Homeघडामोडीमनसे चे अ‍ॅमेझॉन विरुद्ध खळखट्याक

मनसे चे अ‍ॅमेझॉन विरुद्ध खळखट्याक

पुणे – अ‍ॅमेझॉनने मनसेच्या मराठी भाषेच्या वाद विकोपाला गेला आहे. दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली . आणि या वादाला आक्रमक स्वरूप प्राप्त झाले. राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना न्यायालयाने ५ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला.
आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने अ‍ॅमेझॉनला दिला होता.
राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचे पाणी पाजणार, अशी प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी दिली होती.
पुणे येथील अ‍ॅमेझॉनचे ऑफिस मनसे च्या कार्यकर्त्यांनी फोडले . राज्यभर त्याचे तिव्र प्रतिसाद उमटत आहेत . मराठी नाही तर अ‍ॅमेझॉन पण नाही अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular