Homeमुक्त- व्यासपीठनावात काय आहे ? नावात बरेच काही आहे ,

नावात काय आहे ? नावात बरेच काही आहे ,

माझ्या लग्नाची पत्रिका सासरी पोहचली आणि ताडकन ह्यांचा फोन आला….
अग, तुझे नाव चंदा आहे?
हो….आत्ता समजले का तुम्हाला…. लग्न ठरून 3 महिने झाले आणि तुम्ही आत्ता हा प्रश्न मला विचारत आहात , नाही समजले मला….
तसे नाही ग मला वाटले तुझे टोपण नाव असावे…
एवढे बोलून ह्यांनी फोन ठेवला. असे वीचरण्यामागचे रहस्य मला कळले नाही आणि मीही जास्त डोके लावले नाही. घरात लग्नाची धावपळ चालू होती . हे काय बोलले हे ही मी विसरून गेले…
लग्नाच्या दिवशी नाव बदलण्याचा विधी चालु झाला… ह्यांनी ताम्हनात असलेल्या तांदळात नाण्याने माझं नाव “सुधा” लिहिले आणि मी ” चंदा” ची “सुधा” झाले.. नाव बदल्याचे त्या क्षणी मला काही वाटले नाही…हे माझ्या नावात बदल करणार आहेत हे मला माहीतही नव्हते….
लग्न निर्विघ्नपणे पार पडले…
रेशन कार्ड मध्ये माझ्या नावाची “सुधा” या नावाने नोंद झाली. गॅझेट मध्ये ही चेंज करण्यासाठी लागणाऱ्या formalities पूर्ण झाल्या..
सुरवातीला “सुधा” नावाने कोणी हाक मारले तरी मला समजत नव्हते. ही व्यक्ती मलाच बोलवत आहे कळायला, या नावाशी माझे नाते जुळायला, हे नाव आपलेच आहे हे समजायला मला जरा कठीणच जात होते.. वयाच्या 26 वर्षा पर्यंत “चं दा” नावाची सवय एकदम एका दिवसात मोडेल तरी कशी? हळूहळू या नावाची सवय होत गेली…
गॅझेट मध्येही नाव change झाले. त्याच्या 4/ 5 कॉपीज आम्हाला by post मिळाल्या.. पान नंबर 7 वर “चंदा” चे “सुधा” नाव प्रिंट होऊन आले. हे नाव बघताच मन अगदी हळवे झाले आता आपली “चं दा” नावाचे identity पुसली जाणार या विचाराने मी अगदी हळवी झाले…माझ्या आईने सगळ्यांना बोलवून, माझ्या अत्त्या ने कानात कुरररर करून ठेवलेले नाव आता इतिहास जमा होणार …26 वर्ष “चं दा” या नावने ओळखणारी मी आता केवळ एका दिवसात सासरच्यांनी नाव change केलं म्हणून नवीन नावाची माझी ओळख आत्ता क्षणी तरी मी accept करायला मुळीच तयार नव्हते…डोळ्यात पूर आला होता. डोळ्याच्या किनाऱ्याचा बांध फोडून तो माझ्या गालावर वाहू लागला. रडून डोळे सुजले होते आणि लाल ही झाले होते….
संध्याकाळी हे घरी आल्यावर माझा चेहरा बघून खूप घाबरले….ह्यांना बघून मला खूपच राग आला आणि अजून जोरजोरात मी रडू लागले…रडतच गॅझेट ची कॉपी ह्यांच्या हातात ठेवली …मी का रडत आहे हे मी न सांगताच ह्यांच्या लक्षात आले….
नावात बदल करण्यामागाचे रहस्य अत्ता उघडकीला आले..ह्यांच्या काकांचे नाव “सुभाशचंद्र” एवढया मोठ्या नावाने त्यांना कोणी हाक मारण्याचे कष्ट कोणीही घ्यायला तयारच नव्हते . सगळेजण त्यांना ” चंदा” म्हणत .. हे ही त्यांना “चं दा काका ” च म्हणत असे.. सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे सासरचे सगळे मला ” सुधा” या नावाने हाक मारत पण मोठ्या काकू च फक्त मला ” चं दा” म्हणत ..
” काय काकू नवऱ्याला हाक मारण्याची हौस पुरी करून घेत आहात वाटत” असे मी मजेने त्यांना बोलत असे..
नाव बद्दलण्यामागाचे सिक्रेट समजल्यावर मी जरा शांत झाले ..ह्यांच्या वरचा रागही कमी झाला होता… आता “सुधा” या नावाची identity मी मनापासुन स्वीकारली होती

कालांतराने काही दिवसात पुन्हा एक मोठे envelop माझ्या हातात पडले .उघडून बघते तर काय गॅजेट च्या 4/ 5 copies आणि पेज नंबर 7 वरच ” सुधा” चे
“चं दा” नाव पाहताच होणारा आनंद शब्दात व्यक्त न करण्या सारखाच होता…

माझ्या भावनांना respect देऊन अहो नि नावात केलेल्या या बदलामुळे पुन्हा मला माझी जुनी आयडेंटिटी मिळाली …. लाखमोलाच एक सुंदर गिफ्ट ह्यांनी मला दिले होते…

प्रत्येक स्त्री लग्न झाल्यावर नवऱ्याचा हात धरून माहेरच्या गोड आठवणी हृदयात साठऊन सासरी येते … तीचे मधले आणि शेवटचे नाव change होते पण atleast तिचे पाहिल्या नावाची तरी identity पुसली जाऊ नये असे मला तरी वाटते..

नावात काय असते. ? …नावात तिच्या गोड आठवणी असतात …ती तिच्या नावाशी भावनिक झालेली असते…. तिला तिच्या नावाचा अभिमान असतो…. नावात बरच काही दडलेलं असते….

http://linkmarathi.com/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%a8/
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular