भाग ३९
दात्या संस्थेस प्रकल्प सादर करणे
प्रकल्प सादर करणे पूर्वीची आवश्यक तयारी निधी दात्या संस्थातील महत्वाच्या व्यक्तीशी वैयक्तिक संपर्क प्रस्थापित करणे व ह्या संपर्काचा उपयोग चर्चे नुसार करून घेणे.
संस्थेचा प्रकल्पाबद्ल आशावादी दृष्टीकोन ठेवा.
संस्थेचे कार्य मांडताना सत्यता व पारदर्शकता ठेवा.
दात्याच्या वैयक्तिक तत्वांचा आदर करा.
प्रकल्पाचे अहवाल वेळेवर पाठवा व योग्य देणग्यांची पोच पावती द्या.
संस्थेच्या महत्वाच्या उपक्रमाविषयी व महत्वाच्या घडामोडी सतत कळवत रहा.
उदा. पत्यातील बदल, एखाद्या महत्वाचे उपक्रम.दात्याशी उत्कृष्ट संपर्क ठेवा.
निधी दात्या संस्थांना संपर्क साधताना लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी संस्थेचे नाव ऐकिवात आहे का? स्थानिक/ राज्यात/ देशात
संस्था ठराविक कार्यक्षेत्रात काम करते अथवा सर्व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
संस्था कोणत्या प्रकारच्या लाभार्थीसाठी काम करत. मुले/वृद्ध/ अल्पसंख्यांक
या क्षेत्रात काम करणारी दुसरी एखादी संस्था आहे काय/ तुमच्या संस्थेचे वेगळेपण काय?
संस्थेच्या कार्यातील प्रगतीचे टप्पे
पत्र पाठवण्याचे कारण- आपत्ती संकट निधीमध्ये कपात, नवीन कार्यक्षेत्राची निवड प्रगतीचा आढावा, नवीन कार्यक्षेत्राची निवड
दात्यांनी मदत दिल्यानंतर काही ठोस बदल घडून येतील का?
पत्रे या माध्यमाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास आर्थिक तुट सोसायची संस्थेची तयारी आहे काय?
लिखित संवादात
आपल्या संस्थेला मिळालेले यश थोडे यात पण स्पष्टपणे मांडता येण हे देखील अशा प्रकारच्या संवादात महत्वाच असत. आपलं यश हे. मोजता येण्याजोग आणि तपासता येण्याजोग असाव.
संस्थेच्या मुकुटात मानाचा तुरा खोदणारे असावे.
संस्थेच्या प्रमुख उपक्रमांपैकी किमान एक उपक्रमासंदर्भात असाव.
लोकांच्या आयुष्यात किंवा त्याच्या भोवतालच्या परिसरात आपल्या कामामुळे काय बद्दल झाला ते सांगणार असाव.
प्रभावी संवादकर्ता व यशस्वी निधीसंकलन होण्यासाठी
एखाद्या संस्थेस मदत करताना दात्यांचा दृष्टीकोन काय असतो? संस्थेचा प्रकल्प हा दात्या संस्थेच्या क्रमवारी व मार्गदर्शक तत्वांशी मिळताजुळता आहे का?
मदत ही खरोखरच धर्मादाय संस्थेस आहे का व कर सवलतीचा फायदा दात्यास मिळतोय काय?
संस्थेचे व्यवस्थापक : विश्वस्त मंडळी बाबतचे मत, कर्मचारीवृंदाची पात्रता, क्षमता
आर्थिक स्थैर्याचा विचार संस्थेने केलाय का?
प्रकल्पाचा गाभा व प्रकल्पात नमूद केलेली वस्तुस्थिती मदतीसाठी योग्य आहे का? प्रकल्प
कार्यक्षेत्रातील गरजांची/ अडचणीचे संस्थेला संपूर्ण माहिती आहे का? संस्थेचे इतर संस्थांशी असलेले संपर्क लाभार्थींना प्रकल्पातून होणारी मदत दूरगामी आहे का? मूल्यांकनाचे घटक योग्य आहेत का?
प्रकल्पाचा कालावधी, ध्येय, उद्दिष्ट एकमेकांशी संलग्न व सुसंगत आहेत का?
प्रकल्पाचे ताळेपत्रक, प्रकल्पात नमूद केलेल्या ठोस घटकांशी सुसंगत आहे का?
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मुख्यसंपादक