Homeमुक्त- व्यासपीठबाप झाडावर लटकला तरी चालेल पण ...

बाप झाडावर लटकला तरी चालेल पण …

बाप झाडावर लटकला
तरी चालेल
माय वाऱ्यावर फिरली तरी चालेल
मात्र नेता निवडून आलाच पाहीजे
एक वेळेस बापाबद्दल काही बोललात
तर ऐकून घेऊ
मात्र नेत्याबद्दल ब्र शब्दही काढला
तर तुमचा जीव घेवू
बापला म्हातारा अन मायला म्हातारी म्हटलं तरी चालेल
मात्र नेत्याला आबासाहेब
आणि नेत्याच्या बायकोला
माँसाहेब म्हणावेच लागेल
मायची चोळी फाटली तरी चालेल
बहिणीची अब्रू गेली तरी चालेल
मात्र नेत्याच्या वाढदिवसाला
भारीतली शाल घ्यावीच लागेल ……

-संतोष पाटील
7666447112

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular