Homeमुक्त- व्यासपीठ"माझ्या पांडुरंगा ने" केलेली वारी पाहीली आहे का कोणी…?

“माझ्या पांडुरंगा ने” केलेली वारी पाहीली आहे का कोणी…?

आजचा लेख म्हणजे फक्त लेख नाहीय श्रद्धा आहे, प्रार्थना आहे, आणि यात विठू रायाच दर्शन आहे..

प्रथम मी हे सांगू इच्छिते की हा लेख मी माझे “अण्णा ” (आईचे वडील) , बाबा ( वडिलांचे वडील) व माझ्या आईसाठी,…लिहत आहे.

कारण या तिघां मुळे मी लहान पणापासून टाळ मृदुंगाच्या गजरात रमायला लागले, आणि मुखात हरीच नाव घेऊ लागले. खूप दिवसापासून तिची इच्छा होती की माझ्या पांडुरंगा साठी पणं चार शब्द लीह ग…

लिहिणार होतेच मी कारण “विठू च” सगळ जग आहे माज आणि आपल्या सर्वांचं सुद्धा.

तर मग चला पाहू विठू च रूप, त्यांची वारी, भक्तांची वारी आणि विठू च प्रेम..

अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे दैवत. प्रभू विठ्ठल पांडुरंग महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंग , पंढरीनाथ, श्री विठ्ठल , माऊली , विठोबा ,विष्णू ,कृष्ण रुपी अवतार आहेत, महाराष्ट्र, कर्नाटक, तसेच इतर राज्यात ही यांचे बरचसे अवतार पाहायला मिळतात,
पुंडलिक भेटी परब्रह्म आले गा, ते भक्त पुंडलिका साठी पंढरपूर ला आले ते इथेच वसले.

सुंदरते ध्यान उभे विटेवरी l कर कटावरी ठेवूनीया ll तुळशी हार गळा कासे पितांबर l आवडे निरंतर हेचि ध्यान ll
मकर कुंडले तळपती श्रवणी l कंठी कौस्तुभमणी विराजित ll तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख l पाहीन श्रीमुख आवडीने ll

पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध विश्व विख्यात देवाचं तीर्थ स्थान,
भक्त पुंडलिक यांच्या नावावरून पडलेलं नाव आहे, जे भीमा नदीच्या काठी स्थित आहे जिला चंद्र भागा ही म्हंट्ल जात कारण तिचा आकार अर्ध चंद्रा सारखा आहे.
एकदा का पांडुरंगाचे रूप पाहिले की ती छवी नजरेत तशीच बसून जाते.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आणि विठू रायाची भगवी पताका यास मानाचा मुजरा..

संत नामदेवांचा अभंग आठवला
नाचू कीर्तनाचे रंगी ,नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञानदीप लावू जगी ,आम्ही वारकरी पंढरीचे
आम्ही अधिकारी मोक्षाचे

प्रामुख्याने वारी आषाढी, कार्तिकी, माघ व चैत्री अश्या ४ विभगात होत असते. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत कुलकर्णी व संत तुकाराम महाराज हे देखील वारीला जायचे त्यांच्या पूर्वीपासून वारी चां उल्लेख केला गेला आहे.

तुकाराम महाराजांचे चिरंजीव संत नारायण महाराज यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पादुका घेऊन श्रीक्षेत्र देहू ते आळंदी प्रवास करत ते इंद्रायणी मध्ये स्नान करून पालखी सोहळा पंढरपूर कडे प्रस्थान केला गेला, गेल्या हजारो वर्षांपासून हा पालखी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व भावपूर्ण पार पाडला जातो,
पुरुष धोतर सदरा आणि टोपी असा वैष्णव पद्धतीने तिलक लावून, जय जय राम कृष्ण हरी गजर करत पांडुरंगाच्या भेटीसाठी जात असतात

या पालखी सोहळ्याची सुरुवात महाराष्ट्रातील प्रसिद्ध संतांनी चालू केली, त्यांच्या अनुयायांना वारकरी म्हटलं जातं, ही परंपरा प्रथा वारकरी जपतात व देवाचे सगुण-निर्गुण गुणाची विविधता संघटित करून ठेवली आहे हे आपल्या सर्वांना पाहता येत.

होईन भिकारी, पंढरीचा वारकरी हाची माझा नेम धर्म मुख्य विठोबाचे नाम, जय जय हरी विठ्ठल..

संपूर्ण भारतातआषाढी आणि कर्तिकी हा पाई दिंडी सोहळा प्रसिद्ध आहे .
वारी या शब्दाचा अर्थ होतो येरझार,
जन्म-मृत्यूची चुकवी फेरी तोच खरा वारकरी
पंढरीची वारी म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला निघायचं आणि पांडुरंगाला भेटून पुन्हा घरी यायच.

जीवन कसे जगावे याची खरी अनुभूती पंढरीची वारी करून देते,
ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती राहू द्यावे समाधान,
तहानले ल्यांच तहान व्हायची भुकेलेला ला जेवण द्यायचं तर कधी झोपण्याची व्यवस्था करून द्यायची,
कोणत्याही जीवाचा मत्सर करायचा नाही, स्त्रीला मातेसमान मानायच, कथा वाचन प्रवचन करत किर्तन करत मुखात विठ्ठलाचे नाव घेत पंढरीला जायचं

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, भक्त पुंडलिक, संत जनाबाई, सोपान , मुक्ताई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावता , संत गोरोबा, संत सोयराबाई, या संताची नाव घेत त्यांची भजन गात जायचं

आळंदी, देहू वरुन अष्टमी ला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, दिंडी निघते तर सप्तमी ला तुकाराम महाराजांची या दींड्या पुण्यात मुक्काम ला असतात त्यानंतर सासवड पासून आपले आपले मार्ग परिक्रमन करून त्या नवमी च्या दिवशी
आषाढ शुक्ल नवमी ला वाखरी येथे मुक्कामी दिंडी
पोहचतात त्यानंतर त्या दशमीला पंढरीला पोहचतात,
ग्वाल्हेर चे हैबत बाबा आरफळकर यांनी दिंड्यां मध्ये सुसूत्रता, क्रम आणि नियोजन केले , त्यात मानाच्या ४७ दींड्या असतात.

प्रामुख्याने एक वारकरी त्यांच्या ठरलेल्या वारी नुसार दरवर्षी वारी करत असतो जास्त ते आषाढी वारीला मग त्यात महिनाभर चालणारी पायवारी आली किंव्हा आठवड्या भराचा वेळ काढून वारित सहभागी असन असो .
आपली शेताची काम आवरून , गुरा ढोरांची सोय करून महिनाभर थोडीफार कडधान्याची शिदोरी आणि ४ कापड घेऊन वारीला निघतो..

छोट बाळ जस मामांच्या गावाला जाताना जस आनंद व्यक्त करत अस्त तस,
जाऊ देवाचिया गावा देव देईल विसावा..
असा जप करत एक वारकरी आपला प्रवास करायला सुरुवात करतो
एका वारकऱ्यांसाठी हा एक सोहळा असतो विठू च दर्शन भेटे पर्यंत होत असणारी तळमळ असते
सर्व वारकरी समूहाने प्रवास करत असतात म्हणून त्यास दिंडी असे संबोधले जाते. या दींड्या भजन, किर्तन, प्रवचन, करत करत मार्गक्रणन करत असतात,

टाळ, मृदुंगाच्या तालात यांचे
” जय जय राम कृष्ण हरी” हा गजर नेहमी चालत असतो. प्रतेक वारकरी हरीच्या गजरात तल्लीन असतो ,स्त्रिया तुलसी वृंदावन डोईवर घेऊन असतात तर गळ्यात टाळ घेऊन आणि मुखात श्री हरी.
फक्त महाराष्ट्रातून च नव्हे तर कर्नाटक वर इतर राज्यांतून व देशातून देखील लोक बऱ्याच प्रमाणात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात, कधी वेळेत जेवण, प्रसाद मिळेल न मिळेल, वर पाऊस खाली पायांना दगड, काटे, रुतत असो, झोपण्याची व्यवस्था असेल नसेल, उन पावसाचा विचार केला जात नाही, रस्त्यांची येणारी वळण, मुक्कामाची जागा येईपर्यंत चालत राहणं, प्रत्येकाला सोबत घेऊन चालन, कुठे स्नानाची व्यवस्था होईल न होईल, असंख्य जनमानसात शिस्त बद्ध्द चालन अश्या असंख्य संकटातून व नियोजन बद्ध वारकरी वारी करत असतो तो फक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी .

दिवस रात्र रांगा करून उभे असतात , लाखो लोक पंढरी ला भेट देतात, चंद्र भागेतून न्हाऊन निघतात, चंद्र भागेच्या काठावर बसून कीर्तनकार किर्तन घेतात, लहानापासून थोरा पर्यंत या वारीत प्रत्येकाचा सहभाग असतो प्रतेक वारकरी इथे “माऊली” म्हणून ओळखला जातो , ना जात, पात , धर्म इथे बघितला जातो ना कोणी श्रीमंत आणि गरीब असते ती फक्त भगवी पताका आणि पांडुरंगाला भेटण्याची आस माऊलीला भेटण्याची आस.

त्यात रिंगण वारी तला अविभाज्य घटक आहे,
म्हणजे काय की वारकरी संप्रदायातील एक विशिष्ट प्रकारचा खेळ खेळला जातो, एक विशेष प्रकारचं गोल रिंगण असून त्यात पताके घेऊन, विनेकरी धावतात , टाळ कऱ्यांच धाव होते, मृदंग घेऊन धाव होते, स्त्रिया तुळशी घेऊन रिंगण करतात त्याचबरोबर जे पालखी सोबत अश्व येतात ते देखील रिंगण करतात यामुळे इतकी पायवारी करून येणारी वारकरी संप्रदाय त्या खेळामध्ये खेळून पुन्हा उत्साही होतात.
वयाची ६० ते ७० वर्ष पूर्ण केलेले वारकरी माऊली विठ्लाच्या नामा त असे काय दंग असतात की पाहणाऱ्यांना स्तुती केल्याशिवाय राहवत नाही…
तेंव्हा एकच गजर असतो ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम…..
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी नाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय

या सर्व माऊली सोबत जगाची माऊली ही वेगवेगळ्या रूपात दर्शन देत असते आपल्या भक्ता सोबत विठू ही चालत असतो कुठे कुणाला तहान लागली तर पाणी आणून देतो तर कुठे कोणी थकला तर खांदा देऊन जातो, चालता चालता पाय थकून जातात पायाची साले ही निघून जातात पणं माऊलीला पाहण्याच वेड अस अस्त की ते पाय फुगड्या घालतात तर कधी टाळ वाजवत वाजवत उड्या मारू लागतात कधी कमरे वर हात ठेऊन विठ्ठल विठ्ठल नाचू लागतो, तर कधी वीणा घेऊन किर्तन सांगत असतो.

अशी नित्यक्रमाने वारी होत असते.

दरवर्षी सारखी वारी या २ वर्षात नाही घडली , आपल्या देशात आलेली महामारी मुळे वारकरी आपल्या वारीला जाऊ शकला नाही दरवर्षीचा सोहळा पाहू शकला नाही, देवाला पाहण्याची इच्छा गावाच्या लक्ष्मण रेषे तून ओलंड्ता येत नव्हती, मुला बाळाना आणि सर्वांना घरात कोंडण्याची वेळ आली आहे, विठू चा भक्त आस लाऊन आहे विठू च्या दर्शनासाठी. विठू चा प्रवेशद्वार बंद केला आहे.

“भेटी लागी जिवा लागलीसे आस

पाहे रात्रंदिवस वाट तुझी”

या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून वारकऱ्यांच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. लग्न झालेल्या मुलीला जशी माहेरची आस असते, तीच विठुरायाच्या चरणी डोके ठेवाण्याची घाई भक्तांना झालेली असते.

इकडे पंढरीत आई रुक्मिणी पंढरीनाथा ना म्हणते कुठे आहेत लेकरं माऊली आली कशी नाहीत अजून वेळ झाली आहे त्यांची येण्याची त्यांच्या टाळ मृदुंगांचा गजर नाही ऐकु येत आहे, तुलसी वृंदावन घेऊन माझ्या आया बाया कुठ दिसत नाहीत, बाबांच्या खांद्यावर बसून बोबड्या स्वरात” राम कृष्ण हरी” म्हणणारी माझी पिल्ल कुठ दिसत नाहीत,
दूर दुरूनच पाहते तरी ढंगाचे थवे चालावे तसे सफेद पोषाखातले माझे वैष्णव कुठे दिसत नाहीत,
कुणाला तरी तहान लागली असेल भूक लागली असेल जाऊन येऊ का पाहून जरा,
अजून कुठे राहिली…..माझी लेकरं..?
आई रुक्मिणी नाथ माऊलीला म्हणतच होती..

पंढरीनाथ आई रुक्मिणी ला म्हणाले शांत हो माऊली शांत हो यावेळी आपली लेकरं काळाच्या संकटात अडकलेत , मी ही चौफेर नजर मारून आलो, कोणीच नाही दिसलं, म्हटल पुन्हा सकाळी पुन्हा फेरफटका मारून पाहून यावं , कोणीच नाही दिसलं..

प्रत्येकाच्या घरात जाऊन बघून आलो आपली लेकरं दुखी आहेत, आस लावून आहेत वारीची, हात जोडून देवाऱ्या कडे एकटक पाहत आहेत,
ना शिवारात जाऊ वाटत आहे ना शेत गोड लागत आहे, ओढ लागली आहे ती फक्त वारीची, घरात बसून कारावास सहन करत आहेत, ओलांडली नाही अजून गावची येस..घास घशातून उतरत नाहीय, मन कशात लागतं नाहीय, धाव विठला म्हणून विनवण्या करत आहेत माझी लेकरं….
यावर्षी चुकली रे वारी …पांडुरंगा
कस झालं हे सगळ की लेकराने आई बापाला पहायचं नाही भेटायचं नाही..
हे सांगताा ना विठू शांत झाला होता…

आई रुक्मिणी म्हणाल्या धावा विठ्ठला आपली लेकरं बोलवत आहेत..मला त्यांची दुःख नाही पाहवत आहे..

विठ्ठल म्हणाले : , मी कसा शांत बसेन बाप आहे मी त्यांचा, नाळ जोडली आहे आपली आपल्या लेकरांशी
ते बघा आई रुक्मिणी मी कधीच गेलो आहे ..

आई रुक्मिणी पाहतच राहिली सर्व रूप माऊली विठ्ठलाची

…आणि म्हणाली

माझा विठू कसा शांत बसेल,
असा मी विचारच कसा केला,
दवाखान्यात पी पी ई किट घालून जीव वाचवत होता,
कधी ऍम्ब्युलन्स चा ड्रायव्हर होऊन धावत होता
खाकी घालून गस्त घालत होता,
ठीक ठिकाणी जाऊन समजवत होता,
बाहेर निघू नका जीवाला धोका आहे,
काळजी घ्या लेकरानो मी इथे उभा आहे,
घरात घरात जाऊन अन्न पुरवत होता,
त्यांना जेवण दिल्याशिवाय स्वतः जेवत नव्हता.
संपलेल राशन तेंव्हा कडधान्यांच्या पिशव्या बांधत होता,
घाबरलेल्या ना तो आसरा देत होता,
महामारी पासून वाचण्यासाठी पी पी ई किट बनवत होता,
तर कुठे शिवण यंत्रावर बसून मास्क शिवत होता.
स्यानिटायझर च उत्पादन वाढवत होता,
कुठे कुठे नाही धावला माझा विठू
बाधितांना शाळेत राहायला सोय करत होता,
त्यांची खाण्या पिण्याची व्यवस्था करत होता,
रोज सकाळी सकाळी सर्व परिसर साफ ठेवायचा,
पेशंट ला नाष्टा आणि जेवण पुरवायचा,
लेकरान नाव घेतल की हळूच माथ्यावरून खांद्यावरून हात फिरवून जायचा,
महामारी पासून वाचण्यासाठी जागोजागी माहिती देणारे प्यांपलेट चिकटवत होता ,
संपूर्ण जगभर बसून लस बनवायचा प्रयत्न करत होता,
जाईल तिकडे सिक्युरिटी गार्ड होत होता,
चौका चौकात उभा राहून घरात रहा बाळा म्हणून आकांताने सांगत होता,
२४ तास मेडिकल स्टोर चालवत होता,
वाढणाऱ्या डेड बॉडीझ पाहून हळूच कोणा कोपऱ्यात त जाऊन अश्रू वाहायचा,
आपत्कालीन तुकड्या त सामील होऊन पुरात लोकांना वाचवायचा,.
इतकं करूनही माझा विठू सीमेवर पणं थांबायचा,
युगे अठ्ठावीस उभा माझ्या विठूचे पाय नाही का दुखायचा,
पाहत नव्हती लेकराची ही आबाळ म्हणून
माझा विठू पंढरी सोडून स्वतः लेकरासाठी वारी करत होता
असा माझा विठू लेकरासाठी धावत पळत होता.
…….

अश्यातीतीने माझा विठू या वेळेस जगभर लेकरांना वाचवत आहे, तोच पंढरी सोडून जागोजागी वारी करत आहे कारण विठू च्या लेकरांना पुन्हा वारी करता यावी आणि वारीचा सोहळा पुन्हा चालू करता यावा. असा आहे आपल्या विठूचा वारकरी संप्रदाय, व महिमा..

सांगावा तितका थोडाच आणि जाणून घ्यावं तितकं कमीच

——–@——–
पांडुरंग आपल्या भक्तासाठी धावत आहे नेहमीच धावतो तसे भक्त ही विठू च्या १ सेकंदाच्या दर्शनासाठी महिनाभराचा प्रवास करतात.
माझा सांगण्याचा उद्देश कळाला तर असेलच पणं मी सांगू इच्छिते
या बदलत्या काळात आपल्या मुलांना वारीबद्दल आणि वारकरी संप्रदाय बद्दल माहिती करून देणं अंत्यत महत्वाची गरज आहे, संत महाराज ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी, अनेक हरिपाठ ,ग्रंथ लिहिले आहेत त्यांची ओळख करून दिली पाहिजे. तुकारामांनी केलेले अभंग तसेच इतर संताच्या ओव्या, पसायदान हे रोज गायले पाहिजे

हरिपाठ मध्ये जीवनात काय करावं, कस वागावं, कस असाव, काय गुण आत्मसात केलं पाहिजे, काय दुर्गुण आहेत यांचा सर्वांचा उल्लेख केला गेला आहे.
हरिपाठ रोज वाचला गेला पाहिजे, नसेल वाचण्यास वेळ तरी ऐकलं पाहिजे, समाजात होणाऱ्या वाईट गोष्टी प्रचंड प्रमाणात बदलल्या जातील,

ज्ञानेश्वरी वाचून पाहा काय लिहिलं आहे आपण जन्मलो ही नव्हतो तेंव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल आणि सच्छिदा नंद बाबांनी ती लिहिली ९०३३ ओव्या आणि १८ अध्याय आहेत त्यात, मी ही लहानपणापासून पारायण करत आले तुम्ही ही आपल्या आयुष्यात असे काही क्षण मिळवण्याचा प्रयत्न करा ज्यात खर च चांगल घेण्यासाठी खूप काही आहे.

काही दिवसापूर्वी मी एक एबीपी माझा चा व्हिडिओ पहिला त्यात एक दिंडी जात असताना त्या दिंडी सोबत रानावणातून आलेलं एक सोन पिवळ हरीण जात होत किर्तन चालू झाल की बसून किर्तन ऐकण असो की त्या दिंडी सोबत चालन असो त्या हरणाने त्यांची दिंडी नाही सोडली , या चरा चरात विठलाचा वास आहे.

यावेळी तुकाराम महाराजांचा अभंग सुचला
II वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वन चरे…
पक्षीही सुस्वरे आळविती ll

संकर्षन कऱ्हाडे यांनी ही या वर्षी वारी नाही झाली याबद्दल अप्रतिम कविता केली आहे, तसेच अजय अतुल सर देखील आपल्या संगीतातून विठू साठी नेहमी साद घालत असतात..

पुण्यातील वेद विज्ञान केंद्र आणि द इनामदार हार्ट क्लिनिक यांनी हे सिद्ध केलंय की रोज दहा दिवस शांत बसून नऊ मिनिटे विठ्ठल नामाचा जप केला गेला तेंव्हा हा निष्कर्ष दिसून आला.
या सर्वेक्षणामध्ये तीस लोकांचा सर्वेक्षण करण्यात आला रोज दहा दिवस नऊ मिनिटं यांना विठ्ठल नामाचा जप करण्यास सांगितला हृदयाच्या उर्जेत वाढ झाल्याचा सिद्ध झाल, हृदयाच्या आकुंचन क्रिया सुधारते ब्लड प्रेशर सुरळीत राहत, हॉट रेट नॉर्मल पल्स रेट ही नॉर्मल, इको रेषेतील सकारात्मक वाढ
इतके बदल दिसून आले .

साधारणतः डॉक्टरांचं म्हणणं आहे की कीजे वारकरी संप्रदायातील व्यक्ती आहेत माऊली आहेत त्या फिजिकल किंव्हा मेडिकली इतके फिट नसतात तरीही विठ्ठल नामाच्या गजरात ती लोकं 18 दिवस प्रवास करून पाय वारी करून दोनशे पन्नास किलोमीटर चा प्रवास साधारण करून वारी संपवून परत घरी येतात आणि ते फीट असतात हे आश्चर्यकारकच म्हणता येईल, हीच वारीची लीला आहे .

अन्न ग्रहण करतेवेळी आपल्या मुलांना श्लोक म्हणायला शिकवलं पाहिजे

“अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तेथे नांदतो
ज्ञानराजा सुपात्र,l l
तया अठविता महा पुण्य राशी,
नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी l l

संत तुकाराम महाराज यांच्या गाथा काही लोकांमुळे इंद्रायणी त टाकण्याची वेळ आली होती पणं त्या इंद्रायणी मातेने त्या पुन्हा परत केल्या वारकरी संप्रदाय जपण्यासाठी,
म्हणतात भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभे ठाकलेले विठ्ठल ला ची प्रथम वारी प्रभू शंकरांनी व आई पार्वतीने व श्री गणेश जिनी केली

बाहेरच्या देशातील भक्त राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणताना अनेक बातम्या यूट्यूब वर दिसतात आपली मुलं मागे नाही राहिली पाहिजे, आपल्या गाथा, आपले अभंग आपल्या मुलांना कळले पाहिजेत

दिवे लावून झाले की हरिपाठ नित्य नेमाने केले पाहिजे,
माझी मुलगी ५ वर्षाची आहे तिला लहानपणापासूनच मी हरिपाठ ची सवय लावली आहे. मुलं मातीचा गोळा असतो लहानपणीच योग्य आकार देत गेलं की पुढे भविष्यात जास्त परिश्रम घ्यावे लागत नाहीत .

माझी आई श्री राम लिखाण करण हरिपाठ वाचन करणे नित्य नेमाने करते , आयुष्यात काम कधी संपणार नाहीत पणं आपल्याला जन्म दिला आहे ज्याने त्याच मुखात नाव असन आणि जपन तितकच गरजेचं आहे. मी बदलत्या काळानुसार बिझी असते म्हणून ती आजही मला नित्य नेमाने हरिपाठ वाचनासाठी आठवण करून देत असते . पण मला वाचण्यास वेळ भेटला नाही तर मी काम करताना माझ्या स्टाफ सोबतच हरिपाठ ऐकत असते आपल पणं चांगल आणि बाकीच्यांचे देखील.

श्री हरी पांडुरंगा साठी लिहावं तितकं कमीच आहे कारण हे चराचर त्यांचं च आहे. आज एकादशी लाच सुरुवात केली या लेखाला आणि समाप्ती ही माझे मारुती मामा नी बरचस मार्गदर्शन केलं ते गेल्या १२ वर्षापासून वारी करत आहेत, माज घरान तस वारकरी आणि माळकरी च ,
माझ्या अण्णा न्ची इतकी पुण्याई होती की ते हयात नव्हते तेंव्हा त्यांना घेऊन जात असलेली ऍम्ब्युलन्स नकळत मुंबई वरून पंढरीला गेली होती तीथून कोल्हापूर ला मुळ स्थानी गेली, आणि बाबांना ही एकादशी लाच बोलावन धाडलं होत..

तर माझा प्रवास विठलाच्या नामाने यांच्यामुळे चालू झाला आणि माझ्या पुढच्या पिढीला ही मी हा प्रवास देत आहे..
या एका लेखात बसेल इतकं काय सांगू शकेन माझ्या माऊलीच पुन्हा घडतीलच असे योगायोग तेंव्हा लिहीन नक्की.
माझे विचार तुमच्या पर्यंत पोहचत असतील तर मला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा, कळल्याने संवाद वाढतो आणि नवीन काही लिहिण्यास विषय सुचतो आणि प्रेरणा मिळते.

जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणी जो आपुले!!
तोची साधू ओळखावा,
देव तेथेची जाणावा !!

संत तुकारामांचे अभंग किती महत्व सांगून जातात.

संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ।।

हरिपाठातील आठव्या अभंगात संत ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात की, आपल्या मनोवृत्तीची धाव संतांच्या संगतीकडे लावावी आणि या साधनाने लक्ष्मीपतीस वश करून घ्यावे. म्हणजेच संत ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे ती गोष्ट मनावर घेऊन देहाने व मनाने तसे वागावे. हरिला वश करून घेण्याचे हेच साधन होय.

वाचेने निरंतर रामकृष्ण नामाचा जप करणे हाच जीवाचा धर्म होय. रामजप हा शिवाचाही आत्मा आहे. अर्थात, जीवाने त्याचे भजन करणे आवश्‍यक आहे. एक तत्त्व जो हरि त्यास त्याच्या नामरूपी साधनाने जे कोणी प्राप्त करून घेतात, त्यांना “मी’ आणि “तू’ इत्यादी बंधनाची बाधा होत नाही.

माझा लेख वाचून झाला की यूट्यूब वर जय जय राम कृष्ण हरी चा एकदा टाळ मृदंगाचा आवाज काना मध्ये जाऊ द्या. तो सूर आयुष्यात कधीच विसरला जाणार नाही..नेहमी ऐकावा वाटेल .

चांगल्या गोष्टी आयुष्यात केल्याने चांगलच घडत,
जमिनीवर पारितोषिक मिळो न मिळो आपल्या कर्मांच पारितोषिक देव नक्कीच देतो.

मग बोला नेहमी…
जय जय राम कृष्ण हरी

रुपाली स्वप्नील शिंदे
आजरा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular