HomeUncategorizedमाझा स्वामीराया

माझा स्वामीराया

स्वामीराया माऊली, आहे भक्तांची साऊली,
दुःख दूर करी,आशिर्वाद देई,
भक्तांना आनंदी तोच ठेवी,
या विश्वाचा तारणहार,माझा स्वामीराया

सर्वांना सांभाळून जो घेई,
सर्व चूका माफ जो करी,
या विश्वात सर्वांना सोबत जो घेई,
कोणाला मागे हटू ना देई, माझा स्वामीराया

भक्तांच्या सदैव पाठिशी राही,
वेळोवेळी संकट दूर करी,
जिकडे जाऊ तिकडे उभा,
भक्तांना मार्ग तोच देई,माझा स्वामीराया.

नामस्मरण जो करी,
त्याला भय कशाचे नाही,
मनात एकच शब्द अखंड तेवत राही,
माझा स्वामीराया, माझा स्वामीराया.

   रोहित राजाराम काबदुले.
   करंबेळे तर्फे देवळे,झोरेवाडी
   ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी.
   मो. नं. ९५९४५३७९८९.
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular