फौजी

फौजी,
ऐकलं आहे
तुला पाझर फुटत नाही
आईचं आजारपण असो,
बाबाची तळमळ असो,
बहिणीची हाक असो कि,
भावाला साथ हवी असो,
बायकोची धडपड असो,
मुलीची तगमग असो कि,
मित्राची आस असो,
नातेवाईकांना मदत असो,
हे सगळं बाजूला ठेऊन देशहितासाठी आहे लढतोस तू

सगळं मनाच्या कोपऱ्यात घट्ट गाठ बांधून ठेवतोस

चिमुकल्याची आठवण येताच
मनाला अजून कठोर करतोस

आणि अर्धांगिनी
काय ज्यादू करतोस तिच्यावर
इतका वियोग सहन केल्यावर
तुझ्यापर्यंत त्याची चाहूलही लागू देत नाही

आणि तू कसं विसरतोस रे सहजच सगळं
नाही का आठवत जीवनातले ते मधुर क्षण
कर्तव्यापासून नाही का अडवत

खरंच ऐकलं आहे तुझ्याबद्दल
सगळं मनाच्या कोपऱ्यात घट्ट गाठ बांधून ठेवतोस

मनात जेवढे कल्लोळ
वरून तेवढाच शांत असतोस तू
वाहण्याऱ्या अश्रूना ढाल बनवून
जगतोस देशासाठी प्रत्येक क्षण तू

विसरतोस स्वतःला कधी तू
विसरतोस घर परिवाराला
प्रियंजणांना ही सहज विसरतोस
नाही विसरत ते फक्त देश प्रेमाला

मृत्यूशी खेळ खेळताना
भावना थांबवत नाहीत का तुला?
कि इतका सक्षम करतोस तू स्वतःला
प्रत्येक ओगळणारा अश्रू
गालावर येण्या आधी पुसतोस तू

सगळं मनाच्या कोपऱ्यात घट्ट गाठ बांधून ठेवतोस

दगडाला ही तुझे समर्पण पाहून पाझर फुटते
आजच्या युगात फक्त तुझंच प्रेम निरागस ठरते
सलाम आहे तुम्हाला तुमच्या कार्याला
आयुष्यभर आहोत ऋणी तुमचे
तुम्हाला पाझर फुटले असते तर
देश आपले सुरक्षित नसते
सतशः नमन तुम्हाला

कवयित्री –
✍️ नेहा नितीन संखे
( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular