Homeमुक्त- व्यासपीठप्रेमकथा -: तिच्या पेक्षा " तो " तिच्यात जास्त झाला ….

प्रेमकथा -: तिच्या पेक्षा ” तो ” तिच्यात जास्त झाला ….

माझ्या या प्रेम कथेला शीर्षक च अस काही तरी वेगळं आहे याचा अर्थ असा आहे की तिच्या असण्यापेक्षा त्याच असन, त्याच अस्तित्व तिच्यात खूप आहे……

या जगात प्रतेक मुलगी आपल्या एक वेगळ्याच स्वप्नात असते कुणाला आपला साथीदार दिसत असतो, कुणाला हळद कुंकू आणि मंगळसूत्र, कुणाला आपला जॉब, कुणाला आई वडिलांसाठी काही ना काहीतरी करून दाखवायचं अस्त., कुणाला भाऊ बहिणीसाठी, कुणाला देशासाठी तर कोणी एक अनोळखी व्यक्ती च्या प्रेमात अस्त, तर कोणी ओळखीच्या व्यक्तीच्या प्रेमात ,…उरी प्रत्येकाच्या काही ना स्वप्न नक्की अस्त

ती पणं अशीच मध्यम वर्गीय घराण्यातील मुलगी तशी दिसायला साधी होती, साधेपणा होता तिच्या पेहराव्यात आणि वागण्यात अगदी मोजक पणं छान दिसणारा तिचा लूक…
पणं तिचे विचार आणि वागणं थोड जगाहून वेगळं होत.,,,,,

घरातलं वातावरण तस शिस्तीचं, तस तीच वागणं मात्र स्वतंत्र विचाराच, लहान पणापासून वयात येणाऱ्या प्रत्येक बदलात ती बदलत गेली, तशी तिची विचारसरणी ….

जॉब करायची ती….आपल्या आई बाबा ना प्रेमाने ठेवणे, त्यांच्यासाठी जे घडेल ते करू पाहणे……वगैरे

एकेदिवशी कामावर जात असताना प्रवासात सहजच नजर आभाळाकडे गेली नजरेसमोर ढग मस्त आकार घेत होते स्लो मोशन ने पुढे सरकत होते….उन्हाळा चालू होता…..एव्हाना इतर लोकांना पावसाच्या सरी कोसळत असतात तेंव्हा फीलिंग्ज येतात…हिला तो कधी ही आठवायचा….तो म्हणजे तिला खूप आवडायचा…

त्या ढगात कोणीतरी अलगद तिला तो दिसून गेला जो तिच्या मनात होता….तिच्या मनात असलेलं एक अबोल प्रेम

रात्रीचा स्वप्नांत नेहमी ये जा करायचा कधी कधी ती खूप बैचेन व्हायची…..त्याच्या विचारात मध्यरात्री लाच उठायची,…कसा असेल तो, कुठे असेल अशीच काहीतरी मनात चलबिचल असायची…..

असाच एकदिवस अभ्यास करत बसला होता, असेल कॉलेज मध्ये कदाचित,..
तेंव्हा तिला तो दिसला होता ,
आणि पाहताच क्षणी पटकन मनामध्ये भरला होता,
गुनानेही तो तसा सद्गुणी होता, कारण त्याच घरांनही तस शिस्तीचं…. फक्त थोडा अबोल होता,..

कधी कधी तरी भेट व्हायची ती ही नकळत,
तितकाच वेळ ती त्याला डोळ्यात सामावुन घ्यायला पहायची,
चोरून चोरून आपल्याच डोळ्यांनी आपल्या डोळ्यात मोबाईल चा कॅमेरा कसा सेकंदात क्लिक करून फोटो सेव करतो अगदी तस तिचे डोळे त्याला सेव् करून ठेवायची, कधी हसरा , कधी रागावलेला, कधी शांत असलेला, तर कधी बोलका प्रतेक पोझ मधले तिने त्याचे फोटो आपल्या डोळ्यात साठवून ठेवले होते….

तो ही जरा वेगळाच त्याने कधी मान वर करूनही पाहिलं नाही,
तसा तो मुलींच्या बाबतीत दूरच असायचा,

का कुणास ठाऊक तिला खूप आवडायचा,
त्याच्या या स्वभावाने ह्रुदयात एक कोपरा फिक्स झाला होता,
तिच्या पेक्षा तो तिच्यात जास्त झाला होता…

त्याला काही बोलायला जावं म्हटल तरी तिला भीती वाटायची,
नकळत ती इकडे तिकडे पहायची,
काही न झाल्यासारखं दाखवून द्यायची
काहीतरी रागाने बोलून जाईल म्हणून ती च गप्प बसायची

खूप कालावधी निघून जात होता, असाच तो ह्रुदयात भरत च होता,
त्याच मोजक बोलण, आणि नम्रपणा खूप काही सांगून जायचा,…
मित्रा सोबत कितीही बोलका असला तरीही,
तिला कधी लाईन मारायचा चान्स नाही मिळायचा,

हुशार होता अभ्यासात, उत्तर पत्रिका छान सोडवायचा,
ती विचार करायची एखाद प्रेमपत्र लिहू का याला,
काहीतरी रिप्लाय देइल का माझ्या पणं भावनांचा…..

त्याच्या हसण्याने तिच्या जगात रोपवाटिका फुलायची,
रंगीबेरंगी फुलं आपल्या अवती भवती दिसायची,
प्रेमाची चाहूल अगदी हळूच घर करून जायची,
त्याच्या या स्वभावाने ह्रुदयात वेगळाच अलार्म झाला होता
तिच्या पेक्षा तो तिच्यात जास्त झाला होता..

कधी कधी पहायचं, कधी लपायच, लपंडाव तिचा चालूच होता,..
तो तसा तिला ओळखायचा पणं पाहत कधीच नव्हता,,
एकदा तरी बघ रे कधीतरी तीच अंतर मन नेहमी साद घालायचं…
मला आवडतोस तू , तुला पणं मी आवडेन का रे..
कधीतरी बघ तुझ्या पापण्या अलगद उचलून,..
काहीतरी बोलायचं धाडस किमान मी तरी करेन अस
नेहमी कॉन्फिडन्स ने आतल्या आतल्या ती म्हणायची..

कस काय बोलू तुला आपण पणं मूव्ही पाहायला जाऊ,
पाणीपुरी नसेना एखादया पुरी भाजी वर तरी ताव मारू,
तिच्या अपेक्षांचा अगणित डोंगर वाढत च होता,..
त्याला मात्र तिच्या पाहण्याचा कुठेच काही ठाव नव्हता…

असाच एक दिवस तिनेच विचार केला हा काय मला गुलाबाची फुल देणार नाही,
माज मी च हृदय गुंडळाव,
आणि त्याच्या आठवणीत केसात मोग्ऱ्याच फुल सजवाव,…

परीक्षा झाल्या, महिने गेले, वर्ष गेली, हा कधीतरी अमावस्या पौर्णिमेसारख उगवायचा,
बघून काळजात सर् सारखं काहीतरी व्हायचं…
असाच कधीतरी झळकला,
आणि स्वतः हूनच त्याने हाक मारली,…
गगनात आनंद मावत नव्हता,
तिच्या पेक्षा तो तिच्यात जास्त झाला होता..

ओळख झाली मैत्री झाली, आठवणी काहीतरी जुन्या निघाल्या,..
बोलत बोलत तो तिच्याशी खूप मनमोकळे पणाने बोलत होता,
त्या वेळचा तो आणि आत्ताचा हा यात स्वभावात खूप बदल घडला होता…

भेटणं झालं पुन्हा पुन्हा,
कामानिमित्त बोलचाल वाढली,
“तेरे घर में देर है अंधेर नही भगवान “
इतकं म्हणत देवाची ही तिने थोडी प्रशंसा केली…
तिला पाहून त्याला एकदिवस कळून गेलं,
ती त्याला खूप पसंत करते ..

तिला पाहिलं की तो नेहमी म्हणायचा,
तू मारशील मला अस पाहू नकोस ,
तिचे डोळे त्याला खूप काही सांगून जायचे,
क्षणभर पाहताच नजर हटवून घ्यायचा…,

तिच्या डोळ्यात तो स्वतः ला पाहायचा म्हणून थोडा घाबरट आणि लाजरा बुजरा व्हायचा,…
त्याला बोललं जरी मला तुझ्यावर खूप प्रेम आहे,
तरी विषय बदलायचा…,

का कुणास ठाऊक प्रेमाचा विषय काढला की,
गालात खळी आणायचा आणि हसण्यावर न्यायचा,
तरीही ती खूप त्याला पहायची ,
एक दिवस म्हणाला नको ग करुस इतकं प्रेम,
मला नाही जमत अस काही प्रेम वगैरे,
थोडासा तिच्या ही काळजाला तडा गेल्या सारखं व्हायचं…
समजून घेऊ शकतो थोड ट्राय करेन इतकं बाकी म्हणायचा…

पण हे प्रेम खूप सुंदर वाटायचं म्हणून त्यातच मन रमायच,
जगात काय चाललय काही तिला घेण देण नव्हतं,
तोच एक स्वप्नातलं स्वप्न रंगवत होता,
ढगातल्या आकारात त्याच एखाद चित्र बनून जायचा,
आणि मनातल्या गाभाऱ्यात त्याची प्रतिमा उमटून राहायची,
समुद्रातल्या लाटा प्रमाणे ह्रुदयात खेळत राहायचा,

काही दिवस गेले त्यावर ती एकदिवस म्हणालीच भेटशील का एकदा थोडा वेळ काढून मला काही प्रेमाचं बोलायचं आहे…. खरच मला तुझ्यावर खूप प्रेम आहे…. खरच मला तुझ्यावर खूप प्रेम आहे…

तो थोडा गोंधळात असायचा नेहमी …त्याला ती पसंत होती , तिला दुखी पाहू शकत नव्हता तो….पणं त्याच्या ही कामानिमित्त प्रोजेक्ट साठी बाहेरगावी काही काही महिने दूर राहावं लागत असत…म्हणून तिला खोट्या आशा दाखवायला नको म्हणून नेहमी २ पाय मागेच राहायचा …म्हणून त्याला ही नेहमी वाटायचं काय करावं…न बोलावं तरी मन दुखावलं जातं आणि बोलावं तरी…..

सहज त्याने एक वेळ विचार केलाच आणि एक दिवस वेळ काढून नाश्ता करण्याच्या बहाण्याने ते दोघे भेटलेच, शेवटी दोघांच्या भावना वेगवेगळ्या च होत्या…तिला काही बोलायला सुचत च नव्हतं.. ती तिच्या प्रेमावर ठामच होती…..त्याने ही तिला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न केला ,,.. म्हणता म्हणता बोलूनही गेला .. आपली पुन्हा कधी भेट होईल माहीत नाही…..
मला प्रोजेक्ट निमित्त काही माहिने बाहेर जावं लागतं य..
ती ही थोडी नकारात्मक होकारात्मक उत्तरात दंग होती…..काहीच सुचत नव्हतं तिला काय बोलावं कस बोलावं की ………?

डोळ्यांच्या पापण्या त तिची असंख्य स्वप्न एक एक करून पडतच होती एखाद्या पत्याच्या इमारती प्रमाणे……इतरत्र पडताना दिसत होती…अश्यावेळी तिला काही सुचत नव्हतं….

