Homeआरोग्यमंकीपॉक्स म्हणजे काय ? मंकीपॉक्सची सर्व लक्षणे कोणती ?

मंकीपॉक्स म्हणजे काय ? मंकीपॉक्सची सर्व लक्षणे कोणती ?

मंकीपॉक्स सर्वसाधारण माहिती

मंकीपॉक्स हा रोग वेगाने पसरत आहे . हा आजार दक्षिण आफ्रिकेत आढळतो. पण सध्या 15 दिवसांत 15 देशा मध्ये मंकीपॉक्स पोहचला .

मंकीपॉक्स म्हणजे काय ?

मंकीपॉक्स विषाणूमुळे हा रोग होतो .सर्वप्रथम एका अपहरण केलेल्या माकडात हा रोग आढळला होता .

प्रसार कसा होतो – हा विषाणू, त्वचा, श्वासनलिका, डोळे, नाक किंवा तोंडाच्या वाटे शरीरात प्रवेश करतो . माकडं, उंदीर, खार, यांना हा आजार झाला असेल आणि त्यांच्याशी थेट संपर्क आला तर माणसाच्या शरीरात विषाणू जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या रुग्णाने वापरलेले कपडे किंवा चादर यांच्यावाटेही हा रोग पसरतो.

मंकीपॉक्सची लक्षणं कोणती ?

सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना यां लक्षणांचा समावेश आहे . ताप चढला की शरीरावर पुरळ येतं. सुरुवात चेहऱ्यापासून होते .

हा संसर्ग आपोपाप 14 ते 21 दिवसात बरा होतो . मात्र सध्या आफ्रिकेत या रोगामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे आतापासूनच सतर्क राहणे आवश्यक आहे.

या रोगाचा उपचार काय ?

उपचार कोणताच नाही त्यामुळे या रोगाचा प्रसार न होण्याची दक्षता घेणे हाच एकमेव उपाय यावर म्हणता येईल.

अश्याच आरोग्य विषयक अजून पोस्ट वाचण्यासाठी लिंक मराठी वर अपडेट्स घेत रहा .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular