या ६ महिन्याचा विरह जाणवला च नसता…

तुझ माझ्यात ल असन हे काय सांगू तुला इतकंच बोलेन की तू ” माझ्यात माझ्यापेक्षा जास्त आहेस”

बाबांनी स्थळ आणलं आहे मला..
खूप दिवस वाट पाहिली तुझी तुझ्या येण्याची ….
तुला नकोच आहे ना मी तशीही …
मी जात आहे खूप दूर आलेल्या स्थळाला मी होकार देत …मी जात आहे तुझ्या पासून खूप दूर….
पुन्हा भेट होणारच नाही…
माझ्यातला तू माझ्यात जास्त आहेस पणं तुझ्यातली मी कधी दिसलीच नाही ती म्हणजे ” प्रीती”

Bye काळ्जी घे,
………..
म्हणत त्याच्यावर असलेल्या रागाचा मनातला एक कोपरा हलका केला…
त्याला एक आवडत टी शर्ट आणि हे पत्र तिने त्या पत्त्यावर कुरिअर केलं..

तसा तर तुम्हा सर्वांना विचार आला असेल की हे दोघं कॉल वर कधी बोलत नव्हते का…
फारसे कधी बोलतच नव्हते कॉल वर कारण काय बोलणार हाच विषय येऊन उभा ठाकत असे नेहमी..

२ दिवस गेले आणि कुरिअर पोहचणार च होत..
आणि मुलांच्या कडून साखर पुड्यासाठी लवकर ची तारीख निघाली होती…
त्यामुळे इकडे प्रीती आईला म्हणाली आई आजी कडे जाऊन येऊ वाटत आहे…थोड कार्यक्रमा आधी जाऊन येईन तर थोड फ्रेश वाटेल…

प्रितीच्या आतल्या गोंधळाचा ठाव फक्त तिलाच होता…

म्हणून साखरपुड्या आधी ती आजोळी जाऊन येणार होते तस तीच आजोळ गोवा मालवण साईड लाच कुठेतरी होत ….

ट्रेन ची तिकीट बाबांनी काढून दिली इकडे प्रतीक च कुरिअर अजून त्याच्या हाती लागलंच नव्हतं एका आठवड्यात तिचा साखरपुडा होता. .

कुरिअर वाला कुरिअर देऊन गेला होता त्याच्या मित्राकडे कॉल अटेंड करून पणं प्रतीक आपल्या कामानिमित्त बाहेर गेला होता आणि त्याला येण्यास किती वेळ लागेल काहीच अंदाज नव्हता…

इकडे प्रीती आपल्या आजोळी जाण्यास निघाली,…प्रवास चालू झाला

ट्रेन च्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्या सोबत प्रतीक मेंदूच्या नसापासून ते हृदयाच्या ठोक्या पर्यंत समुद्राच्या लाटा सारखा दगडावर थडकाव्या तश्या मनाला आतल्या आत थडकत होता…

इकडे प्रतीक नुकताच आला होता प्रवास करून आणि फ्रेश होऊन जेऊन झोपणार च होता इतक्यात कुरिअर कडे लक्ष गेलं…तेंव्हा पाहताच क्षणी त्याने ते उघडलं पणं प्रथम त्याला प्रीतीने दिलेले टी शर्ट भेटल,…ते काढताना..ते पत्र जमिनीवर पडलं…त्यामुळे त्या पत्राकडे त्याची नजर च नाही गेली…..

प्रितीची आठवण काढत तो झोपी गेला…

पहाटे लवकर उठायची त्याला सवय,..त्यामुळे उठून बाथरूम कडे जाताच त्याची नजर त्या पत्राकडे गेली…

तसाच त्याने पटकन उचलून वाचायला घेतलं… पत्र वाचत वाचत थोडा शांतच झाला होता तो …आणि तिच्या लग्नाचं ऐकून….का माहीत तो गडबडला काहीतरी वेगळच जाणवत होत त्याला…आता पर्यंत वाट पाहणारी ती तिचा मी कधी मनापासून विचार का नाही केला….आज ती दूर जाते मला अस्वस्थ का होतय…..मला काय होतंय….तू जाणार माझ्यापासून दूर हे सहन का होत नाहीय….तुझ्यात ल माज अस्तित्व मी का नाही विचार केला…..का…?

काहीही न विचार करता पटकन फ्रेश झाला बॅग घेतली आणि प्रीतीला भेटण्यासाठी त्याची धावपळ चालू झाली….पणं एक ठरवलं की तिला तो कॉल नाही करणार प्रत्यक्षात तिला भेटणार….

ट्रेन पकडली बस चा प्रवास….चालू झाला …इतर वेळी प्रीतीला असणाऱ्या मनातल्या आणि भावनेच्या विचारांची रांग प्रतीक च्या डोक्यात चालू होत्या….
आज का असा मी वागतोय तिला भेटण्यासाठी जीच्यापासून मी नेहमी पळपुटेपणा केला. . काय झालंय मला आज तिच्या दूर जाण्यापासून….
जत्रा भरते तशी वेगवेगळ्या विचारांनी जत्रा भरली होती प्रतीक च्या मनात….

मी जातोय तर खरा पण मी काय बोलणार तिला…

इकडे प्रीती आजोळी पोहोचली होती २ – ३ दिवाससाठी गेली होती ती …

प्रतीक उतरला तिच्या शहरात उतरताच प्रथम तिच्या ऑफिस कडे गेला तिथे त्याने चौकशी केली तर कळलं की प्रीती मॅडम रजेवर आहेत. ..

साहजिकच त्याची वाढलेली चीड चीड…

इतरवेळी खाण्या पिण्या्कडे आणि आपल्या तब्बेतीला जपणारा प्रतीक निघाल्या पासून त्याने काहीच खाल्ल नव्हतं…आज त्याची भूक मेलीच होती…

थोडा संयम बाळगून प्रतीक प्रितीच्या घरी गेला…या अगोदर प्रतीक १-२ वेळा घरी गेला होता त्यामुळे घरच्यांची जेमतेम ओळख होतीच…..

प्रितीच्या डूर ची बेल वाजवत:
प्रितीचे बाबा: कोण ””’दार उघडतं”” प्रतिक बाळ तू
ये ना ये…बऱ्याच महिन्या नी येन केलं…..
प्रतीक: पायाला हात लावत, कसे आहात काका,
हो बऱ्याच महिन्यांनी कामानिमित्त बाहेरच असतो…ना त्यामुळे…. काकी कश्या आहेत आणि प्रीती कुठे दिसतय नाहीय…

प्रितीचे बाबा: अग चहा ठेव प्रतीक आला आहे नी खायला काही तरी घेऊन ये

प्रतीक: प्रतीक ची नजर आज फक्त प्रीतीला शोधत होती……..शेवटी अधीर होऊन पुन्हा विचारलं काका प्रीती…

प्रितीचे बाबा: अरे बाळ ती आजोळी गेलीय, २-३ दिवसा साठी

प्रितीची आई चहा ठेवत….बाळ तू कसा आहेस …

‌प्रतीक :बरा आहे मी काकी , तुम्ही सर्व बरे आहात ना, प्रीती अचानक गेली गावी काही काम

‌बाबा: नाही सहजच गेलीय…थोड फिरून येऊ म्हणाली

प्रतीक : काका प्रीतीचा पत्ता द्याल का मी तिकडेच त्या साईड ला जाईन कदाचित काम निघालं तर तस तर माज फिर्तीच काम,. भेट पणं होईल आणि काम पणं

प्रितीचे बाबा: हो बाळ देतो भेट नक्की ती ही आठवण काढत असते नेहमी तुझी तिलाही बर वाटेल….

प्रतीक: पत्ता घेता घेता बर काका निघतो मी उशीर होतोय…

प्रितीची आई: थांब प्रतीक जेऊन जाशील

प्रतीक : पुन्हा कधी तरी काकी आज खरच खूप महत्वाचं काम आहे…

बर बाबा,.. बर काकी येतो तो दोघांच्या पायाला हात लावत…तो तिथून निघालl,

प्रतीक गुणी होता खूप

आता मात्र प्रतीक च हृदय धड धडत होत…
मिळेल ती बस मिळेल टी ट्रेन ची चौकशी करत तो तिच्या आजोळी जाण्यास निघाला…..

ट्रेन उपलब्ध नव्हती एक बसच भेटली आणि प्रवास चालू झाला…त्याच्या भावनांचा आणि त्याचा सुध्धा…

सीट वर बसला डोळे मिटले आज फक्त त्याला ” प्रीती ” दिसत होती…काय हे प्रीती जेंव्हा जवळ होतीस तेंव्हा कधी नाही जाणवलं आज तुला का मला भेटायचं आहे,…का इतकी ओढ आहे…मी काय बोलणार तुझ्याशी…

ती बस सकाळी पोहचणार होती…त्यामुळे १२-१४ तासांचा प्रवास करत होता….थोड्या विचारांना बाजूला सारण्यासाठी त्याने विचार केला थोडी गाणी ऐकावित. ..

मोबाईल ऑन केला रेडिओ एफएम चालू केलं

Rj prastut
Lyrical : Ishq bina
Music: A.R रहमान
Lyrics: आनंद बक्षी
Singer: Anuradha Sriram, sujatha ,sonu nigam, A.R Rahman,
Movie: Taal

आणि संगीत चालू झालं
इश्क बिना ……….

ऐकत ऐकत त्याला प्रेमाचं महत्व कळत होत .मनाला ला ओढ होती फक्त तिची…. आज फक्त तिच दिसत होती…

प्रतीक गेल्या २४ तासापासून प्रवासात आहे पणं आज त्याला एक एक क्षण वर्षा सारखा जाणवत आहे …असाच तिच्या.आठवणी त झोप लागली त्याला….खूप वेळा पासूनच झोपला च नव्हता…
प्रतीक पोहचत आलेला , ठिकाण आल्यावर कोणी तरी बोललं भाऊ उतरा…तो तसाच उतरून एक हॉटेल पाहू लागला फ्रेश होण्यासाठी …आणि तिथून तिच्या आजीकडे जाण्यासाठी रवाना झाला…

आज एक एक क्षण मात्र निघत नव्हता…

नजरेत फक्त तिला पाहण्या साठी चाललेली धावपळ, हृदय फक्त आवाज देत होत…” कुठे आहेस प्रीती” कुठे आहेस”

एक बस मिळालीच अखेर तिच्या आजोळी सोडण्यासाठी ती पकडुन पत्ता विचारत विचारत अखेर तो त्यांच्या घरी पोहच लाच….. प्रतिक च्या छातीतील धडधड…..काहीतरी स्पीड ने वाढत होते

आजोळी पोहचून प्रतिक दुरूनच दिसणाऱ्या कोणीतरी स्त्री कडे पाहून बोलला

प्रतिक: काकी , मी प्रतीक शहरातून आलो आहे प्रीतीचा मित्र आम्ही एकत्र च काम करतो, कामानिमित्त आलो होतो, प्रीती कुठे…आहे (अडखळतच बोलला)

त्या स्त्री: हो हो ये ना बाळ आत ये,…. प्रतिक ला पाणी देत

त्या काकी: प्रीती सकाळीच तिच्या छोट्या मामाकडे जाणार होती या गावापासून काही अंतरावर राहतात ते तिकडे फारशा बस नसतात म्हणून लवकरच गेलीय ती आज….

प्रतिक : आता मात्र प्रतिक च्या संयमाचा बांध तुटला होता….आता मात्र कुठेतरी डोळे पानावत होते….पणं स्वतः ला आवरत…तो म्हणाला कृपया मला तिथला पत्ता देता का , खूप महत्वाचं काम आहे , इथून मी कसा जाऊ शकतो तिकडे….

त्या काकी: हो चालेल की आता एक बस आहे आताच निघतो स का बघ पटकन त्यांनी त्यांच्या १८ ते २० वर्षाच्या मुलाला आवाज देत…..
” श्री जरा इकडे ये बाळ …

श्री: बोल आई
त्या काकी: या दादांना फाट्यावर सोडून ये जरा बस स्टँड वर आणि प्रीती गेल्या त्या गावची बस मध्ये बसवून ये…

प्रतिक निघाला ही होता तिथून लगेच…आज काहीतरीच ही नियती हे आसमंत रुसला होता जणू … वेड्यासारखा शोधन तिला प्रतीक च
त्याला तिच्यावर प्रेम असल्याचा भास देत होत….

खूप लोकांना ही कथा वाचताना “सिर्फ तुम ” मधल गान आठवलं असेल ” जिंदा रहणे के लिये एक मुलाकात जरुरी है सनम” माझ्या कडे काही गान अस्त संगीत अस्त तरी नक्की ठेवलं अस्त….

तसच काहीतरी प्रतीक च होत होत …
श्री : दादा बस आली
प्रतीक: हो श्री thank u so much , एक काम कर ना हा माझा नंबर तू घे आणि तुझा नंबर मला दे काही गरज लागल्यास मी तुला कॉल करेन,..आणि प्रीतीला मी आलेलो कळवू नकोस … “प्लीज मित्रा”
श्री : हो दादा चालेल
प्रतीक: मी निघतो

प्रतीक चा पुन्हा प्रवास चालू झाला …आता मात्र काहीतरीच संयम तुटत होता….हा वेळ किती जड जड झाला आहे, तुझ्याशिवाय प्रीती, हा निसर्ग मला आज हसतोय…जेंव्हा होतीस तेंव्हा मी एका वेगळ्याच जगात होतो, आपल्या जबाबदारीत मग्न होतो….. प्लीज प्रीती नाही राहवत आहे…..

इकडे श्री : फाट्यावर च थांबला होता त्याचे मित्र भेटले होते , गप्पा मारत काही वेळानंतर घरी जाणार होता …..

इतक्यात त्याला दुरूनच प्रीती येताना दिसली “….

श्री: ( थोड आश्चर्य होऊन) प्रीती दीदी तू गेली नाहीस…
प्रीती: श्री मी अर्ध्यावर गेली आणि मामांचा कॉल आला त्यांच्या कोणी मित्राचा अपघात झाला आहे तर ते शहरात जायला निघालेत तिकडे कोणी नाहीय…ही बॅग पकड चल घरी जाऊ मला जरा अस्वस्थ वाटत समुद्रकिनारी जायची इच्छा आहे please श्री मला सोडून ये तिथे…

श्री: हो दीदी म्हणत हळूच कोपऱ्यात जाऊन त्याने प्रतीक ला कळवल की प्रीती पुन्हा इकडे आलीय म्हणून …..

प्रतिक : कसा येऊ परत श्री
श्री : नेक्स्ट बस स्टॉप ला उतरा आणि या परत…
प्रतीक स्वतःशीच: हे काय आहे …एरव्ही माझी वाट पाहत बसणारी प्रीती आज एका भेटीसाठी इतकी दूर का आहे कधी दिसणार ही…..

श्री : चल दीदी तसच तो घरी येऊन प्रीतीला सोडलं आणि तिने घरात सर्वांना सांगून पुन्हा ती तिथल्या जवळच्या बीच वर गेली…श्री सोडून आला…

इकडे प्रीती समुद्रकिनारी एका दगडावर बसून पहाटेचा नुकताच सूर्योदय झालेला पाहत होती डोळे बंद करून , पक्षांचं किलबिल…पाण्याचा खळ खळ आवाज..सूर्याची लांबसडक किरणे, उसळणाऱ्या लाटा यात गुंग झाली….

तिच्या आत पुन्हा एक विचार प्रवास कऱत होते, इथून पुढे प्रतिक आपल्या आयुष्यात नसणार आहे एक वेगळीच व्यक्ती आपल्या सोबत जोडली जाणार आहे…आणि त्यासाठी मी कुठेच कमी नाही पडली पाहिजे इतकं मला स्वतः तयार खंबीर व्हायचं आहे …..बस….
एकदाच प्रतिकच्या शेवटच्या आठवणीत गुंग झाली ..कारण ती च्या आशेचा किरण आता मावळला होता…
ती जपणार होती ह्रुदयात फक्त ..बाकी पुढे तिच्या संसारात एक चांगली व्यक्ती बनून दाखवायचं होत तिच्या आई बाबा साठी….

प्रतीक : एकदासा पुन्हा त्या गावी पोहचला श्री ला कॉल केला
श्री : हो आलो दादा बाईक घेऊन तसाच त्याने बीच वर सोडलं दीदी आहे तिथे म्हणाला मी जाऊ का तुम्ही या दोघे नंतर..
प्रतीक : ही माझी बॅग घेऊन जा प्लीज
श्री : हो दादा

प्रतीक : थोड थोड पुढे येत खूप दुरूनच तिला पाहिलं आज त्याच्या काळजात काही तरी सर् अस झाल…
धडपडत होत तिला मिठीत घेण्यासाठी…मन..

प्रतीक काही अंतरावर थांबला….जिथून तो तिला नीट पाहू शकत होता

प्रतीक ने कॉल केला तिला…
पहिला कॉल तर तिने नाही उचलला…
दुसरा कॉल केला त्याने…

अखेर अखेर तिने कॉल उचलला..
प्रतीक: हॅलो….(हृदय धढ धडत होत जोरजोरात …)
प्रीती : बोल प्रतीक
प्रतीक : (शांत होऊन) कशी आहेस प्रीती,..
प्रीती: बरी आहे आणि तू
प्रतीक : नाही मी बरा नाहीय….तुझ कुरिअर भेटलं
प्रीती : hmmm
प्रतिक : काही बोलायचं आहे तुझ्याशी कधी अस कोणाशी बोललो नाहीय…
प्रीती : हो ( आज थोडी तुटकीच उत्तर होती)
प्रतीक: तुला माहित आहे मला जरा जरी लाग्ल की तू मला ओरडायची स काळजी घेत जा प्रतीक आपली काळजी आपण घ्यावी,..धावपळ असते..आपली हेल्थ आपण सांभाळावी,.माझ्या आवडत्या वस्तू पासून ते माझ्या प्रतेक काळजी तू आजवर घेतलीस..

प्रीती: ( ऐकत ऐकत डोळ्यातून पाणी निघतच होत..गालावरून अलगद टपोऱ्या मोत्यासारखाआणि विशेष आज हा असा का वेगळा वाटतोय या च गोंधळात ती होती, पणं मन लाऊन ऐकत होती)

प्रतीक: हजारो लाखो वेळा तुझ माझ्यावर प्रेम आहे सांगणं मला कधी समजल नाही ग ,नाही कळत होत मला प्रेम म्हणजे काय…काय असते हे..की दूर पळत होतो माझ्यात कामात राहून,..माझ्या जबाबदारी पूर्ण पाडत होतो आई बाबांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत होतो…या प्रवासात मला तू खूप सांभाळ केला आहेस..मी नेहमी घाबराय चो. ..की माझ्या कामानिमित्त चा हा प्रवास तुला सुखी ठेवील का..की उगाच तुला माझी वाट पाहावी लागेल….
एकदाच कुठेतरी सेटल व्हावं आणि विचार करावा हा एक उद्देश होता….
पण पणं तुझ्या पत्राने मला आतून अधीर करून सोडलं आहे…तू माझ्या साठी किती महत्वाची आहेस हे मला दूर जाण्याच्या कल्पनेने सुधा सहन होत नाहीय…मी ज्या दिवसापासून ते पत्र वाचलं आहे …वेड्यासारखा झालो आहे…तुझ हसन, रुस्न, नजर रोखून पाहण हे अगदी हवं हवस झालय,..
तुझ्यात मी भाऊ आई बाबा दिसत आहेत तर तुझ्यात ही मला माझी सर्व नाती दिसत आहेत (प्रतीक थोडा भाऊक झाला होता)..
गेल्या ३६ तासात ३६ हजार वेळा जीव गेला असावा माझा असा भास होतोय एक एक क्षण वर्षा सारखा जातो आहे…ना जेवलो आहे ना झोपलो आहे…
या ३६ तासमध्ये मी हाच विचार केला की मी इतका अधीर झालो तुझ्याशिवाय तू कशी राहिलीस इतके दिवस माझ्या शिवाय….
तुला शोधतो आहे बस….मला माहित नाही प्रेम काय आहे
पण इतकं माहीत आहे की माझ्यासाठी “प्रेम म्हणजे तू आहेस”

तूझ्या आयुष्यात पुन्हा मला घेशील का ग, कामाच्या धावपळीत जमेल तितका वेळ देईन पणं मला तूच हवी आहेस….मला फारस काही बोलता येत नाही…प्रेमाबद्दल .., या समुद्रकिनारी तुझा असा रडवा चेहरा मी नाही पाहू शकत आहे ग…
तुला शोधत इथपर्यंत आलो आहे एकदा मिठीत घे खूप आस लाऊन आहे बघ…

प्रीती: ऐकताच उभी राहिली ( मागे वळून काही अंतरावर असणाऱ्या प्रतिक ला पाहून अशक्य गोष्ट शक्य होताना पाहून जी अशी काय पुन्हा दोन्ही हात तोंडावर घेत,..ओक्सा बोक्षी रडू लागली की स्वतःच प्रतिक ने तिच्या जवळ जाऊन तिला खांद्याला लावत मिठीत घेतल…
प्रतीक: प्लीज नको ना ग रडूस…प्लीज

आज प्रितीच्या हृदयाच्या आणि डोळ्यांच्या साठलेल्या भावनांना आणि पाण्याला खऱ्या अर्थाने मोकळीक मिळाली होती. .

किमान तीच रडू थांबे पर्यंत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता…जाऊ दे सगळे अश्रू आज साठवून ठेवू नकोस,..इथून पुढे तुझ्या डोळ्यात अश्रू येतील आणू देणार नाही….म्हणत तिला त्याच दगडावर घेऊन बसला होता हृदय जवळ डोक टेकून च होती ती ….
थोडी थोडी शांत होत होती ..रडू थांबल होत
तो डोक्यावर हात फिरवत च होता.
प्रतीक: काही वेळाने … आपण बोलू बाबांशी घरी जाऊन सर्व नीट समजावू…hmm
प्रीती प्रीती बोल काहीतरी एक शब्द नाही ऐकला आहे तुझा….

प्रीती तिच्या तलावाच्या काठावरुन निघत असलेल्या कल्पनेत मारलेल्या मिठी सारखी निद्रिस्त झाली होती…हे पाहून प्रतिक ला कळलं होत की गेल्या ३६ तासात मी झोपलो नाहीय ही कशी असेल कुठे असेल या विचाराने…प्रीती च तर काय बोलावं …अगणित प्रेम होत त्याच्यावर .
आज तो बोलला ” माझ्यात तू माझ्या पेक्षाजास्त झालीस”

बऱ्याच कालावधी नंतर, प्रीती ला शांत झोप लागली होती हे पाहून प्रतीक तिला गोंजारत होता, प्रेमाचा हात डोक्यावरून फिरवत होता …

प्रेमाचे रूप आणि गुण खूप वेगवेगळी आहेत , आपण नेहमी मनाच्या गाभाऱ्यात काय कल्लोळ माजला आहे हे निरखून पाहतच नाही, …. याचं भान या धावत्या जगात जाणून येतच नाही….आज माझ्या या कथेतून मला संदेश द्यायचा आहे सर्वांना की स्वतः ला समजा आणि मुळात प्रयत्न करत रहा…समोरची व्यक्ती मिळाली तरी प्रेम तुमच्यात असणार आहे आणि नाही मिळाली तरी ते प्रेम वाया जाणार नाही…..प्रेम कधी संपत नसत.. मरत नसत प्रेम देण्याची गोष्ट आहे म्हणून त्यात काही स्वार्थ नसतो….काय करू, काय बोलू, ही तुटकी उत्तर जगू देणार नाहीत, प्रेम असेल तर जगा त्यांच्यासोबत नसेल तर कळवा समोरच्या व्यक्तीला जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा गोंधळ नाही उडला पाहिजे

प्रीतीने पत्र पाठवले च नसते तर आज प्रतिक ला ही जाणीव झालीच नसती.

माझ्या लेखातून प्रसिध्दी मिळावी नाव व्हावं अस काही नाहीय पणं माझ्या लेखनातून लाखो लोकांनी वाचलं नाही वाचलं तरी चालेल पण ज्यांनी कोणी वाचलं त्यांच्या आयुष्यात काही चांगल घडतं असेल
मी नक्की लिहिणार…चूक बरोबर मी याबद्दल मी काही बोलत नाही य प्रेम हे मनापासून असेल तर त्याची पूजा करा… जतन करा…जगण्यासाठी प्रेम गरजेचं आहे प्रतेक व्यक्ती वर केलेलं प्रेम ….आज काळाची गरज आहे “प्रेम” जे हरवत चाललय….
वाढत्या नको त्या आणि चुकीच्या सवई…आपल्याला कुठेतरी दूर घेऊन जातंय…..आपल्या व्यक्तीला ओळखा… जगा तिच्यासोबत मग तो कितीही वेळ असो…..

सध्याचं लागलेली “शेर शहा” चित्रपट…कॅप्टन विक्रम बत्रा सरांवर आधारित ते विर जवान शहीद झाले देशासाठी …
त्यांनी देशासाठी आणि त्यांच्या प्रेमिकेवर खूप प्रेम केलं होत…आजही त्यांची प्रेमिका त्याच्यावर तितकच प्रेम करते….हे काही उगाच नसत….
वेड प्रेम अस्त….

माझ्या लेखणीतून आपल्याला काय गोष्टी चांगल्या वाटल्या काय वाईट वाटत आहेत कृपया प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा…

तुमच्या प्रतिक्रिया च काहीतरी नवीन लिहिण्याच सुचवत अस्त आणि मांडण्याचं धाडस देत…

रुपाली स्वप्नील शिंदे
आजरा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular