Homeमुक्त- व्यासपीठनशा / व्यसन ( Drugs )

नशा / व्यसन ( Drugs )

   आज सकाळपासूनच सोशल मिडिया, टीव्ही वर ड्रग्ज संदर्भात बातम्या ऐकायला मिळत होत्या. सामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेल्या घटना आपल्या कानावर पडल्या तरी त्याचा एवढा वाद निर्माण होताना दिसत नाही, पण हा वाद होता सेलिब्रिटी किड्स चा म्हणून ह्या सर्व बातम्या  सोशल मिडियावर लवकर व्हायरल झाल्या. सिने स्टार चा मुलगा म्हणून मिडिया वाल्यांनी त्याला डोक्यावर घेतलं मग तो अपराध कोणत्या स्वरूपाचा आहे हे जाणून सुद्धा....हे असच चालू असते. कुणी सेलिब्रिटीची मुलं म्हणाले की प्रसिद्धी साठी काही करायला तयार होतात.
   आज ज्या तरुणाला ड्रग्ज रॅकेट मध्ये पकडले तो शाहरुख खान यांचा मुलगा, त्यामुळे सगळे बॉलीवूड हादरले. प्रसिद्धी आणि पैसा एकत्र आले की मुलं ही बिघडतात नाहीतर बिघडवतात. आर्यन खानला पकडण्याचे श्रेय दिले जाते समीर वानखेडे यांना. महाराष्ट्रातले २००८ च्या बॅच मधून आलेले IRS  ऑफिसर आहेत. त्यांची पहिली पोस्ट मुंबई मध्ये छत्रपती शिवाजी महाराज द नॅशनल एअपोर्ट येथे झाली. त्यांची पहिली नियुक्ती डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून आंध्र प्रदेशला  पोस्टिंग झाली नंतर दिल्लीला ही झाली. समीर वानखेडे यांची कारकीर्द खुप मोठी आहे. आजवर त्यांनी सतरा हजार कोटी ड्रग्ज रॅकेट चा पर्दाफाश केला आहे. समीर वानखेडे ह्यांना DIR नार्कोटेस्ट कंट्रोल ब्युरोचे सिंघम म्हणतात.

   समीर वानखेडे या केस मध्ये involved असल्यामुळे एक वेगळेच राजकीय वळण लागले आहे. जिकडे तिकडे हाच चर्चेचा विषय बनला आहे. सामान्य माणसांना जेव्हा अश्या रॅकेटमधे  गोवले जाते तेव्हा त्यांच्या बाबतीत आज सुरू असलेल्या आर्यनच्या केस सारखे पाहायला मिळेल का? सर्व सामान्य माणसाकडून जेव्हा असे अपराध होतात किंवा ते अश्या व्यसनाला बळी पडतात तेव्हा त्यांचे पुढे काय ? हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत असतो. आजची तरुण पिढी आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाहवत चाललेली आपल्याला दिसून येते. जेव्हा एखादा तरुण अश्या प्रकरणात दोषी आढळल्यास त्याला अटक केली जाते तेव्हा असंख्य प्रश्नाचं काहूर मनात साठलेले असते एकतर तो सेवन करीत असेल नाहीतर वितरण, आणि जर कबूल केले तर सरकार त्याला re hab ला दाखल करते आणि ज्यांनी त्याला ड्रग्ज पुरवले त्याचे नाव विचारेल, अश्या केसला लवकर जामीन सुद्धा मिळत नसतो.
 
https://linkmarathi.com/संदीप-महेश्वरी-sandeep-maheshwari-जिवनचर/

   किंग खान सारख्या बड्या दिग्गज कलाकाराचा मुलगा म्हणून त्याला वाचण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र, राजकीय नेते, मिडिया या तरुणाला सोडवण्याचा अटापिटा करत आहेत. आज देशात सर्वानाच या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी जागृत व्हायला हवे. आजची तरुण पिढी अनेक व्यसनांच्या विळख्यात अडकलेली दिसत आहे. कुणी सेलिब्रेशनसाठी  व्यसन करताना दिसत आहे तर जीवनात खुप दुःखी आहे म्हणून व्यसन करताना दिसतात. ज्याच्या जवळ पैसा आहे, आणि ज्याच्या जवळ पैसा नाही तरी असे चरस, गांजा, ड्रग्ज, दारू असे व्यसनांमध्ये अडकलेले दिसतात.
   व्यसनाची सुरुवात आपल्याच आजूबाजूच्या वातावरणात रुजत आहे. आपले मित्र मैत्रीण कसे आहेत हे आधी समजून घेतले पाहिजे. ते जर वाईट मार्ग अवलंबत असतील तर आपणहून त्यांचे अनुकरण करणे चुकीचे आहे. व्यसन कुठलेही असो, त्या व्यसनाची भयानकता खुप वाईट आहे, जीवन बर्बाद करणारी आहे. तंबाखू, दारू, गुटखा प्राशन केला तर त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. पण ड्रग्जला कोणताही वास नसतो. हे जर तुम्हाला एखाद्या खाद्यपदार्थांवर, मिठाईतून, पेयातून दिले तर समजून सुद्धा येणार नाही. एखाद्याला त्याची सवय लावण्यासाठी त्याचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी अश्या प्रकारचे गुन्हे घडताना दिसतात .

   आजकालच्या, "रेव" पार्ट्यांना तरुण मुलं मुली अगदी मद्य धुंद नशेत पाहायला मिळतात कॉलेज, क्लब कुठेही पार्ट्या करताना आजची तरुण पिढी दिसते. त्यात मग चरस  गांजा,अफिम, ड्रग सारखी घातक नशा करताना ही मुलं दिसतात. मग अश्यात पार्ट्यात होणारे वाद, बलात्कार, खून यासारखे गुन्हे घडताना दिसतात. चांगल्या घरातील मुलींचा वापर करण्यासाठी त्यांचे व्हिडिओ बनवून त्यांना lifetime black mail करून त्यांचे शोषण करताना दिसते. नशा ही मनुष्याला नाही तर कुटुंबाचा नाश करते. नशेसाठी पैसा लागतो मग त्यासाठी घरातील वस्तू, दागिने सुद्धा घ्यायला असे व्यसनी माणसे मागेपुढे पाहत नाहीत. व्यसनांच्या आहारी गेलेल्या मनुष्याचा शेवट हा मृत्यूनेच होतो.

   आजच्या तरुणाईला लागलेले हे विषारी व्यसन समाजात खुप घातक ठरताना दिसत आहे. घरातील एकाच्या व्यसनामुळे सगळेच कुटुंब उध्वस्त होताना दिसते .व्यसनाच्या आहारी जावून स्वतःबरोबर इतरांचे आयुष्य संपूनच ही पिढी बर्बाद झालेली उदाहरणे पाहायला मिळतात. व्यसनाधीन मनुष्य आपल्या आरोग्यावर होणारे परिणामाचा विचार घेताना विचार करत नाही मग त्यानंतर तंबाखू मुळे होणारा तोंडाचा कॅन्सर, दारूमुळे यकृताचे आजार, प्रसंगी मृत्यू ही ओढवला जातो. आपल्यामुळे कुटुंबाचे नुकसान होत आहे ही भावनाच मरून जाते.

   व्यसन सोडण्यासाठी मनुष्याची मानसिकता सकारात्मक हवी. तरच आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघण्याची प्रबळ इच्छाशक्ती ह्या व्यसनातून बाहेर काढू शकते तरुणपिढी ने आपली सद्सद्विवेक बुध्दी जागेवर  ठेवून होणारे अपराध टाळता येवू शकतात. नशेच्या दुष्ट चक्रात अडकलेला मनुष्य या चक्रव्युहातून बाहेर पडणे कठीण असून काळाची ती गरज आहे.

लेखिका- सुनेत्रा प्रशांत नगरकर
( अहमदनगर )

http://linkmarathi.com/संदीप-महेश्वरी-sandeep-maheshwari-जिवनचर/
http://linkmarathi.com/एक-चूक/
http://linkmarathi.com/मी-वेश्या-आहे-म्हणून-समाज/
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular