खलील लिंक ओपन करून व्हिडीओ पाहू शकता -:
https://www.facebook.com/114377503760034/posts/185245806673203/
कोल्हापूर (धनराज आमटे )- पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा…!!!
संत तुकाराम महाराजांच्या ओवी प्रमाणे , अवघ्या आठ वर्षाच्या वयामध्ये आपल्या बुद्धी चातुर्य आणि हुशारी ची ओळख अख्या जगाला करून देणारा दुर्वांक गुरुदत्त गावडे..!
अगदी लहान पणापासून म्हणजे शाळेत जाण्याच्या आधी पासून आपल्या चौकस बुद्धीने विविध प्रश्नांचा भडिमार करून आपल्या पालकांनाही गोंधळात टाकणारा दुर्वांक…! त्याच्या काही प्रश्नांची उत्तरे आमच्याकडेही नसायचेत.. त्याच्या चौकस वृत्ती मुळे हे पोरगं काहीतरी वेगळं आहे याची जाणीव झाली…!!
सिनियर केजी मध्ये असताना त्याने अबँकस (abacus) चे क्लास जॉईन केले…!! ज्या वयात मुलांना अंकांची ओळख सुद्धा नसते त्या वयात अबँकस ( abacus ) सारख्या बौद्धिक विकासाच्या क्लासमध्ये रमू लागला ..
इवलीशी नाजूक बोटे अबँकस (abacus ) च्या पाटीवर फिरू लागले .. जणूकाही अबँकस चा मण्यांशी मैत्रीच झाली.. !!
सहा मिनिटांमध्ये १०० गणितांची सोडवणूक करणारा हा पट्ट्या हळूहळू आपली चुणूक दाखवू लागला..!!
आणि पहिल्याच झटक्यात राष्ट्रीय स्पर्धेमध्ये २ मिनिट २० सेकंदात १०० गणिते सोडवून त्याने पहिला क्रमांक मिळवला.. आणि सायकलीचा मानकरी ठरला.. ह्या abacus च्या स्पर्धेमध्ये प्रा. प्रणाली आमते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले..!
अबॅकस मुळे त्याच्या बौद्धिक क्षमतेमध्ये भलताच फरक जाणवू लागला याशिवाय त्यांची कष्ट करण्याची तयारी, अभ्यास करण्याची प्रचंड वृत्ती आणि “हे मी करून दाखवणारच” असा दृढ निश्चयी दुर्वांक..!
विविध स्पर्धा,परीक्षा पदक्रांत करीत पुढे पुढे जाऊ लागला…!
शाळेतील राष्ट्रीय विज्ञान ओलंपियाड, आंतरराष्ट्रीय गणित ओलंपियाड यासारख्या अवघड परीक्षेमध्ये सुवर्ण पदक मिळवून आपल्या पराक्रमाची नोंद घ्यायला लावली…!!
NSTSE या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून आपली छाप पाडली..!
या सर्व स्पर्धा आणि परीक्षा याबरोबरच ब्रेन डेवलपमेंट स्कॉलरशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून स्कॉलारलरशिप चा मानकरी ठरला . !
ब्रेनोन ब्रेन ,pazzal मेनिया सारख्या विविध स्पर्धा यामध्ये सुद्धा आपल्या नावाची नोंद केली..
स्पर्धा कोणतीही असो त्यामध्ये दुर्वांक उतरला कि ती स्पर्धा आपल्या नावे आपसूक करेल यात तीळमात्र शंका नाही..!
मागील काही महिन्या मध्ये कोरोना सारख्या महाभयंकर महामारी मध्ये राष्ट्राचे तसेच जगाच सामाजिक आणि आर्थिक खूप मोठं नुकसान झालं..
संपूर्ण मानव जात काहीशी निराशजनक होऊन नाउमेद झालेल्या अवस्थेत होती.. या परिस्थितीमध्ये आपण वेगळं काय करू शकतो हा विचार दुर्वांक करत होता..
ह्यामध्ये मानवी रोगजनक विषाणूंचे संकलन करण्याची संकल्पना त्यांच्या मनात आली..
आणि या कामासाठी त्याने पूर्ण वाहून घेतले..
काहीतरी सिद्ध आणि साध्य करायचं या हेतूने झपाटलेला दुर्वांक , विषाणूंच्या नावाचे संकलन करू लागला ..
त्यासाठी त्याने गुगल तसेच विज्ञानाची पुस्तके ,विज्ञान विषयातील विविध मान्यवरांचे मार्गदर्शन यांच्या मदतीने तब्बल 200 विषाणूंची यादी तयार केली.. या विषाणू ची यादी बनवण्यासाठी दोन ते तीन आठवडे कालावधी लागला…
सदर विषाणूंची नावे इतकी अवघड आहेत की त्यातील दोन जरी लक्षात राहिली तर खूप झाले..” इतकी अवघड..!
ही अवघड नावे लक्षात ठेवून दोन मिनिटे 37sec. मध्ये सांगून विश्वविक्रम केला..
याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली..! या जागतिक विक्रमासाठी chate चे शिक्षक चंद्रकांत पाटील सर यांनी मोलाचे सहकार्य करून कामगिरी पार पाडली..!
ह्या केलेल्या जागतिक विक्रमा बद्दल परवाच झालेल्या २६ चा जानेवारी प्रजासत्ताक दिनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार झाला..!
आठ वर्षाच छोटे बाळ काय करू शकत याचं उदाहरण जगासमोर ठेवल .. याचा जडणघडणीमध्ये त्याच्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा आहे..!
जागरूक पालक कसे असतात याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे
सौ वंदना गावडे व गुरुदत्त गावडे हे आहेत ..!
याच्या सर्व प्रवासामध्ये
त्याच्या प्रशालेचे अध्यक्ष संजय डी पाटील, डायरेक्टर राजश्री काकडे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले…
तसेच abacus चे शिक्षक प्रणाली आमते व धनराज आमते यांचे मार्गदर्शन लाभले..!

मुख्यसंपादक
अभिनंदन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…
👍👍👌👌💐💐💐💐💐💐💐💐