Homeमुक्त- व्यासपीठमला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरुन मी जेंव्हा तुम्हाला स्वर्गात भेटेन...

मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरुन मी जेंव्हा तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा आभार मानू शकेन.”

जेंव्हा नायजेरियन अब्जाधीश फेमी ओटेडोला यांना टेलिफोन मुलाखतीत रेडिओ प्रेजेंटरने विचारले, “सर तुम्हाला कोणत्या गोष्टीने जीवनातील सर्वात आनंदी माणूस बनवले आहे?”

फेमी म्हणाले:
“मी आयुष्यातील आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला.”

पहिला टप्पा संपत्ती आणि साधन जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.

मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे माझ्या लक्षात आले.

त्यानंतर मोठा व्यवसाय मिळविण्याचा तिसरा टप्पा आला. तेव्हा मी नायजेरिया आणि आफ्रिकेत 95% डिझेल पुरवठा करत होतो. मी आफ्रिका आणि आशियातील सर्वात मोठा जहाज मालक होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.

चौथा टप्पा तेंव्हा आला जेंव्हा माझ्या एका मित्राने मला 200 अपंग मुलांसाठी व्हीलचेअर घेऊन देण्याची विनंती केली.

मित्राच्या विनंतीवरून मी लगेच व्हीलचेअर विकत घेतल्या.

पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन स्वतः व्हीलचेअर मुलांच्या हाती द्यावी. म्हणून मी मित्रा सोबत गेलो.

तिथे मी स्वतःच्या हाताने त्या अपंग मुलांना व्हील चेअर दिल्या. त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची विचित्र चमक मला दिसली. त्या मुलांना मी व्हीलचेअरवर बसून फिरताना आणि मजा करताना पाहिले.
जणू ते पिकनिक वर आले आहेत आणि जॅकपॉट जिंकत आहेत.

मला यात खरा आनंद वाटला. मी तेथून निघत असताना एका मुलाने माझे पाय धरले. मी हळूवारपणे माझे पाय सोडवायचा प्रयत्न केला पण त्या मुलाने माझ्या चेहऱ्याकडे पाहत माझे पाय घट्ट पकडले.

मी खाली वाकून त्या मुलाला विचारले “तुला आणखी काही हवे आहे का?”

या मुलाने मला दिलेल्या उत्तराने मला आनंद तर दिलाच पण जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलला. तो मुलगा म्हणाला:
“मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी जेंव्हा तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा आभार मानू शकेन.”

http://linkmarathi.com/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%a8/

तुमचा चेहरा पुन्हा पाहण्याची इच्छा करणारे कोणी आहेत का? असेल तर कोणत्या कारणासाठी ? आणि नसेल तर शक्य ते प्रयत्न लवकरच सुरू करावेत ही लिंक मराठी कडून अपेक्षा व्यक्त करतो..

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular