Homeसंपादकीयरवींद्रनाथ टागोर जयंती विशेष

रवींद्रनाथ टागोर जयंती विशेष

साहित्यक्षेत्रात भारताला मानाचे स्थान प्राप्त करुन देणारा व आशियातील पहिला #नोबेल #पारितोषिक #विजेता असा महान #साहित्यिक, #कवि, #तत्त्वज्ञानी, #नाटककार, #संगितकार, #नृत्य क्षेत्रातही योगदान, #चित्रकार, #गुरुदेव रविंद्रनाथटागोर
रविन्द्रनाथांनी रचलेली
जन गण मन_ व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. पारंपरिक शिक्षण पोपटपंची शिकवते या विचारातून आणि ज्ञानसंवर्धनातूनच अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उद्देशाने त्यांनी शांतिनिकेतनचा क्रांतिकारी, उपक्रमशील प्रयोग राबवला. त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातियतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळच्या मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले होते. त्यांच्या कवितेत झळकणारा निसर्गवाद हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधोरेखित करतो.
त्यांच्यावर महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज व छत्रपति शिवाजी महाराज यांचा सुद्धा विशेष प्रभाव जाणवतो. म्हणूनच त्यांनी संत तुकारामांच्या साहित्याचा अभ्यास केला होता, संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादीत केले आहेत. शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्य ही रचला आहे.
रविंद्रनाथांच्या बहुमुखी निर्मितीत कविता जरी प्रमुख असली तरि त्यांनी कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, प्रवासवर्णने, नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली.
त्यांच्या राजकिय मताप्रमाणे, त्यांना ब्रिटिश साम्राज्यवादापेक्षाही ‘सामाजिक अनारोग्य’ मोठा शत्रू वाटत असे. स्वयंसहायता व सर्वसामान्यांचा बौद्धिक उद्धार आदींवर त्यांचा जास्त भर होता. स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच्या आंधळ्या क्रांतिपेक्षा सावकाश होणाऱ्या शैक्षणिक उत्क्रांतिवर त्यांचा जास्त विश्वास होता.
त्यांचे काव्य व लेखन आपल्याला एक नविन दृष्टि, सामर्थ्य व हिंमत देऊन जाते. त्यांनी लिहिलेल्या गितांजली मधील चौथ्या कवितेचे मराठी भाषांतर आपल्यासमोर कॉपी पेस्ट करतो आहे,
प्रार्थना
विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही;
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा|

दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.
दुःखावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा|

जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली;
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा|

माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही.
तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे
एवढीच माझी इच्छा|

माझे ओझे हलके करून
तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी
एवढीच माझी इच्छा|

सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन
मी तुझा चेहरा ओळखावा
दुःखांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील,
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा|.
आपल्या साहित्यातून जगण्याबद्दलचा दृष्टिकोन अधिक व्यापक करुन उमेद निर्माण करण्यासाठी साहाय्य ठरत.

तुमच्या आवाहना वर तुम्हाला कोणी साथ देवो अगर न देवो तुम्ही एकटेच चला, रस्त्यात कितीही समस्या आल्या तरि एकटेच चला. अशा प्रकारचा संदेश देणारे गीत ज्या गीताचा स्वातंत्र्यगित म्हणून उल्लेख केला जातो ते #एकलाचलोरे या गितामध्ये.

दि. ७ में १८६१ मध्ये कोलकाता मध्ये जन्म घेतला आणि भारताला साहित्याप्रति अधिक संपन्न करण्यात मोलाचा हातभार लावला. देशभक्तीपेक्षा मानवतावादाचे किती महत्त्व आहे व यानेच सर्वार्थाने विकास संभव आहे. आणि सद्या राष्ट्रवादाचा गैरवापर केल्या जात असून सामान्य जनतेला भावनिक करून राजकीय पोळ्या भाजल्या जात आहे. म्हणून मानवतावाद हाच सर्वश्रेष्ठ.. रविन्द्र नाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

संकलक: मनोज गावनेर

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular