अमित गुरव ( भादवण )-:
भादवण च्या श्री महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ होण्याच्या सुरवातीला स्त्रियांना वेध लागते ते घर साफसफाई करण्याचे वा सारवण्याचे . ते आवरताच ४ घरचे लोक एकत्र येतात आणि नदीवर आपले अंथरूण पांघरूण धुवायला जमतात.
यावेळी तुम्ही युवा नेते असा किंवा व्यावसायिक , नोकरदार घरातून फर्मान आलेले असते धुवायला जायचे आहे . इच्छा असो अथवा नसो तुला येणे क्रमप्राप्तच. आपल्याला व्यवस्थित दगड मिळावा या उद्देशाने पहाटे पहाटे नदीकाढचा दगड मिळवण्याची धडपड करून वेळप्रसंगी थोडे धुसफूस करायची आणि त्या योग्य दगडाचा ताबा मिळवायचा . नदीवर तुम्ही 8 वाजता गेला तरी नदी माणसांनी आणि वाळत लावलेल्या अंथरूण पांघरुणांनी गच्च भरलेली. कुडकुडत आलेली लहानथोर मंडळी थोड्याच वेळात अंधुरणावर अशी काय झडप घ्यायची की ते त्यांचा शत्रूच आहेत आणि मग दे दणादण , धर की आपट करीत आणि काही मंडळी जागा मिळेल तिथं वाळत घालण्यात व्यस्त. त्यानंतर मात्र पोर टार थोडा विसावा ते पाण्यात डुंबून घेण्यासाठी चातकप्रमाणे आतुर...
पण आज घराजवळ झालेली पाण्याची उपलब्धता , ऊस तोडणी ची लगबग , की कोरोना चे भय माहीत नाही पण पूर्वीसारखी गर्दी होती का ? हाच यक्षप्रश्न मनात टिकटिक करीत होता . असो ज्यांना नदीवर जायचे आहे त्यांनी शनिवार आणि रविवार येऊ नये कारण तेव्हा गर्दी खूप होते असे सचिन देसाई (ग्रामस्थ ) यांनी मत मांडले . बहुदा हे सुट्टीचे दिवस असल्याने गर्दी होत असली तरी इरडे पडल्यावर मात्र खूपच गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
https://youtu.be/dxStcPU73tc
तुमचे काही या यात्रेचे अस्मरनिय अनुभव असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये अभिप्राय द्यावा.
https://youtu.be/JqNnXsCOZvc
मुख्यसंपादक