Homeघडामोडीगुरव सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर राहुल कोकीळ यांची निवड

गुरव सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर राहुल कोकीळ यांची निवड

( प्रतिनिधी ) -: गुरव समाजाच्या विधायक विकासात्मक वाटचालीत राजकारण विरहित सेवाभावी वृत्तीने कार्य करणा-या गुरव सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर राहुल कोकीळ (तरडगाव – फलटण) यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळ गुरव सेवा संघाच्या सेवाभावी कार्याला विकासात्मक विधायक गती मिळणार आहे. प्रदेशाध्यक्ष राहुल कोकीळ यांना गुरव सेवा संघाची राज्यकार्यकारिणी नियुक्त करणे, गुरव समाजाचे स्नेहमेळावे आयोजीत करणे, गुरव समाजाकडे असणा-या देवस्थान ईनाम वर्ग जमीनी संदर्भात विचार बैठका घेणे, वधु वर सुचक मेळावे आयोजीत करणे असे सर्व प्रकारचे विधायक कार्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

गुरव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी सदरची निवड व नियुक्ती केली आहे.

http://linkmarathi.com/आणि-कविता-जिवंत-राहिली/
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular