Homeमुक्त- व्यासपीठभारतरत्न प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर , १३२ व्या जयंती

भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर , १३२ व्या जयंती

आपले बाबासाहेब
विश्वभूषण भारतरत्न ,प्रज्ञासूर्य बाबासाहेब,
दिनदुब़ळ्यांचा वंचितांचा आधार बाबासाहेब.१

चिकाटीचा ,प्रयत्नांचा मानदंड बाबासाहेब,
ज्ञानवंतांचे अन् विद्वानांचे मेरुमणी बाबासाहेब.२

तळागाळातील जनतेचे उद्धारकर्ते बाबासाहेब.
वैचारिक क्रांतीचे जनक,आपले बाबासाहेब,३

लोकशाहीचे रक्षणकर्ते आपले बाबासाहेब,
राज्यघटनेचे शिल्पकार आपले बाबासाहेब.४

जातीभेदाला संपविणारे आपले बाबासाहेब,
तथागत बुद्धांच्या धम्माचे उपासक बाबासाहेब.५

अर्थशास्त्र ,राजनितीचे अभ्यासक बाबासाहेब,
अफाट ऐशा ग्रंथ संपदेचे संग्राहक बाबासाहेब.६

अंधश्रद्धा व दृष्ट रूढींचे निर्मूलक बाबासाहेब,
सामाजिक न्यायाचे प्रणेते अपुले बाबासाहेब.७

समता ,स्वातंत्र्य व बंधुत्वाचे प्रसारक बाबासाहेब,
कामगार कल्याणाचे नियामक आपले बाबासाहेब.८

महाराष्ट्रभूमीत जन्मले ,महामानव बाबासाहेब,
जयंतीदिनी चरणी तुमच्या नतमस्तक बाबासाहेब.९

भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ,
१३२ व्या जयंतीदिनी मनःपूर्वक भावपूर्ण आदरांजली

         कवी -     श्री रेवाशंकर वाघ ठाणे
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular