Homeमुक्त- व्यासपीठसरपंच उपसरपंच यांना पगार किती व कसा मिळतो ?

सरपंच उपसरपंच यांना पगार किती व कसा मिळतो ?

आपल्या गावातील मिनी मंत्रालय म्हणजे ग्रामपंचायत होय सर्व शासकीय ग्रामविकास योजना आपल्या गावांसाठी विविध निधी उपलब्ध करून घेण्याचे काम गावातील लोकांनी सर्वांच्या लोकनिवडी मधून आपले बहुमोल मत देऊन निवडलेली व्यक्ति म्हणजे सरपंच उपसरपंच होय सरपंच उपसरपंच गावांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक वैद्यकीय विकास साधणारा असावा. तो कोणत्याही पक्षाच्या हातातली बाहुली नसावा. विकासात आगोदर गाव नंतर राजकारण अस मत असणारा असावा. माझं गाव माझी ग्रामपंचायत अस मत असणारा असावा.
सरपंच व उपसरपंच मानधन पगार ग्रामपंचायत सदस्य मानधन ग्रामीण भागाच्या विकासासामधये पंचायत राज संस्थेचा खूप मोठा वाटा असतो. ग्रामपंचायत प्रमुख असलेल्या सरपंचाला फार मोठी जबाबदारी असते. घटनादुरुस्ती मुळे सरपंचाला पूर्वीपेक्षा अधिक अधिकार व कर्तव्ये प्राप्त झाले आहेत. आणि त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामाचा भार देखील तितकाच वाढला आहे. काळाच्या ओघात वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील विविध सरपंच संघटना. संस्था व लोकप्रतिनिधी कडून वेळोवेळी सरपंच उपसरपंच मानधन पगार वाढीसाठी सतत मागणी होत असताना आपणाला दिसतें म्हणजे गावाच्या विकासासाठी नेमलेल्या सरपंच उपसरपंच यांची सुध्दा संघटना आहे हे आपल्या ध्यानात येते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम. १९५८ मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज संस्था असल्याकारणाने पूर्वी सरपंच उपसरपंच मानधन पगार ग्रामपंचायत सदस्य यांना बैठक भत्ता येत नव्हता नंतर ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णय. १ ‌नुसार. ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न विचारात घेऊन सरपंच उपसरपंच यांना मानधन देण्याची संकल्पना शासनाच्या ध्यानात आली.
सरपंच उपसरपंच मानधन पूर्वी सरपंचांना मानधन मिळत नव्हते दि. २१ जानेवारी २००० पासून सरपंचांना मानधन व ग्रामपंचायत सदस्य यांना बैठक भत्ता देण्याची सुरुवात झाली. सुरवातीला सरपंचांना ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न लक्षात घेऊन सरपंचांना लोकसंख्येनुसार. २००/३०० व ४०० रूपये इतके मानधन दरमहा ग्रामपंचायतीकडून देण्यात येत होते. आणि ग्रामपंचायत सदस्यांना प्रति बैठक दरमहा रूपये १० इतका भत्ता सन २००० पासून देण्यात येत होता. दिनांक. १ जुलै २००१ पासून ग्रामपंचायत लोकसंख्या निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंचांना पुढे २००९ चे शासन निर्णयानुसार सुधारणा करून ६ सप्टेंबर २०१४ चे शासन निर्णयानुसार सरपंच उपसरपंच मानधन १०००/१५००/२०००/ अशी वाढ करण्यात आली तर ग्रामपंचायत सदस्य यांना रुपये २०० प्रति बैठक अशी तरतूद करण्यात आली त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० वया जयंती औचित्य साधून दिनांक ३० जुलै २०१९ सरपंच उपसरपंच मानधन सदस्य बैठक भत्ता यामध्ये वाढ करण्यात आली मानधन वाढीसोबत उपसरपंचाना देखील मानधन देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला
२०२१ नुसार सरपंच उपसरपंच मानधन व पगार. दिनांक १ जुलै २०१९ पासून राज्यातील सरपंचाच्या मानधनात वाढ केली तसेच उपसरपंचाना या अगोदर मानधन दिले जात नव्हते. ग्रामपंचायत लोकसंख्या निहाय. वर्गवारी विचारात घेऊन सरपंच व उपसरपंच यांना खालील प्रमाणे मानधन / पगार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. संदर्भ. शासन निर्णय क्र. व्हिपी एम २०१९ / प्र क्र २५५/ पंरा ३
० ते २००० लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत

  • सरपंच दरमहा मानधन ३०००
    ‌* उपसरपंच दरमहा मानधन १०००
  • ‌ शासन अनुदान टक्केवारी ७५/ टक्के
    ‌* सरपंच अनुदान रक्कम २२५०
    ‌ * उपसरपंच अनुदान रक्कम ७५०
    # २००१ ते ८००० लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत मानधन #
  • सरपंच दरमहा मानधन ४०००
    *उपसरपंच दरमहा मानधन १५००
  • शासन अनुदान टक्केवारी ७५/टक्के
  • सरपंच अनुदान रक्कम ३०००/
  • उपसरपंच अनुदान रक्कम ११२५/

८००१ ते जास्त लोकसंख्या असलेली गावे ग्रामपंचायत मानधन

http://linkmarathi.com/मला-मांजर-ओसीडी-का-लागली/
  • सरपंच दरमहा मानधन ५०००/
    *उपसरपंच दरमहा मानधन २०००/
  • शासन अनुदान टक्केवारी ७५/ टक्के
  • सरपंच अनुदान रक्कम ३७५०/
  • उपसरपंच अनुदान रक्कम १५००/
    म्हणजे सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणारे मानधन व त्यावरील खर्चापैकी ७५/ टक्के खर्च शासन उचलते उर्वरित २५/ टक्के मानधनाची रक्कम ग्रामपंचायत सवनिधीतून कर वसूली मधून देण्यात येते.
    # ग्रामपंचायत सदस्य मानधन ग्रामपंचायत सदस्य बैठक भत्ता #
    ग्रामपंचायत सदस्यांना बैठकीस उपस्थित राहिल्याबद्दल रूपये. २००/इतका प्रति बैठक भत्ता ग्रामपंचायत आपल्या स्वतःच्या मिळकतीमधून देण्यात येतो. सदस्य भत्ता आर्थिक वर्षातील फक्त १२ सभासदाकरिता मर्यादित असतो ग्रामपंचायतीने सदस्य भत्ता ( ग्रामपंचायत सदस्य मानधन ) वितरित केल्यानंतर शासनाकडे त्याचा अहवाल पाठवून तो निधी ग्रामपंचायतीस परत मिळविता येतो किंवा समायोजन करण्यात येतो. दिनांक १४ आॅगसट २०१९ रोजीचा ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक व्हिपीएम २०१९ प्र क्र २५५/ पंरा ३ नुसार ज्याप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन थेट बँक खात्यात जमा करण्यात येते त्याच पद्धतीने सरपंच व उपसरपंच यांचें मानधन व ग्रामपंचायत सदस्य बैठका भत्ता आॅनलाइन पध्दतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला ही योजना राबविण्यासाठी ग्रामविकास विभाग व एच डी एफ सी बॅक सोबत करार नामा करण्यात आला आहे

आॅनलाईन मानधनासाठी संगणक प्रणाली

   सरपंच व उपसरपंच मानधन व सदस्य यांचा भत्ता थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची संगणकीय प्रणाली नोंदणी असणे आवश्यक ज्या सरपंच व उपसरपंच सदस्य यांनी अद्याप संगणक प्रणाली नोंदणी केली नसेल तसेच मानधन अप्रापत सरपंच व आधारकार्ड. बॅंक खात्याचा तपशील इत्यादी देऊन त्वरित नोंदणी करून घेणे गरजेचे आहे आशा सूचना दिनांक २५ मार्च २०२० रोजी देण्यात आल्या होत्या. 

# मानधन कर्मचारी वेतनात ग्रामसेवक यांची जबाबदारी व कर्तव्य #
सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भत्ता आणि ग्रामपंचायत कर्मचारी वेतन आॅनलाइन पध्दतीने मिळवून देण्यासाठी संबंधित ग्रामविकास अधिकारी ( ग्रामसेवक ) यांची जबाबदारी असते. ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांची वैयक्तिक माहिती कार्यालयातील उपस्थिती आधार क्रमांक. बॅंक खाते क्रमांक. कर्मचारी निवृत्तीचा दिनांक. भविष्य निर्वाह निधी. इत्यादी बद्दलची माहिती संगणिकृत करण्याचे काम ग्रामसेवक यांनी अद्यावत करावयाची असते गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी. यांच्या मानयतेवर महिन्याच्या ५ तारखेला मानधन/ वेतनाचा अहवाल एच डी एफ सी बॅंकेकडे पाठविला जातो. एच डी एफ सी बॅंकेकडून त्याच दिवशी अथवा दुसर्या दिवशी संबंधीच्या खात्यात मानधन व वेतनाची रक्कम जमा केली जाते
आमच्या गावात आम्हीच सरकार
आमदार खासदार आणि इतर राज्यातील मंत्रीनी सरपंचाच्या शेकडो पटीने मानधन असते परंतु पंचायत राज व्यवस्था पाया असलेल्या ग्रामपंचायत सरपंचाने मानधन अतिशय तुटपुंजे आहे. त्यामुळे राज्यातील सरपंच संघटनेची आजही नाराजी दिसून येत आहे. शासनाने त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या मध्ये वाढ केली. मात्र मानधनाबाबत दुर्लक्ष केले. त्यामुळे सरपंच संघटना वेळोवेळी केलेल्या मानधन वाढिचया मागण्या योग्य वाटतात शेवटी राजा समाधानी असेल तर प्रजाही सुखी होतें
पण मला एक कळत नाही सरपंच व उपसरपंच हे जनतेचे सेवक आहेत मग त्यांना मानधनाची काय गरज आहे. गावाच्या विकासासाठी वार्षिक येणारा निधी कोण कोणत्या कामासाठी किती खर्च करण्यात आला. किती निधी शासनाकडून गावाला आला. कुठ कुठ किती खर्च झाला निधी शिल्लक आहे का नाही. शिल्लक असेलतर कुठ आहे. गावातील विकासाच्या कामांचे ठेके सरपंच व उपसरपंच त्यांनाच दिले आहेत का. कामाचा टिकाव दर्जा. कोण बघत. आपणांस. ग्रामसभेला बोलावले जाते का. आपल्या गावात चावडी वाचन होते काय. सरपंच व उपसरपंच झाल्यावर घरापासून गाड्या. पर्यंत होणारा बदल मोकळा आणि असाच झाला काय म्हणजे यांनी विकासातील किती रक्कम लाटली आहे
आपण ग्रामपंचायत विविध कर भरतो त्यातूनच या सरपंच व उपसरपंच सदस्य यांच मानधन दिले जाते म्हणजे आपण पगाराने नेमलेले कामगार आहेत हे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात सुधारणा व्हावी अस वाटत असेल तर आजच आपल्या ग्रामपंचायतीला भेट द्या आणि जाणून घ्या कारभार काय आणि कसा चालतो आणि काय सरपंच व उपसरपंच यांना मानधन देणे योग्य आहे का?

  • अहमद नबीलाल मुंडे
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular