आजरा ( प्रतिनिधी ) -: सकाळ पासून उन्हाचा तडाखा कायम होता. पण सायंकाळी ४ च्या सुमारास पावसाने आजऱ्यात दमदार हजेरी लावली. लोक काहीसे काचबारले होते पण उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेले लोक थोडेफार सुखावले असल्याचे जाणवले.
जसा पाऊस गेला तशी लोक घरी मार्गस्थ होऊ लागली ; पण आधीच रस्त्याचे काम त्यात पावसामुळे चिखल किंवा निसरट अश्या अवस्थेत लाईट नसल्याने आजरा ते भादवण या मार्गावर कमीतकमी ७ ते ८ मोटार गाड्या घसरून पडल्याचे चित्र ठिकठिकाणी ऐकायला मिळाले. असाच प्रकार तालुक्यात अनेक ठिकाणी झाल्याचे नाकारता येत नाही. या अपघातात कोणाला खूप इजा झाली असे एकिवण्यात नाही ही एकच आनंदाची बाब म्हणावी लागेल.
मुख्यसंपादक