Homeमुक्त- व्यासपीठनिसर्ग हाच देव व त्याचे विज्ञान हाच धर्म ?

निसर्ग हाच देव व त्याचे विज्ञान हाच धर्म ?

निसर्ग हाच देव म्हणून प्रत्यक्ष स्वरूपात उभा ठाकला असताना निसर्गात आणखी दुसरा देव कल्पून त्या आभासी देवाची आभासी सेवा व प्रार्थना करणे या अवैज्ञानिक कर्मकांडालाच का देवाचे अध्यात्म किंवा धर्म म्हणतात? आभास हा शेवटी आभास असतो. आभासाचे अभ्यासू चिंतन किंवा आभासावर व्यावहारिक विचार होऊ शकतो का? आभासाला का कधी प्रत्यक्ष व्यवहारात आणता येते? निसर्गाला मात्र प्रत्यक्ष व्यवहारातून जगता येतो. निसर्गात जगताना प्रत्यक्षात जाणीव होणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचे व त्या गोष्टींबरोबर प्रत्यक्षात कराव्या लागणाऱ्या नैसर्गिक व्यवहाराचे व्यावहारिक ज्ञान म्हणजेच विज्ञान! मग प्रत्यक्षात असलेल्या निसर्गालाच त्याच्या नैसर्गिक अवतारातला देव मानण्यात व त्याच्या विज्ञानालाच निसर्ग देवाचे अध्यात्म किंवा धर्म मानण्यात चूक काय?

  • ॲड.बी.एस.मोरे©
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular