Homeमुक्त- व्यासपीठप्रत्येक योग हा मानवी जीवनात किती महत्वाचा आहे, त्याचे स्पष्टीकरण सिध्रेण ग्रंथातून...

प्रत्येक योग हा मानवी जीवनात किती महत्वाचा आहे, त्याचे स्पष्टीकरण सिध्रेण ग्रंथातून केले- पाटील

मी कालच सिध्रेण या महाराज लिखित ग्रंथाचे वाचन पूर्ण केले. ह्या ग्रंथात महाराजांनी 51 योगांचे वर्णन केले आहे. प्रत्येक योग हा मानवी जीवनात किती महत्वाचा आहे, त्याचे स्पष्टीकरण केले आहे. कोरोना महारोगाची उत्पत्ती, प्रसार, कोरोना कोणत्या गटात येतो, तो इतर रोगांपेक्षा कसा वेगळा आहे, जगामध्ये आत्तापर्यंत आलेल्या महामारी, त्यांचे गट, त्यावर झालेले संशोधन व मानव समुदायाने केलेली मात, युरोप, आफ्रिका, अमेरिका व आशिया खंडामध्ये म्हणजेच संपूर्ण जगात झालेली एकूण युद्धे , त्यातून झालेली हानी व त्यातूनही मानवाने जीवनास दिलेला नवीन मार्ग, त्यानंतर जगात काही देशांमध्ये तयार झालेली शस्त्रास्त्र स्पर्धा, त्यानंतर जागतिक संघटनांकडून शस्त्रवापर प्रतिबंधक करार, शांतता करार, नंतर पुढे जाऊन तंत्रज्ञानात झालेला विकास व त्याचा मानवी जीवनात झालेला बदल या सगळ्या गोष्टींचे अगदी विस्तृत वर्णन केले आहे.

सध्याच्या कोरोना काळात कोरोनावर मात करण्यासाठी Quarantine, personal hygiene, safety, social distancing, sanitization हे का व कोरोना विरोधात किती महत्वाचे आहे, हे अगदी सोप्या भाषेत सुंदर वर्णन केले आहे. कोरोनावर सांगितलेले घरगुती उपाय, काही आयुर्वेदाच्या पद्धती, होमिओपॅथी इत्यादीतील औषधादींचे वर्णन आहे. शेवटच्या काही भागांमध्ये सगळ्यांनी स्वसमाधान, मानसिक स्वास्थ्य यासाठी हे योग फार महत्वाचे आहेत व त्याचे योग्य मार्गदर्शन केले आहे. हा ग्रंथ हे वाङ्मयरूपी अमृत आहे व ते आपण सर्वांनी ग्रहण करून त्याचा लाभ घ्यावा. हा ठेवा इतरांनाही वाचनास उपलब्ध करून द्या.

महाराज हे साक्षात् दत्तावतार आहेत, त्यांनी केलेली ही रचना वाचकास आनंद देते, प्रफुल्लित करून सोड़ते. लिहावे तेवढ़े कमी आहे, मी पुनः आपणास वंदन करून इथे थांबतो.

     !! अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त !!

श्री. दिगंबर पाटील
(M. Sc. Computer Science)
Software Architect, Calsoft Inc.
Pune.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular