जागतिक महिला दिनानिमित्त
ती अध्यक्षीय भाषणात छान बोलत होती
रात्री दारू पिऊन आलेल्या
नवऱ्याच्या जाचाला कंटाळून
एक कूस आडवी करून
ती शय्येवर हुंदके देत रडत होती
लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन
हेच तिनं पाहिलेलं एक सुखद स्वप्न होतं
मारहाण अन् शिवीगाळ करून
पती नावाचा परमेश्वर मासिक पाळीतही
समाजमान्य बलात्कार करतो
बाईपणाचं हेच खरं दु:खणं होतं
येतो विचार मनात
सगळं सोडून जावा बा च्या घरी
नवऱ्यानं टाकलं हो हिला
हाच विचार करील ही छिनाल दुनियादारी
जागतिक महिला दिनी
तिची महती सांगून ठोका जोरदार भाषणं
पुरुष प्रधान संस्कृतीत करतात ॲसिड हल्ला
तर लुटतात कधी रस्त्यावर अब्रू
करुनी आत्महत्या म्हणते ती
या जन्मी नको गं इथं
बाई म्हणून हे लाचार जगणं…!
http://linkmarathi.com/मी-मावळा-शिवरायांचा/
- संदीप देवीदास पगारे
खानगाव थडी,नांदूरमधमेश्वर-नाशिक
https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303
लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी लिंक मराठी हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी .
तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.

मुख्यसंपादक
[…] महिला दिन विशेष -: ‘आत्महत्या…!’ […]