शेवटी वेळ आली तिथून निघायची जाता जाता म्हणाला मी कुठे सोडू का तुला….
hmmm म्हणत ती ही निघाली…तिला दुखवण्याचा त्याचा काही उद्देश नव्हता पणं …

दोघे बसले कॅब मध्ये जस जस उतरायची वेळ जवळ आली तिच्या हृदयाचा ठोका चुकत होता…अश्यावेळी काय बोलावं की गप्प च राहावं काहीच सुचत नव्हतं तिला,,..
तरीही अचानकच तिने त्याला हल्कस मिठीत घेतलं. त्यानेही प्रतिसाद दिला…निशब्द तिची ती मिठी असंख्य भावना व्यक्त करत होत्या….
दोन्ही तळ हाताना त्याच्या गालावर स्पर्श करून कपाळावर एक किस तिने घेतली….
तो पणं बारीक आवाजात म्हणाला ” काळजी घे तुझी”

ती नेहमी नोटीस करायची याच्या प्रेमाचं तर काही माहीत नाही पण काळजी नेहमी घ्यायचा..
जिथे पणं कामांत असायचा तिथे तो आठवण नक्की काढायचा, कशी असेल ती काय करत असेल, बोलू का तिच्याशी , काय बोलू…..तो ही विचारात असायचा….

असाच त्या क्षणाला आपल्या डोळ्यात कैद करून अखेर ती त्याला बाय करून तिथून निघाली….

ती तिथून निघाली पणं ती तिथून घरी गेलीच नाही..ती थांबली एका शांत ठिकाणी एका शांत तलावाजवळ…..ती खूप शांत झाली होती,……

हळूहळू अंतर्मनात चाललेल्या तिच्या लाटा त्या सागराच्या भरती सारख्या झाल्या होत्या …मेंदूत आणि मनात असंख्य विचार आणि भावना गर्दी करू पाहत होत्या….
त्या गर्दीतून बाहेर निघन्यासाठी तिची धडपड चालू होती….

अलगद तिने आपले पाय जवळ घेतले आणि दोन्ही हात एकत्र करून आपली हनुवटी हातावर टेकवून एकटक तलावाच्या पाण्याकडे कडे पाहत राहिली….

‌तेंव्हाच तीच मन संवाद साधत होत तिच्याशी… बोलक होत होत ….आणि तिला ते ऐकायचं होत………………….

” त्याच्या आठवणीत.”……तू म्हणजे कोण आहेस माझ्यातल कोणत अस्तित्व, तुझ्या माझ्यात असण्याने काय होत मला, का मी अधीर होते, का बैचेन होते,….का थांबते , का अबोल होते,..कधी कधी तर मन बावरते…कधी खुश होते, कधी हस्ते, कधी रडते सुद्धा….भावना म्हणजे काय असतात नक्की त्या एक सारख्या का नसतात….तू असण्याने मी किती खुश असते,…ह्या पाण्यात तुझा चेहरा का दिसतो,..हे क्षितज निळ्या रंगाच्या छटात का इतकं सजून दिसतय… या येणाऱ्या वाऱ्यात तुझा स्पर्श येतोय…जणू तुझ्या जवळूनच तो वारा आला असावा…पावसाचे अबोल थेंब तुझा स्पर्श करून देतात,..डोळे उघडा वें तरी तू आणि मिटवावे तरी तू….चांदण्या रात्रीत तन , मन झुर्तयं ..तुझ्याशी रात्र दिवस बोलत बसल तरी माझे कान थकणार नाहीत…..माझ्या हाताच्या रेशांवर तुझ नाव असेल का रे..की …उगाचच मी भ्रमात आहे ..हे अस का अस्त कोणी मला सांगेल का…माझ्या मनाला कोणी स्मजवेल का…पौर्णिमेचा चंद्र तुझ्या सोबत कधी पाहू शकेल का,… दुःखात तुझ्या कधी सहभागी होऊ शकेन का…सावली बनेन मी तुझी अंधारात पणं हात सोडण्याचा विचार नाही करत…. ही प्रीत का अशी..आठवणीत भिजवते….जाऊ का विचारायला आकाशात कुणाला तरी की या प्रेम नावाच्या रोगावर काही औषध मिळेल का…थोड औषध मिळालं तर बर होईल चटके च चटके बसत आहेत फक्त विरहाचे…यासाठी काही वेगळी ट्रीटमेंट आहे का…अस काही नसणार म्हणत…? इथेच सर्व प्रेमाची गाडी येऊन थांबते..

मी थांबले आत्ता अबोल मी झाले,..
आयुष्यातल्या घटना अश्याच विनाकारण नाही घडत…
काहीतरी लिहून ठेवलं असेल नियतीने यासाठी ही काही खास….
मी आता उगाच उदास नाही बसणार…तू माझ्यातला गोड आहेस तसाच मी तुला जपणार….
तू जितका आहेस माझ्यात तितकाच बास…
म्हणत म्हणत मनाची गोड समजूत काढली….

आणि हळूच ती तिथून निघतच होती की एक हळूच हवेची झुळक पुन्हा तिला सुखद स्पर्श करून गेली काहीतरी अदृश्य शक्ती , हा निसर्ग तिला काही सांगू पाहत होता…..

तिने अलगद दोन्ही हात पसरले डोळे मिटले…
निसर्गातील प्रत्येक सकारात्मक ऊर्जा तिला जाणवत होती…

ही पानं , फुल , हवा, पाणी , झाड, निळा सागर, हे तलावाच शांत पाणी आणि आभाळ म्हणत होत जणू…खऱ्या मनाने केलेली पूजा देवालाही मान्य होते..तो ही कोणत्या ना कोणत्या रूपात भेट देऊन जातो. …
“…तेरी मोहब्बत अगर सच्ची हो तो
…तो बस आप प्यार करते रहना..
उसे मिलाने की कोशिश तो पुरी कायनात कर ही लेगी…”,,

बसल्या ठिकाणावरून पाय काढत …काढत..

कल्पना करत होती खरच कधीतरी असा दिवस आलाच तुला पुन्हा आलिंगन देण्याचा….. द्यादिवशी सर्व जग थांबेल फक्त ऐकु येतील हृदयाचे ठोके,….डोळे मिटतील,..पाणी अलगद पापण्या पर्यंत येऊन त्थांबलले ले असतील…
९ महिने आईच्या गर्भात बाळ जस तळमळत अस्त आईला पाहण्यासाठी तिला बिलगण्यासाठी….
तशी काहीतरी अवस्था होऊन जाईल तिला पाहून बाळ सुखाची एक झोप काढत तस च त्या मिठीत ही कधी डोळे मिटले जातील कळणार सुद्धा नाही….

अस माज प्रेम आहे तुझ्यावर तुझ्या येण्याची वाट पाहत होते आजवर…..
पण आज का कुणास ठाऊक ती भिती च नाही उरली…
आणतील हे सूर्य चंद्र तारे ग्रह तुला माझ्या साठी ,
आजच्या पासून दुःखाची रात्र मात्र सरली…

त्या तलावा समोर तीच मन खूप हल्क झालं..

ती तिथून नेहमी खुश राहू लागली,
या आशेने नाही की तो तिच्या आयुष्यात प्रेम घेऊन येईल , पणं या आनंदाने की तिचं प्रेम खूप गोड होत…आणि त्या प्रेमावर तिला पूर्ण विश्वास होता..

दिवस जातच होते ती ने ही ठरवलं होत त्याच्या कामात व्यत्यय नाही आणायचा…

एके दिवशी त्याचा कॉल येऊन गेला होता..तिला उशिरा कळलं… ,.त्याच दिवशी तिला मेसेज आला होता खूप दिवस झाले बोलली नाहीस. ….

तिने पणं लिहून पाठवल…

“वो कह गये हमसे आपसे बात करके बहोत दीन हो गये,
हमने कहा हम तो आप्से रोज बात्ते करते है,
बस आवाज नहि सूनाई देती,
आंख बंद कर लेते है और आपकी धडकने..
सुनाई देती है….
वो कहते है कैसे कर पाते हो ये सब,
हमने कहा शायद इसेही मोहब्बत कहते हैं…..

अश्याप्रकारे तो तिच्या पेक्षा तिच्यात जास्त झाला,

क्रमशः

रुपाली शिंदे

पुढे काय घडणार बघू पुढची गोष्ट पुढच्या भागात तोपर्यंत आवडल असेल तर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा….

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular