Homeसंपादकीयमी ( वेश्या ) आहे म्हणून समाजातील अनेक स्त्रिया सुरक्षित आहेत.

मी ( वेश्या ) आहे म्हणून समाजातील अनेक स्त्रिया सुरक्षित आहेत.

लॉकडाऊन होऊन काही आठवडे झाले होते . आमचा वेश्या व्यवसाय सुद्धा थांबला होता. पण एक दिवस मोहिनेनी हे काम सुरू केले तेही एक रुपये न घेता. याची माहिती मिळताच कस्टमरांची फोन द्वारे बुकिंग साठी रांग लागली होती.
काही लोक आपले काम होताच लगेच निघून जात ; तर काही हे किती दिवस फुकट देणार म्हणत मी पुन्हा येईन असे सांगून जात होते.
ही बाई फुकट का देत असेल? की हिला संभोगाशिवाय जगणे असह्य होत आहे ? कारण पोटासाठी म्हणावे तर ही पैसे पण घेत नाही ? या अस्वस्थ विचारातच सदाशिव तिथं पोहचला . आपले उद्दिष्ट साध्य करतानाच त्याने तिला धाडसाने एक-दोनदा न राहुन विचारलेच.
या प्रश्नावर मोहिनेनी उत्तर दिले , साहेब आठवड्या पूर्वी कोरोना टेस्ट करण्यासाठी सेंटर मध्ये आम्हाला नेले होते . तेव्हा समजले एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अमानुषपणे बलात्कार केला. तेव्हाच ठरवले अश्या मुलींना वाचवायचे असेल तर मला त्या नराधमांना माझ्याकडे आणून त्याची भूक भागवावी लागेल . कारण याशिवाय मी दुसरे काहीच करू शकत नाही. टेस्ट निगेटिव्ह आली अन त्याच दिवशी मी हे जाहीर केलं .
या तिच्या उत्तराने सदाशिव नरमला. व त्या अल्पवयीन मुलींमद्ये त्याला आपल्या मुलीचा चेहरा आठवू लागला. ती वेश्या आज त्याला कोणा एका समाजसेविके सारखी भासू लागली. त्याच विचार तो घरी गेला पण त्याचे मन शांत न्हवते. दुसऱ्या दिवशी पुन्हा मोहिनीकडे गेला. तुम्ही खऱ्या कोरोना योध्या आहात म्हणत आणलेले महिन्याचे राशन मोहिणीच्या घरी जबरदस्तीने ठेऊन निघून गेला.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular