Homeघडामोडीभादवण पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी

भादवण पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी

आजरा ( अमित गुरव )- भादवण गावची निवडणूक लागली आणि सर्व गटातील लोकांनी स्वप्ने साकार करण्यासाठी पुन्हा तयारी सुरू झाली. यंदाची निवडणूक ही काट्याची टक्करीची होणार हे आता जवळजवळ भादवण ग्रामस्थांनी ओळखले आहे. कारण कोपर्यावरच्या मिटिंग आणि त्यामध्ये होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे गावचे राजकारण आणि नेते मंडळी थंडीच्या कडाक्यात देखील तापत आहेत अशी दबती चर्चा सुरू आहे.
शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी , कॉग्रेस , भाजप तसेच इतर छोटे- मोठे गट अशी निवडणूक लागणार हे फायनल झाले तेव्हा संजय पाटील यांनी यापूर्वीच तुमच्यात दम असेल तर आपल्या आपल्या गटाचे स्वतंत्र पॅनल उभे करून उमेदवार निवडणूक लठवण्याचे किंवा विकास कामे पाहुन बिनविरोध आम्हाला साथ द्या ; आहे त्या सदस्यांसह आम्ही गावाचा विकास करतो असे जाहीर आवाहन केले होते.
तर विरोधी गटातील प्रमुख संजय गाडे , डॉ. गोपाळ केसरकर , बी. टी. जाधव , संजय कसेरकर , तसेच इतर प्रमुखांनी पाटील यांनी कसा भष्ट्राचार केला किंवा मला आणि जनतेला कोठे कसे अडवले याची गाथा वाचत आहेत .


पण या सर्वांच्या भाषणात एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येत आहे की दोन्ही मोठे गट एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या हेतूने एकमेकांवर दुसरा गट 500 रुपये आणि मटण वाटेल ते घेण्याचा फुकटचा सल्ला मतदारांना देत असले तरी सध्या शेतकरी राजा किंवा नेत्यांसाठी चा मतदार माझ्या शेतातील ऊस तोडणी होईल का ? अशी वाट पाहतो . पण यावर कोणीही आवाज उठवला नाही असे लोकांच्या बोलण्यातून जाणवते.
आम्ही डमी फॉर्म भरला असे बोलले जात असेल तरी पण जर एखाद्या इच्छुक व्यक्तीला माघारी घ्यायची वेळ आलीच तर ती कोणासोबत जाते की मग अपक्ष उमेदवार स्वतःचा एक स्वतंत्र गट स्थापन करतात हे आता येणारी वेळच ठरवेल ऐवठे नक्की…
मतदारांनी आपले बहुमूल्य मत कोणाला द्यायचे हे निश्चित केले आहे की अजून नाही माहीत नाही पण तळे राखील तो पाणी चाखेल आणि तुम्ही गेली 5 वर्षे सत्ताधारी मंडळींनी भष्ट्राचार केला तर आंदोलन किंवा लोकशाही मार्गानी विरोध का नाही केला ? त्यांनी इतका भष्ट्राचार केला त्यांनी इतका निधी आणला , आता निवडणूक लागल्यावर आमच्या पुणे मुबंई स्थित मुलांची आठवण आणि त्यांच्याप्रती प्रेम भावना कशी काय निर्माण झाली ? याची दबक्या आवाजात चर्चा सुरू असून मतदार राजा फक्त पाण्यात राहून मगरी शी वैर कशाला यामुळे बोलवतील त्यांच्या सभेला तेच तेच लोक गर्दी करताना दिसतात असेच चित्र आहे.

भादवण गावाच्या पंचवार्षिक निवडणूक अपडेट्स साठी लिंक मराठी ( www.linkmarathi.com ) च्या या वेबसाईट भेट देत रहा..

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular