एक छोटा भाऊ आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो ,मोठा भाऊ लहान भावाला त्यातील एक पेरू मागतो… तेवढ्यात लहान भावाने तो पेरू दाताने कुरतडला.त्याचा मोठा भाऊ काहीच बोलला नाही. लहान भावाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याचा मोठा भाऊ नुसता बघतच राहिला व त्याच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले. तेव्हा त्याच्या लहानग्या भावानेे चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला “दादा , हा घे.हा जास्त गोड आहे.” मोठ्या भावाच्या डोळ्यात पाणी आले.
प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही…
एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत त्याला ठराविक वेळ द्या. घाईघाईत एखाद्या व्यक्तीबद्दल निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते.. कोणत्याही माणसाला समजून न घेता त्यावर गैरविश्वास दाखवु नका… प्रत्येक माणूस वाईट नसतो. या जगात काही चांगलीही माणसं आहेत… आपला जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला.जग खुप सुंदर आहे. कदाचित समोरचा व्यक्ती आपला चांगला हितचिंतक असु शकतो….
लेखक –
रमेश पवार ( पंढरपूर )

मुख्यसंपादक