काळोख्या रात्रीत जळत्या दिव्याप्रमाणे तो सिंह जन्मला,
घेऊनी स्वराज्याची मशाल हाती शिवनेरीवर आनंद महोत्सव रंगला,
आई जगदंबेच्या आशीर्वादाने शिवाजी नाव ठेवले,
शिव रुद्राप्रमाणे मुगलांशी ते निर्भीडपणे झुंजले,
रामायण, महाभारत, गीता ऐकण्यात बालपण घालवले,
अवघ्या लहान वयात तलवार नी भाला धरुनी युद्धभूमीत उतरले,
कृष्ण, अर्जुन, भीम, राम यांच्या कथांमधून स्वत: च्या जगण्याला आकार दिले,
आणि मग स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगले ,
बाल वयातच त्या नराधमांना राजा तुम्ही मातीत लोळवले,
वीर शहाजीराजे आणि जिजाऊंचे पुत्र आम्ही मुगलांना हे दाखवून दिले,
रयतेवर अपार प्रेम, मावळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध केले,
म्हणून तुम्ही रयतेचे राजा म्हणून आयुष्यभर आमच्या हृदयात राहिले,
गनिमीकाव्याला हत्यार म्हणून वापरले,
राजा तुम्ही निशस्त्र असूनही गनिमांना पायदळी तुडवले,
हिंदू- मुस्लीम, स्त्री-पुरुष, शुभ-अशुभ भेद न पाळले,
लढाई आपली मुघलांशी नव्हती तर साम्राज्याची आहे,
हे तुम्ही अवघ्या जगाला सिद्ध करूनी दाखवले.
कवयित्री –
नेहा नितीन संखे
( बोईसर )
समन्वयक – पालघर जिल्हा