पंढरपूर (प्रतिनिधी ) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली आहे. मतमोजणी सुरू असताना सुरुवातीला राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत होते. त्यानंतर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली. आवताडे यांनी शेवटच्या फेरीत ३७१६ मतांनी भालके यांचा पराभव केला आहे.
या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत होती. त्यातच पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. १९ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आवताडे यांनी १ हजार मतांची आघाडी घेतली. त्यांचा स्वतःच्याच असलेल्या मंगळवेढा या भागाची मतमोजणी बाकी होती. तेव्हाच आवताडे यांचा विजय होणार हे निश्चित झाले होते.
मंगळवेढ्याची मतमोजणी २० ते ३८ या फेरींमध्ये झाली. तो भाग आवताडेंचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे १९ व्या फेरीनंतरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत होतं. आवताडे यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पंढरपूर तालुक्यात भारत भालके यांना मागच्या निवडणुकीत ६००० मतांची आघाडी मिळाली होती. पण भारतनानांचे सुपुत्र भगीरथ यांना नागरिकांनी तो प्रतिसाद दिला नसल्याचं पाहायला मिळाले. कारण पंढरपूर तालुक्यात भगीरथ यांना कमी मतदान मिळाले.
मुख्यसंपादक