Homeमुक्त- व्यासपीठफायद्याची नाती !

फायद्याची नाती !

🛑 सावधान 🛑

आपल्या आयुष्यात काही लोक येतात आपल्या फायद्या साठी,

एकटेपणात मित्रत्वाची भावना जगवतात
छोट्या मोठ्या गोष्टी मध्ये मदत करतात
इकडचे तिकडचे किस्से, घटना देवाणघेवाण होते
आपण आपण सकाळपासून रात्रीपर्यंत एक व्यक्ती सोबतच चिकटून राहतो
आपली माणसं लांब लांब होत जातात ज्यांना खरोखर आपली काळजी असते.

या सगळ्यात कुठ तर समोरचा आपला फायदा बघत असतो
आपल्याला वाटत अरे हा आपला तर बेस्ट फ्रेंड आहे

मुळात त्याला कधी नाते शेवटपर्यंत न्यायचेच नसते,
पण सगळ्या गोष्टी मात्र हव्या असतात
प्रियकर नसला तरी वागणूक तशी मिळावी आणि कोणतीही कमिटमेंट नसावी याची अपेक्षा असते
बोलण्यातून जवळीक आणि त्यातून पुढं भेटी गाठी होतात.

समोरच्या ने जास्त प्रश्न केले नाही पायजे अशी situation असते

कधी ही ते लग्न, संसार, भविष्यात एकत्र असण्यावर बोलत नाहीत मग समोरच्या ला ही वाटतं की चांगलच आहे कशाला ती रिलेशनशिप ची कटकट ?

यातून पुढे मग समोरचा व्यक्ती आपल्या भावनांशी आणि शरीराशी खेळून जातो.
आणि मग आपल्याला जाग येते खासकरून मुलींना.

मग एकीकडे जाणीव होते कि जी व्यक्ती आपली होती तिला आपण लांब केलं कारण तेव्हा त्याची काळजी आणि प्रेम ओळखू शकलो नाही

समोरचा पझेसिव्ह होता त्यामुळं आपण टाळत आलो
तो पझेसिव्ह होता कारण

आपल्या व्यक्ती ला गमावण्याची भीती
मनापासून असणारी काळजी,
मनापासून केलेले प्रेम जे त्याला शेवट पर्यंत साथ द्यायची होती
या सगळ्यातून तो पझेसिव्ह होतोच.

आपल्याला देवा ने डोकं दिलंय आपल्याला ओळखता आल पाहिजे समोरचा काय आहे.

लग्ना साठी मागणी घालणारी मुलं आणि एकिकड
just chill this day dont think over बोलणारी मुलं यामधील फरक जेव्हा कळेल तेव्हा मुलींना रिॲलिटी चा अनुभव येईल

कित्येक जणींना तो अनुभव आलाय फक्त वेळ निघून गेल्यावर जेव्हा तीन सगळं काही गमावलं असताना.

तेव्हा
आपल्या लोकांना किंमत द्या जी खरोखर आपली आहेत,
त्यांना वेळ द्या मग किती ही कामात असाल तरी.
कायम सोबत कोण असणार आहे त्यांना priority दया.
नाहीतर या गोष्टी झाल्या नंतर सगळ्यातून बाहेर काढणारी आपलीच लोक असतात
त्यांना ओळखा.

  • सचिन पाटील ( चंदगड )
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. Right good thoughts, असच घडत आहे सध्या,
    व्यक्तीला व्यक्ती ओळखता आली पाहिजे. विचार बदले पाहिजे .

- Advertisment -spot_img

Most Popular