Homeघडामोडीमाजी कर्णधार गांगुली यांना हृदविकाराचा झटका

माजी कर्णधार गांगुली यांना हृदविकाराचा झटका

( प्रतिनिधी ) : आरे ला कारे ने उत्तर देण्याच्या शैलीमुळे तसे ते कायमच चेचेत असायचे. त्यामुळे आक्रमक कर्णधार म्हणून त्यांची ओळख. त्यांच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियाने १९८३ नंतर २००३ मध्ये प्रथमच वर्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लडला त्यांच्याच पटांगणात पराभूत केल्यावर जर्सी काढून आपला आनंद व्यक्त केलेला तो गांगुली यांचा श्रण आजही चाहते नक्कीच विसरले नाहीत. ११३ कसोटी मध्ये ४२.१७ च्या सरासरीने ७२१२ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १६ शतके व ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. ३११ वनडे सामन्यात ११३६३ धावसंख्या असून त्यात २२ शतकं व ७२ अर्धशतकांचा समावेश आहे.
गांगुली यांनी आपल्या मुलीसोबत एक जाहिरात केल्याचा व्हिडीओ शेअर झाला होता त्याची चर्चा होती . असे असतानाच अचानक जिम मध्ये कसरत करताना गांगुलीच्या छातीत दुखू लागले. त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून आज सायंकाळी अँजिओप्लास्टी होणार आहे. चाहते प्रकृती सुधारावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular