(अमित गुरव ) - आजकाल आपण सर्रास पाहतो औतणी ही दिवसभरात केव्हाही केली जाते. त्यांचे सर्वात मोठे कारण म्हणजे पूर्वी गावात गल्ली-गल्लीत बैल जोडी होती. त्यामुळे कोणीना कोणी शेतात येत होते . पण आज बैलांची संख्या गावात हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि बैलांचा रोजचा खर्च पाहता आता शेतकऱ्यांना ती परवडत नसल्याची खंत काही बैल जोडी मालक करतात.
औतणी ही सकाळी करण्याचा शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शेतात बगळे ,कावळे आदी पक्षी येतात. आणि त्यांना आवश्यक खाद्य खातात. त्यांचे खाद्य हे शेतासाठी अपायकारक असते उदा. किडे , कीटक .
किडे , किडक या मुळे पिकावर परिणाम होतो . पुठे जाऊन औषध फवारणी करावी लागते. त्यामुळे खर्चात वाढ तर होतेच पण रासायनिक औषधाच्या अतिवापरामुळे जमिनीला ही कालांतराने अपाय होऊ शकतो.
त्यामुळे नंतर औषधोपचार करत खर्चात राहण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हे फायद्याचे ठरते.

मुख्यसंपादक