Homeमुक्त- व्यासपीठभावपूर्ण श्रद्धांजली बिपीन रावत

भावपूर्ण श्रद्धांजली बिपीन रावत

“आता अग्नीच्या ज्वाळा आमच्या अगदी निकट येत आहेत.,
त्यांचा उष्ण दाह शरीराला जाणवतोय…..

मधूलिकाने माझा हात घट्ट धरलाय, मी तिच्या डोळ्यांत पाहिले, येणाऱ्या मृत्यूच्या जाणिवेने मला तिच्या डोळ्यांत भय जाणवले. कुटुंबाच्या काळजीने एका आईचं हळवं होणं साहजिक आहे. …

तिचा हात घट्ट पकडून मी माझ्या छातीजवळ नेला….

खिडकीतून बाहेर….. एकीकडे माझी मायभूमी…तर दुसरीकडे माझ्या अगदी निकट माझी अर्धांगिनी, दोघीही मला सदैव भासतात त्याप्रमाणे अवर्णनीय सुंदर, आपल्या केवळ स्पर्शाने माझ्या सगळ्या चिंता विवंचना दूर सारून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत राहण्यास मला सदैव प्रोत्साहित करणारे सकारात्मक शक्तीचे दोन स्रोत….

आता आम्ही वेगाने खाली कोसळतोय…..हेलिकॉप्टर आग व धुराने भरून चाललेय. मृत्यूची आणि आमची कदाचित आजच भेट होईल.

शरीरावर…… प्राणांहून प्रिय असलेला भारतीय लष्कराचा गणवेश व हातात माझ्या अर्धांगिनीचा उबदार हात ! ( क्षणांत संपूर्ण आयुष्य डोळ्यांसमोरून तरळून गेले.) मी जेवढं जगलो होतो ते शानदार जगलो होतो. मृत्यूला सामोरे जाताना देखील मी त्याच्या नजरेत नजर घालून एका योद्ध्याप्रमाणे सामोरे जाणार आहे.

http://linkmarathi.com/जीवधन-रोप-चा-वापर-केलेला-म/

“SERVICE BEFORE SELF” माझ्यासहित माझ्या बारा लाख सहकाऱ्यांचे बोधवाक्य मी पुटपुटले….

शेवटचेच म्हणून मी मधूलिकाकडे पाहिले. अभिमान, धैर्य,काळजी, जिव्हाळा, प्रेम यांचे मिश्रण माझ्या डोळ्यांत उमटले व स्मितहास्य आपोआपच बाहेर पडले. माझी सकारात्मक ऊर्जा तिला देखील जाणवली, तिने देखील तेवढ्याच उत्कटतेने माझ्याकडे पहात स्मितहास्य केले. हेलिकॉप्टर मधील सर्वांनाच ती ऊर्जा जाणवली….

मी कमांड माझ्या हातात घेतली व खणखणीत आवाजात घोषणा दिली. …

जय……….. हिंद. …🚩🙏

भारत माता की ………जय ! ”

सो- सोशल मीडिया

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular