Homeवैशिष्ट्येपर्यावरणीय नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

पर्यावरणीय नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

सोमवार, दिनांक ९ अॉगष्ट २०२१ या दिवसा पासून श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिना सुरू झाला की मग आध्यात्मिक आनंद व वैज्ञानिक जाणीव करून देणारी हिंदू सण व उत्सवांची रांग सुरू होते. आज शुक्रवार दिनांक १३ अॉगष्ट २०२१ रोजी श्रावणातला पहिला सण आहे तो म्हणजे नागपंचमी!

चल ग सये वारूळाला, वारूळाला, नागोबाला पुजायला, पुजायला! पण आता नागोबाची पूजा फक्त स्त्रियांच नाहीत तर पुरूषही करू लागले आहेत. नागोबाला स्त्री पुरूष दोघांनीही पुजले पाहिजे तरच पर्यावरणात संतुलन राहील व निसर्ग खूश राहील. नागोबाची पूजा त्याला दूध पाजून नाही तर तो मानवी वस्तीत चुकून आला तर त्याला जंगलात सोडून करायची. जा नागोबा जा दिल्या घरी तू सुखी रहा असे म्हणत त्याला जंगलात सोडायचे. नागोबा हा सर्पराज आहे म्हणून त्याला संपूर्ण सर्पवंशाचे प्रतीक मानले आहे. अर्थात सापांना मानवी वस्तीतून जंगलात सोडण्याचे पुण्यकर्म (निसर्गकर्म) करायचे. सर्पमैत्रीणी स्त्रिया व सर्पमित्र पुरूष या दोघांचीही (स्त्री पुरूष समानता) या कामी मदत घ्यायची व अशी पर्यावरणीय नागपंचमी वर्षाचे सर्व दिवस साजरी करायची. हिंदू धर्म तत्वज्ञानातील नागपंचमी हा सण निसर्गाच्या या पर्यावरण विज्ञानाची आठवण सर्वांना करून देण्यासाठी आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपण आईवडिलांवर नेहमी माया, प्रेम करतो पण तरी मदर्स डे, फादर्स डे वर्षातून एकदा का साजरे करतो? विसरभोळ्या मुलांना आईवडिलांच्या मायेची आठवण करून देण्यासाठी जर आपण तसे करतो तर मग पर्यावरण शास्त्र विषयाची आठवण माणसांना करून देण्यासाठी हिंदू धर्म तत्वज्ञानातील नागपंचमी सण साजरा का करू नये?

पर्यावरणीय नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • ॲड.बी.एस.मोरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular