Homeक्राईमधक्कादायक.. दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यासाठी पोटच्या मुलालाच संपवलं; माहिमधील घटना

धक्कादायक.. दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यासाठी पोटच्या मुलालाच संपवलं; माहिमधील घटना

मुंबई गुन्हा:दुसऱ्या महिलेशी लग्न करता यावे म्हणून नराधमाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील माहीम परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.

आधीच विवाहित असताना दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यासाठी नराधमाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील माहीम परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

रहमत अली अन्सारी (वय २२ वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. माहीम लिंक रोड परिसरात बुधवारी (19 एप्रिल) पहाटे रस्त्याच्या कडेला एका प्लास्टिकच्या पिशवीत मुलाचा मृतदेह आढळून आला. मृताच्या तोंडाला फेस येत होता. त्याचे डोके व हात उंदरांनी चावले असल्याचेही दिसून आले. शाहुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांना मृत मुलाचे नाव अन्सारी असल्याचे समजले. पोलिसांनी मुलाचे वडील रहमत अली अन्सारी यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.

त्यानंतर चौकशीत त्यानेच मुलाची हत्या केल्याचे कबूल केले. आरोपीने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र, तिने पत्नी आणि मुलाला सोडण्याचा हट्ट धरला.

त्यामुळे आरोपीने 2 वर्षीय मुलाला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घराजवळील गोडाऊनमध्ये नेले आणि तेथे त्याचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, २०१ आणि ३६४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular