Homeवैशिष्ट्येभाग २८ आयकर कायदा १९६१ अंदाजपत्रक

भाग २८ आयकर कायदा १९६१ अंदाजपत्रक

भाग २८
आयकर कायदा १९६१
अंदाजपत्रक

संस्थेचे विविध उद्देश साध्य करण्याच्या हेतूने कालावधी सुरु होण्यापूर्वी बनविलेल्या आर्थिक पत्रकाला अंदाजपत्रक असे म्हणतात. अंदाजपत्रक दोन पद्धतीने बनविले जाते.
१. वार्षिक जमा- खर्चाचे अंदाजपत्रक
२. प्रकल्पाधिकारी अंदाजपत्रक
संस्थेचे अंदाजपत्रक वर्ष सुरु होण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात कलम १६(अ) नुसार दाखल करणे बंधनकारक आहे. अंदाजपत्रकामुळे आर्थिक शिस्त, आर्थिक नियोजन आणि आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता साध्य करता येते.

संगणकीय हिशोब लेखन
संस्थेमध्ये घडणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी करणे, त्यांचे एकत्रिकरण करणे. त्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्याचे विश्लेषण करणे या प्रक्रियेला होशोब लेखन असे म्हणतात.
सध्याचे युग हे संगणकीय युग समजले जाते. विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या कामांसाठी संगणकाचा वापर हा आपल्या जीवनाचा एक भाग बनून गेला आहे. बँकांचे व्यवहार, प्रवासाची तिकिटे, शासकीय दस्त नोंदणी व्यवहार इ. बाबतीत संगणकाचा वापर सरस केला जातो.
संगणकाच्या किमती खूपच कमी झाल्या आहेत आणि त्या आपल्या सर्वांच्या आवाक्यात आल्या आहेत. संस्थेला अथवा संस्था चालकाला कामकाजासाठी संगणक सहज उपलब्ध होऊ शकतो. त्यामध्ये असलेले विविध प्रोग्रॅम्स पत्र व्यवहारासाठी, आकडेमोडीसाठी, संपर्कासाठी तसेच हिशोब लेखनासाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात.
सध्या भारतामध्ये संगणकावर हिशोब लेखनासाठी वापरले जाणारे लोकप्रिय सॉफ्टवेअर म्हणून टॅलीचा उल्लेख केला जातो. यामध्ये माहिती भरली कि तिचे विश्लेषण विविध पद्धतीने संस्थाचालकाच्या गरजेनुसार उपलब्ध होते आणि वापरणाऱ्याला समजेल अशा पद्धतीने या सॉफ्टवेअरची रचना आहे. थोडेसे प्रशिक्षण घेऊन कुठलीही व्यक्ती टॅली सॉफ्टवेअर आत्मसात करू शकते.
हिशोब लेखनासाठी संगणकाचा वापर केल्याने वेळेची बचत होते आणि चूका टाळता येतात.

द्विनोंद पद्धत
द्विनोंद पद्धत ही हिशोब लेखनाची शास्त्रीय पद्धती आहे. ज्यामुळे आर्थिक स्थितीची अचूक माहिती मिळेल आणि चुका तसेच फसवणुकीला आळा घालता येतो. या पद्धतीमध्ये सर्व आर्थिक व्यवहार दोन ठिकाणी नोंदविले जातात, त्यामुळे या पद्धतीला हिशोब लेखनाची द्विनोंद पद्धत असे म्हणतात. हि हिशोब लेखनाची सोपी आणि उपयुक्त पद्धत आहे.
हिशोब लेखनामुळे आर्थिक व्यवस्थापन साध्य करता येते. आर्थिक व्यवस्थापन म्हणजेच आर्थिक नियोजन, आर्थिक प्रगतीचा आढावा आणि आर्थिक प्रगतीचा अहवाल, हिशोब लेखन आणि आर्थिक व्यवस्थापन हे एकमेकांना पूरक अर्थाने वापरले जाणारे शब्द आहेत.
हिशोब लेखनासाठीच्या महत्वाच्या मार्गदर्शक सूचना
१. संपूर्ण खर्च हा मंजूर अंदाज पत्रकानुसार करावा.
२. खरेदीच्या पावती बिलाच्या योग्यतेची खात्री करून घ्या.
३. चांगल्या दर्जाचा माल, पक्क्या पावतीनुसार खरेदी करावयाचा आग्रह धरा.
४. रक्कम देण्यापूर्वी अध्यक्ष/ सचिवाकडून तो खर्च मंजूर करून घ्या.
५. बचत खाते पुस्तक वेळच्या वेळी भरून घ्या.
६. खर्चाची बीले/पावत्या व्यवस्थितरित्या फाईल करून ठेवा.
७. हिशोब लेखनाचे काम (कॅश बुक, लेजर इ.) वेळच्या वेळी पुर्ण करा.
८. हिशोब लेखनासाठी हस्तांतर सुवाच्छ असावे.
९. हिशोब लेखनात खाडाखोड करू नये.
१०. प्रत्येक नोंद केल्यानंतर एक ओळ सोडून द्यावी.
११. कॅलक्युलेटर वापरल्यामुळे बेरीज,वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार, सहज होतात.
१२. मासिक जमा/खर्चाचा आढावा पाणी समितीच्या बैठकीत सादर करा.
१३. रु.५०००/- वरील खर्च खर्चांना १ रु. चा रेव्हेन्यू स्टंप लावावा आणि सही घ्यावी.
१४. रु.१०००/- वरील खर्च क्रॉस चेकने करावे.
१५. हिशोबाचे सर्व दप्तर एकाच ठिकाणी ठेवले जावे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular