HomeUncategorized"देणाऱ्यांचे हात हजारोदुबळी माझी झोळी " या उक्तीनुसार सामाजिक बांधिलकी जपत कंजर्वेशन...

“देणाऱ्यांचे हात हजारो
दुबळी माझी झोळी ” या उक्तीनुसार सामाजिक बांधिलकी जपत कंजर्वेशन फाउंडेशन मार्फत शालेय साहित्य वाटप.

गडहिंग्लज (शैलेश मगदूम):- समाजात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कंजर्वेशन फाउंडेशनच्या वतीने प्राची शेठ खेतानी यांच्या स्मृतिदिनानिमित्य विद्यार्थ्यांमध्ये नवचैत्यन्य निर्माण होण्यासाठी विद्यामंदिर हसुरवाडी,हसूरसासगिरी व कडाल येथील शालेय विद्यार्थ्यांना दप्तर,शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.तसेच हसुरवाडी येथील सहा अनाथ व गरजू व्यक्तींना संसार उपयोगी साहित्य वाटण्यात आले.यावेळी कंजर्वेशन फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष घेवडे,शार्दुल गरगटे,राकेश पाटील विद्यामंदिर हसुरवाडीचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बामणे ,उपाध्यक्ष सुजाता घोटणे, हसुरवाडीचे सरपंच संजय कांबळे,पंचायत समिती शिक्षण विभाग गडहिंग्लजचे विषय तज्ञ दयानंद कोरवी ,दशरथ चव्हाण,विजय सुतार,रेश्मा डवरी,शोभा कांबळे,हेमा शेडगे, अश्विनी कुंभार,सुनिल सुरंगे, पालक ,गरजु नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष घेवडे यांनी विद्यार्थ्यांना विविध सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारून अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन कौतुक केले.यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
विद्या मंदिर हसुरवाडीच्या मुख्याध्यापिका पुष्पावती दरेकर यांनी प्रास्ताविक केले तर विद्यामंदिर हसूरसासगिरीचे मुख्याध्यापक श्रीकांत कल्लोळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार संदीप बामणे यांनी मानले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular